Animal Husbandry

शेती व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा आणि दुधाचा व्यवसाय केला जातो. दुधाच्या व्यवसायात शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असतोआणि त्यातून शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करत असतात. सध्या देशात दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.देशातील एकूण वार्षिक उत्पन्नात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे

Updated on 03 December, 2021 4:22 PM IST

 शेती व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा आणि दुधाचा व्यवसाय केला जातो. दुधाच्या व्यवसायात शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असतोआणि त्यातून शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करत असतात. सध्या देशात दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.देशातील एकूण वार्षिक उत्पन्नात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झालेली आहे

यामध्ये जर गाईचे दूध असले तर त्याला अधिक मागणी असते. यासाठी जर तुम्ही डेअरी सुरू करण्याचा विचार करत असाल तर म्हशीसोबत गाय पाहणे गरजेचे आहे.या लेखामध्ये आपण अशाच दोन संकरित गाईंची माहिती घेणार आहोत.

अधिकच्या दूध उत्पादनासाठी संकरित गाई

जर्सी गाय- या गाई मुळात इंग्लंड मध्ये आढळतात.या गायी मध्यम आकाराच्या असतात तसेच त्यांचा रंग लाल, कपाळ रुंद आणि डोळे मोठे असतात. याचे वजन चारशे ते साडेचारशे किलोग्राम असते. या दिवसाला 12 ते 14 लिटर दूध देत असतात. या गाई भारतीय वातावरणात सहज राहत असतात. या गाईंची विशेषता म्हणजे या गाईंचे रोगप्रतिकारक क्षमताही चांगली असते.

  • एचएफ गाईंचा तुलनेत या गाई अधिक तापमान सहन करू शकतात.
  • फुले त्रिवेणी गाय- त्रिवेणी गाय ही तीन जातींचा संकर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील शास्त्रज्ञांनी अथक  परिश्रमातून या त्रिवेणी गाईची पैदास केली आहे. स्थानिक गिर गाय इत्यादी सोबत जर्सी या विदेशी वळूचा संकर करून 50 टक्के जर्सी आणि 50 टक्के गिरी गाय तयार करण्यात आली आहे.या संकरित गिर गायीची प्रजोत्पादन क्षमता, वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता तसेच दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण चांगले दिसून आले.

फुले त्रिवेणी गाय ची वैशिष्ट्ये

  • एका वितात जास्तीत जास्त सहा ते सात हजार लिटर दूध देते.
  • या फुले त्रिवेणी गाईच्या दुधात 5.2 टक्के फॅट मिळतो.
  • या गाईची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते.
  • पुढच्या पिढीतही दूध उत्पादनाचे प्रमाण टिकून राहते.
  • दुधात सातत्य राहते.
  • या गाईचा भाकड काळ हा 70 ते 90 दिवस आहे.
  • रोजच्या सरासरी दुधाचे प्रमाण 10 ते 12 लिटर असते.
  • त्रीवेणी गाईच्या दुधातील फॅट चार ते पाच पर्यंत असल्याचे आढळून आले आहे.
  • या जातीच्या कालवडी अठरा ते वीस महिने वयाच्या असताना माजावर येतात.
  • पहिली गर्भधारणा 20 ते 22 महिन्यात होते.
  • या गाईची आणखी वैशिष्ट्य म्हणजे दोन वेतातील अंतर 13 ते 15 महिने असते.
English Summary: for more milk production benificial of some cow species like as jursy,phule triveni
Published on: 03 December 2021, 04:22 IST