जगभरात कोरोना विषाणुच्या संसर्गाने थैमान घातलेले आहे. भारतासह अनेक देशात लॉकडाऊन घोषित केल्यामुळे जागतीक आर्थिक व्यवहार ठप्प पडले. तसेच अनेक देशात आर्थिक मंदीही घोषित करण्यात आली. काही सर्व्हे करणाऱ्या संस्थांच्या माहितीनुसार कोरोनाचा प्रादुर्भावामुळे असंख्य लोकांचे रोजगार व नोकऱ्या गेल्या आहेत. कोरोना नंतरच्या काळात देशाची अर्थव्यवस्था सुधारणे हे एक मोठे आव्हान असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासींयाना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिलेला आहे. अशावेळी मत्स्य व्यवसाय व निगळीत लघु उदयोगातुन स्वंयरोजगार निर्मिती घडवून आणणे शक्य आहे. अनेक इच्छुक शेतकरी बांधवांना परीपुर्ण माहिती व योग्य मार्गदर्शनाच्या अभावी मत्स्य व्यवसाय करणे शक्य होत नाही. सदर लेखाच्या माध्यमातून मत्स्यसंवर्धन व निगळीत लघुउदयोग याबाबत आपण माहिती घेणार आहेत.
मानवनिर्मीत तळ्यातील मत्स्य संवर्धन
"मत्स्यतळयात किंवा तलावात (जलविस्तार क्षेत्रात) लहान आकाराचे मत्स्यबिज योग्य प्रमाणात सचंयन करुन त्यांना अनुकूल वातावरण व इष्ठतम खादय पुरवून त्याला विक्रीयोग्य आकारात वाढविले जाते व त्याची विक्री केली जाते. या व्यवसायाला मत्स्य संवर्धन व्यवसाय असं म्हटलं जातं. " गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धनामध्ये भारतात प्रामुख्याने १० -१२ मत्स्य प्रजातींचे व्यवसाय दृष्टीकोनातुन उत्पादन घेतले जाते. यामध्ये दोन प्रकारच्या माशांचा समावेश आहे. चातळ मासे (ज्या माशांना चातळ असतात) व विना चातळ मासे. चातळ माशांमध्ये भारतीय प्रमुख कार्प मासे- कटला (कटला), रोहु ( लेबिओ रोहीता) , म्रिगल( सिरीनस म्रिगला), व चायनिज प्रमुख कार्प- मासे सिल्वर कार्प (हेटेरोप्टीनियस मॉलक्ट्रीक्स), कॉमन कार्प (सिप्रिनस कार्पीओ), व ग्रासकार्प(क्टिनोफॉरींगोडान इडेला) तसेच तिलापीया(ओरीओक्रोमीस प्रजाती) मरळ(चन्ना प्रजाती) यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
विना चातळ माशांमध्ये मागुर (क्लारीयस बॅाट्राकस), सिंघी ( हेटेरोप्टीनियस फॉसेलीस),पंगस/झरंग मासा(पगांसियस प्रजाती ) इत्यादींचा समावेश होतो. मत्स्यबीजाची चांगली वाढ होण्यामागे अनेक बाबींचे योग्य संयोजन गरजेच्या असते. सर्व बाबी योग्य गुणवत्तेत राहील्या तर मत्स्यबिज १०-१२ महिन्याच्या कालावधीमध्ये १ ते १.५ किलोपर्यंत वाढतात. माशांच्या वाढीसाठी तलावात खादयाची उपलब्धता असणे महत्वाचे समजले जाते.
