Animal Husbandry

बदक पालनातून आपल्याला रोजगारासह आपल्याला चांगला पैसा  मिळत असतो.  या व्यवसायात  कुक्कुटपालनपेक्षा कमी धोका असतो.  बदकच्या मांस आणि अंड्यामध्ये अधिक रोगप्रतिकारक शक्ती असते.

Updated on 04 May, 2020 6:24 PM IST


बदक पालनातून आपल्याला रोजगारासह आपल्याला चांगला पैसा  मिळत असतो.  या व्यवसायात  कुक्कुटपालनपेक्षा कमी धोका असतो.  बदकच्या मांस आणि अंड्यामध्ये अधिक रोगप्रतिकारक शक्ती असते.   कोंबड्यापेक्षा बदकांच्या मांसमध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते शिवाय बदकाचे मांस आणि अंडी प्रथिने समृद्ध असतात. मग अधिक नफा आणि अधिक प्रोटिनसाठी बदक पालन व्यवसाय करायलाच हवा. यासाठी आपण आज बदक पालनाविषयी माहिती घेणार आहोत.

अशी करा सुरुवात

बदक पालन करण्यासाठी आपल्याला चांगली शांत जागा निवडावी लागते. यासाठी जर तलावाशेजारी जर मिळाली तर अती उत्तम. पण जर बदक पालनाच्या ठिकाणी काही जलाशय नसला तरी काही हरकत नाही कारण आपण कृत्रिम पद्धतीचा तलाव, किंवा तळे बनवू शकतो.  जर तलाव किंवा तळे खोदण्यासाठी पुरेसा पैसा आपल्याकडे नसला तर आपण आपल्या शेतातील टीनशेड मध्ये चहूबाजूंनी २ते ३ फुट खोल आणि रुंद तळे बनवू शकता. या टीनशेडमध्येही बदक राहू शकतात.  एका बदकाला पाळण्यासाठी दीड वर्ग फूट जमिनीची आवश्यकता असते.

बदकांचा आहार - बदकांना प्रॉटिन असलेले अन्न अधिक द्यावे. बदकाच्या पिल्लांना २२ टक्के या प्रमाणात प्रॉटिन देणे आवश्यक असते. कोंबड्यांपेक्षा याचा खर्च १-२ टक्क्यांनी कमी असतो.

उपचार आणि काळजी

बदकांमधील आजारांविषयी जर आपण माहिती घेतली तर बदकांना डक फ्लूचा अधिक त्रास होत असतो. यामुळे त्यांना हा आजार होऊ नये यासाठी संरक्षण देणे आवश्यक असते. जर बदकांना जास्त ताप आला तर बदक मृत पावत असतात.  बदकाची पिल्ले ही एक महिन्याची झाल्यानंतर त्यांना डक फ्लू चे लसीकरण करावे. नियमितपणे  शेडची सफाई करावी. २ -२ महिन्यांनी शेडमध्ये कीटकनाशकांचा वापर ते स्वच्छ करावे.

English Summary: for more benefit in duck farming keep in mind these things
Published on: 04 May 2020, 04:47 IST