पशुपालन हा शेती व्यवसायाला पूरक असा जोडधंदा आहे. पशुपालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होतो. पशुपालन धंदा हा दुग्ध उत्पादनावर अवलंबून आहे. त्यामुळे दूध उत्पादन वाढण्यासाठी काय करता येईल, याची माहिती असणे आवश्यक असते. या लेखात आपण दूध व्यवसायातील पंचसूत्री विषयी माहिती घेणार आहोत.
दूध व्यवसायातील चारसूत्रे
- निरोगीप्रजननसंस्था- जनावरांच्या प्रजनन संस्थेचे आरोग्य राखण्यासाठी दरवर्षी सांसर्गिक गर्भपात याची चाचणी करून घ्यावी. नोंदणीकृत व जबाबदार पशुवैद्यकाकडून कृत्रिम रेतन करावे. वार अडकल्या स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नये. तांत्रिक ज्ञान नसलेल्या व्यक्तीकडून वार काढल्यास गर्भाशयाची जाण्याची शक्यता बळावते.जनावरांना योग्य मात्रेत खनिजद्रव्ये दिल्यास उलटण्याची प्रमाण कमी होऊन प्रजनन संस्थेचे आरोग्य टिकून राहते. गर्भाशयाचे आजार असणाऱ्या जनावरांना इतर निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवावे.
निरोगी पचनसंस्था- वैरण जमिनीवर न टाकतात गव्हाणीत टाकावे.वैरणीची कुट्टी करूनटाकणे कधीही फायद्याचे असते. कुट्टी करत असताना बोटभर लांब तुकडे करावेत. फार बारीक तुकडे करू नयेत. जनावरांना फक्त ओला किंवा फक्त वाळका चारा देऊ नये.एकाच प्रकारचा चारा दिल्यास जनावराचे रवंथ करण्याचे प्रमाण कमी होते.
- त्यामुळे चाऱ्यात पुरेशी लाळ मिसळली न गेल्याने पोटाचे विकार संभवतात. गावरान ना एकाच वेळी जास्त वैरण न देता दिवसातून चार ते पाच वेळा थोडे थोडे वैरण द्यावी. गोठ्यातील सर्व जनावरांचे नियमित पाणी जंतनाशक करावे. समतोल आहार देण्याचा प्रयत्न करावा. पचनसंस्थेच्या सांसर्गिक रोगात पासून ग्रस्त जनावरांपासून निरोगी जनावरे वेगळी ठेवावी.
- गोठा स्वच्छ ठेवणे-गोठा स्वच्छ,कोरडा, हवेशीर व उबदार ठेवावा. गोठ्यात ओलावा असल्यास जंतूंची वाढ मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे गोठ्यात पुरेसा प्रकाश असावा.शेण, मूत्र, उरलेला चारा जाळून टाकावा. आजारी जनावरांची वेगळी व्यवस्था ठेवावी. गोठ्यात वैरण उरलेली वैरण साचू देऊ नये. शक्य झाल्यास जनावरांना रोज धुऊन स्वच्छ करणे चांगले असते. त्यामुळे परजीवी कीटकांचा प्रादुर्भाव सहसा होत नाही. रक्ताभिसरणला चालना म्हणून ताजेपणा वाटतो.
- स्वच्छ दूधनिर्मिती- रोगी व अस्वच्छ जनावरांपासून स्वच्छ दूध मिळत नाही.तू तर स्वच्छ नसल्यास टिकवणक्षमता कमी होऊन दूध नासते. म्हणून जनावरे निरोगी व सशक्त असावे.
- दूध काढताना प्रत्येक सडातीलचार ते पाच धारा वेगळ्या भांड्यात काढावे. हे दूध इतर दुधात मिसळून नये. दूध काढताना जनावराला कोरडा आणि उग्र वास असलेला चारा देऊ नये. दूध काढण्याची जागा स्वच्छ व धूळ मुक्त असावे. दुधाची भांडी स्वच्छ व निर्जंतुक केलेले असावेत. दुधाचे भांडे धुण्याच्या सोडणे गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावीत. दूध काढून झाल्यानंतर ते गोठ्यातून त्वरित हलवावे.
वरील प्रमाणे जर आपण गोठ्याची आणि पशू ची काळजी घेतली तर दूध उत्पादन चांगल्या प्रकारे वाढू शकते.
Published on: 14 October 2021, 12:33 IST