निम-प्रगत मत्स्य संवर्धन प्रकारातील तलावात पुरक पोषक तत्वे असलेले खादय बाहेरुन पुरवठा केले जाते. त्याला मानवनिर्मीत खादय (उत्तम वाढीसाठी लागणा-या पोषक तत्वांची पुर्तता करण्यासाठी विशिष्ठ पदार्थ सामग्रीचां वापर करुन तयार केलेले खादय). असे संबोधले जाते. मत्स्य संवर्धनातील एकुण उत्पादन खर्चापैकी किमान ६० % खर्च हा मत्स्य खाद्यावर होतो. मत्स्य शेतकरी साध्या सुत्रांचा वापर करुन स्वत: मत्स्य खादय तयार करु शकतात. विविध कंपनीव्दारे सुध्दा माशांच्या अन्न तत्व गरजेनुसार वेगवेगळया प्रकारचे खादयनिर्मीती व त्याची विक्री केली जाते. खाद्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास माशांची उत्तम वाढ करणे व चांगला नफा मिळविणे शक्य होते. एक किलोवरील माशांना विक्रीयोग्य समजले जाते व यांना चागंला बाजार दर मिळतो. चातळ माशांमध्ये रोहु, कटला म्रिगल, गवत्या,चांदेरी व सिप्रनस या जातीच्या माशांना चांगली मागणी आहे व साधारणत: या माशांना प्रती किलो १६०-२०० रू प्रमाणे बाजारभाव मिळतो.
मत्स्यतलावासाठी साधरणता किती जागा गरजेची असते?
:- ०.२ ते १.० हेक्टरच्या तलावामध्ये मत्स्यशेती केल्यास योग्य व्यवस्थापन व नियंत्रण ठेवणे शक्य असते.
मत्स्यशेतीसाठी तलावाचा आकार कसा असायला पाहिजे?
:- साधारणत: १.५-२.० मीटर खोली असलेले आयात आकाराचे तलाव मत्स्य शेतीसाठी योग्य समजले जाते. मत्स्यबीज संवर्धन तलावाची खोली १.०-१.५ मीटर योग्य असते.
1 हेक्टर मत्स्य तलाव खोदकाम व बांधकाम कारीता अंदाजित खर्च किती येतो?
:- संपुर्ण व्यवस्थापन केलेले मत्स्य तलावाचे खोदकाम व निगळीत बांधकाम करण्याकारीता अंदाजित ६-७ लाख रुपयांचा खर्च येऊ शकतो. पण साधारणता मत्स्य तलावाचे खोदकाम व निगळीत बांधकाम २-.२५ लाख रुपये खर्चात सुध्दा पुर्ण करणे शक्य आहे.
मत्स्यबिज निर्मिती व विक्री
तलावात मत्स्य बिज संचयन करण्याकरीता उत्कृष्ट गुणवत्तेचे सुदृढ मत्स्यबिज अत्यंत महत्वाचे असते. मत्स्यबिज निर्मीती व्यवसायामध्ये प्रजननायोग्य सुदृढ नर व मादी माशांना हारमोनल इंजेक्शन देऊन मानवनिर्मीत हॅचेरी पध्दतीमध्ये प्रजननास प्रात्साहित/उत्तेजित केले जाते व योग्यरित्या प्रजनन पार पडल्यानंतर फलीत अंडींना अनुकूल तापमान व वातावरणात उबवले जाते. अनुकूल परिस्थितीमध्ये विशिष्ट कालावधीपर्यंत अंडीची उबवणी झाल्यास ३६ ते ४८ तासात मत्स्यलार्वा प्राप्त होते. मत्स्यलार्वांना खादयाची गरज नसते तसेच त्याच्या अवयावांची पुर्ण वाढ झालेली नसते.३ दिवसानंतर त्याचे मत्स्यजि-यामध्ये रुपांतर होते (आकार-५ ते ८mm). मत्स्य जि-यांना मत्स्य फ्राय(८-४०mm) होण्याकरीता साधारणत: १५ ते २० दिवसांचा कालावधी लागतो व पुढील दोन महिन्यात योग्य खादय दिल्यास मत्स्य बिजाचे रुपांतर मत्स्य बोटुकली (४०-१२० mm) मध्ये होते. मत्स्यजिरा,मत्स्यफ्राय,मत्स्यबोटुकली याची मागणी नुसार विक्री केली जाते. मत्स्यबिज निर्मीती करीता अनेक मानवनिर्मीत पध्दतींचा वापर केला जातो.या मध्ये प्रामुख्याने चायनिज सर्कुलर हचेरी,मोगरा बांध पध्दत,पोर्टेबल हॉचेरी सिस्टीमचा इत्यांदीचा वापर जगभरात केला जातो.
