Animal Husbandry

करडांच्या वाढीसाठीपाणी आरोग्यासाठी दुधा व्यतिरिक्त चारा व खाद्य देणे आवश्यक आहे. करडे एक आठवडा वयाची झाल्यानंतर त्यांच्यासमोर हिरवा पाला टांगून ठेवावा. त्यांना चारा खाण्याची सवय लागल्यास त्यांच्या पचन इंद्रियांची व पोटाची लवकर वाढ होऊन ते कार्यक्षम होतात.

Updated on 01 December, 2021 3:04 PM IST

करडांच्या वाढीसाठीपाणी आरोग्यासाठी दुधा व्यतिरिक्त चारा व खाद्य देणे आवश्यक आहे. करडे एक आठवडा वयाची झाल्यानंतर त्यांच्यासमोर हिरवा पाला टांगून ठेवावा. त्यांना चारा खाण्याची सवय लागल्यास त्यांच्या पचन इंद्रियांची व पोटाची लवकर वाढ होऊन ते कार्यक्षम होतात.

शेळीपालनातून अधिक नफा मिळविण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने शेळ्या व करडांचे व्यवस्थापन आवश्‍यक आहे. उत्तम आनुवंशिक गुणधर्म असणाऱ्या शेळ्यांची निवड करावी. गाभण शेळ्यांची तसेच करडाची योग्य पद्धतीने जोपासना करावी. करडे बांधण्याची जागा नेहमी स्वच्छ व कोरडी ठेवावी. करडांना भरपूर मोकळी आणि हवेशीर जागा मिळाली पाहिजे.शेळी व्यायल्यानंतर ती नवजात करडांना स्वतः चाटून स्वच्छ करते. त्यामुळे करडे स्वच्छ होण्याबरोबरच रक्ताभिसरण वाढते. शेळीने चाटून स्वच्छ न केल्यास करडाचे अंग स्वच्छ जाड्याभरड्या कापडाने स्वच्छ कराव्यात.करडांच्या  नाकातोंडात ईल चिकट स्राव काढावा जेणेकरून करडांना श्वास घेणे सोपे होईल.

 शेळी व्यायल्यानंतर करडांची नाळ एक ते दीड इंच लांब अंतरावर स्वच्छ व निर्जंतुक कात्रीने किंवा ब्लेडने कापावी. कापलेल्या ठिकाणी टिंचर आयोडीनचा बोळा ठेवावा म्हणजे नाळेच्या जखमी द्वारे रोगजंतूंचा शरीरात प्रवेश होत नाही. हळद पुडीचा ही वापर यासाठी केला तरी चालतो. खुरान वर वाढलेला पिवळा भाग हळद खरडून काढावा. जेणेकरून करडांना ताठ उभे राहता येईल व जन्मल्यानंतर करडाचे वजन करावे.

करडांना चीक पाजणे

  • करडे जन्मल्यापासून सुरुवातीचे तीन-चार दिवस त्यांचे दुध असते त्यालाच चिक असे म्हणतात. जन्मजात करडाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. सुरवातीस काही काळ ती विकसित झालेली नसते. म्हणून निसर्गाने त्यांना रोगप्रतिबंधक शक्ती मिळावी यासाठी माते मार्फत ती व्यवस्था करून ठेवली आहे.
  • चिकामध्ये ग्यामाग्लोब्सुलिन्समाझे रक्षक प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. जी करडांना अनेक संसर्गजन्य रोगांपासून वाचवतात. तसेच चिकामध्ये दुधापेक्षा 15 पटींनी जास्त जीवनसत्त्व अ चे प्रमाण असून ते तीन ते पाच पट जास्त प्रथिने असतात. याशिवाय त्यात लोह, तांबे, मॅगनीज आणि मॅग्नेशियम ही खनिजे सुद्धा भरपूर प्रमाणात असतात. चिकात सारक गुण असल्याने करडाच्या आतड्यात साठवलेल्या मला चे निस्सारण होण्यास मदत होते.
  • करडे जन्मल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासाच्या आत त्यांना चीक पाजणे आवश्‍यक असते. साधारणपणे करडाच्या एकूण वजनाच्या 10 टक्के इतका चीक पाजावा. वार पडण्याची वाट न बघता योग्य प्रमाणात चीक दिल्यास निरोगी सशक्त करडे तयार होतात.
  • करडांना चिक देत असताना तो एकाच वेळी न देता दिवसातून तीन ते चार वेळेस विभागून द्यावा.

दूध पाजणे

सुरवातीस एक महिन्यापर्यंत करडाच्या वजनाच्या 10 टक्के या प्रमाणात दूध पाजावे. त्यानंतर एक ते दोन महिने या काळात 10 ते 15 टक्‍क्‍यांपर्यंत दूध पाजावे.

 इतर नियोजन

  • वयाच्या दोन ते अडीच महिन्यात दूध हळूहळू कमी करीत पूर्ण बंद करावे आणि करडांना फक्त चारा आणि खादयावर वाढवावे. करडांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी दुधा व्यतिरिक्त चारा व खाद्य देणे आवश्‍यक आहे. करडे एक आठवडा वयाची झाल्यानंतर त्यांच्यासमोर तेव्हा पाला टांगून ठेवावा. त्यांना चारा खाण्याची सवय लागल्यास त्यांच्या पचन इंद्रियांची व पोटाची लवकर वाढ होऊन ते कार्यक्षम होतात.
  • जसजशी करडे मोठी होतात तसतशी त्यांच्या ओल्या व वाळलेल्या चाऱ्यामध्ये वाढ करावे. यामध्ये प्रामुख्याने हिरवा मका, लसूण घास, बरसिम, कडवळ, चवळी इत्यादी चारा तसेच बोर, अंजन, चिंच, सुभाभूळ, वड आणि पिंपळ इत्यादींचा पाला द्यावा. वाळलेल्या वैरणीचा मध्ये ज्वारीचा कडबा, भुईमूग पाला, हरभरा व तुरीचे काड द्यावे.
  • वाढत्या वयातील करडांना  चाऱ्याबरोबर 50 ते 100 ग्रॅम खुराक द्यावा. तसेच खुराकाचे प्रमाण 250 ते 300 ग्रॅम पर्यंत वाढवावी. खुराका मध्ये मक्का, ज्वारी,भुईमूग पेंड गव्हाचा कोंडा, खनिज मिश्रण मीठ व जीवनसत्वेत्यांचा समावेशअसावा.
  • करडांना स्वच्छ,मुबलक  पिण्याचे पाणी योग्य प्रमाणात द्यावे.
  • बोकडाचे खच्चीकरण साधारणपणे एक ते दोन महिन्यात करावे.
English Summary: for sucsessful goat keeping take proper management of nanny goat
Published on: 01 December 2021, 03:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)