व्यवसाय दृष्टीकोनातुन मत्स्यबिज निर्मिती केंद्राची (हचेरी) स्थापना करायला किमान २.५ ते ३ एकर जमीन गरजेची असते. मत्स्यबिज निर्मिती केंद्राची स्थापना करण्यासाठी १५ ते २० लाखांचा खर्च येऊ शकतो. योग्य व्यवस्थापन केल्यास मत्स्यबिज निर्मीती व विक्रीतून लाखोंचा नफा घेणे शक्य आहे. सद्यास्थिती मध्ये पुरेपुर मत्स्यबिज निर्मीती केंद्रांच्या अभावी योग्य मत्स्यबिज मिळणे हे फार कठीण झालेले आहे. कारणास्तव राज्यातील मत्स्य संवर्धकांना बाहेर राज्यातून मत्स्यबिज आयात करावे लागते. युवकवर्गानी याबाबत योग्य प्रशिक्षण घेतल्यास मत्स्यबिज निर्मीती व विक्री या व्यवसायातून लाखोंचा नफा मिळविणे शक्य होऊ शकते.
मत्स्यबिज संगोपन व विक्री
मत्स्यबीज निर्मीती केंद्रातून खरेदी कलेले लहान मत्स्यजिरे (८ mm पेक्षा लहान आकाराचे बिज) ०.१- ०.५ हेक्टरच्या लहान तलावात संचयन करुन त्याला पुरक वातावरण व खादय पुरवून २-३ महिन्यात त्याला मत्स्य बोटुकली (४०-१२०mm) पर्यंत वाढविले जाते व त्याची विक्री केली जाते. या व्यवसायात ३-४ महिन्याच्या कालावधीमध्ये चांगला नफा घेणे शक्य आहे. मत्स्य जि-याचा भाव हा एक लाख नगामागे १५०० ते २००० रुपयांच्या दरम्यान असतो. तर मत्स्य बोटुकलीला ०.६० ते १ रु.प्रती नग या दरम्यानचा भाव मिळतो. मत्स्य जिरा लहान आकाराचा व नाजुक असल्यामुळे त्यांच्या मरतुकीचे प्रमाण हे जास्ती असते. योग्य व्यवस्थापन केल्यास मत्स्य जि-यांची मरतुक प्रमाण कमी करणे शक्य असते. साधरणत: मत्स्यबीज संगोपनामधे मत्स्यजिरा ते मत्सबोटुकली होण्याची टक्केवारी ही २५-३०% दरम्यान असते.
गोडया पाण्यातील झिंगा संवर्धन
गोडया पाण्यातील झिंगा संवर्धनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रथिनयुक्त सरस अन्न आणी खव्वयांच्या जिभेला पाणी सोडणाऱ्या चवीसाठी प्रसिध्द असल्यामूळे झिंग्याला भरपुर मागणी आहे. गोडया पाण्यातील झिगां संवर्धनासाठी प्रामुख्याने पोशा कोळंबी (मॉक्रोब्राकियम रोझनबर्गाय) व गोदावरी कोळंबी (मॉक्रोब्राकियम माल्कमसोनी) या झिंगा प्रजातींचा वापर केला जातो. मत्स्य संवर्धनापेक्षा झिंग्याची सघन संवर्धण अधिक अवघड असले तरी झिग्यांच्या उच्च दरामुळे यातुन येणारे उत्पन्न व नफा अधिक असतो. झिंग्याला दर त्याच्या आकारामानानुसार (साईज ग्रेड काउंट) मिळतो.
साधारणत: ८० -१०० ग्रामच्या झिंग्याला मागणीनुसार प्रती किलो प्रमाणे ५०० -७०० रुपये भाव मिळतो. व योग्य व्यवस्थापन केल्यास प्रती एक किलो झिंग्यामागे २५०-३५० रुपये उत्पादन शुल्क लागतो. अनुकूल वातावरणात इष्ठतम खादय पुरवठा केल्यास लहान झिंगा बिजाला विक्रीपुरक आकारात वाढायला साधरणत: ६ ते ९ महिन्याचा कालावधी लागतो. शेतकरी मित्रांनी व युवकांनी याबाबत योग्य माहिती व प्रशिक्षण घेतल्यास गोडया पाण्यातील झिंगा संवर्धनातून चांगले उत्पन्न घेणे शक्य आहे.
आक्वास्कॉपींग -शोभिवंत मासे व आक्वारियम सेटअप विक्री
घरात शोभिवंत माशांचे संगोपन करणे हा जगभरातील लोकांना आवडणारा प्रसिध्द छंद आहे. सुदंर आकारमान व मनमोहक रंगांच्या छटा असणारे मासे अनेक लोकांना मोहीत करतात. तसेच अनेक देशात विविध जातीच्या या माशांचे महत्व, मानसीक शांती व सुदृढ आरोग्यसाठी फायदेशिर समजल्या जाणारे रंगीत मासे जगभरात प्रसिध्द आहेत. गोल्ड फिश,एंजल फिश,अरवाना मासा, चिचल्लीड मासा इत्यादींना बाजारात भरपुर मागणी आहे.
देशात शोभिवंत मासे विक्री करणे हा व्यापार मोठया जोमाने वाढत चाललेला आहे. अगदी रूपयांच्या दरानी विकल्या जाणा-या माशांपासुन तर लाखोंच्या दरा पर्यंत विकले जाणारे मासे बाजारात उपलब्ध आहेत. घरात शोभिवंत माशांच्या टाक्या तयार करुन देणे व मासे, मत्स्य खादय पुरविणे यातुन हजारो रुपयांचा नफा मिळविणे शक्य आहे. याबाबत उचित कौशल्य व माहीती घेतल्यास शहरी भागातील युवकांना या व्यापारात चांगला नफा मिळवता येउ शकतो. या व्यवसायासाठी साधारण ५-८ लाखांचा खर्च येऊ शकतो.
जिवंत मासोळी विक्री दुकान
ताज्या मासोळीची मागणी लक्षात घेता जिवंत मासोळी विक्री हा एक महत्वाचा व्यापार आहे. स्वच्छ दुकानात पाणी टाकी तयार करुन विक्रीयोग्य जिवंत मासे ठेवली जातात व मागणीनुसार व आवडीनुसार ग्राहकांसमोर मासे कापुन विकले जाते. शहरी भागात जिथे ताजी मासे मिळने कठीन असते. अशा ठिकाणी या प्रकारचे दुकान टाकुन चागंला नफा मिळविणे शक्य आहे.
मत्स्यपदार्थ निर्मीती व विक्री
माशांना त्यांच्या अतुलनीय चवीसाठी आणी भरपुर पोषण तत्वांसाठी लोकांची पंसती प्राप्त आहे. मत्स्यशरीरातील काटे वेगळे केल्यास माश्यांच्या मांसापासुन विविध प्रकारचे चवदार व्यंजने बनविता येतात. माशांपासुन मत्स्यकटलेट, मत्स्यचकली, शेव, मत्स्य लोन्हचे (आचार), मत्स्यवडे, मत्स्यन्युडल्स इत्यादी प्रकारचे उपहार बनविले जातात. देशातील अनेक यंत्रनेव्दारे प्रशिक्षण शिबीरांच्या माध्यमातुन या प्रकारचे पदार्थ निर्मीती करण्याबाबत माहीती दिली जाते. योग्य प्रशिक्षण घेतल्यास मत्स्य पदार्थ निर्मीती व योग्यरित्या पॉकिग करून विक्री केल्यास यातुन चांगला नफा मिळविणे शक्य आहे.
चालते-फिरते मत्स्यपदार्थ उपहार गृह
मत्स्य पदार्थांची व उपहारांची विक्री करण्यासाठी चालते-फिरते मत्स्य पदार्थ रेस्टॉरंट ही एक नाविण्यपुर्ण कल्पना आहे. खादय व्यापारातील स्पर्धेमध्ये या प्रकारचे नाविण्यपुर्ण उपहार गृह सुरू केल्यास लोकाचा चांगला प्रतिसाद मिळणे शक्य आहे. यातुन कमीत-कमी भांडवल वापरुन चांगला नफा मिळविणे व स्वयंरोजगार निर्मीती करणे शक्य आहे.
Published on: 28 October 2020, 03:54 IST