Animal Husbandry

शेती व्यवसाय सहज जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा आणि दुधाचा व्यवसाय केला जातो. दुधाचा व्यवसायात शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असतो आणि त्यातून शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करत असतात. सध्या देशात दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण वार्षिक उत्पन्नात 20 ते 30 टक्यांदि नी वाढ झालेली आहे. यात जर गाईचे दूध असले तर त्याला अधिक मागणी असते. यासाठी जर तुम्ही डेअरी सुरू करण्याचा विचार करत असाल तर म्हशी सह गाई ही पाळाव्यात.

Updated on 22 July, 2021 3:27 PM IST

 शेती व्यवसाय सहज जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा आणि दुधाचा व्यवसाय केला जातो. दुधाचा व्यवसायात शेतकऱ्यांना अधिक नफा मिळत असतो आणि त्यातून शेतकरी आपले उत्पन्न दुप्पट करत असतात. सध्या देशात दुधाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण वार्षिक उत्पन्नात 20 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झालेली आहे. यात जर गाईचे दूध असले तर त्याला अधिक मागणी असते. यासाठी जर तुम्ही डेअरी सुरू करण्याचा विचार करत असाल तर म्हशी सह गाई ही पाळाव्यात.

 या लेखात आपण अशाच तीन गाईंची माहिती देणार आहोत.

  • होल्स्टिन फ्रिजीयन म्हणजे एचएफ गाय:

सर्वाधिक दूध देणारी गाय म्हणून जगात या गाईची ओळख आहे.  या गाईचे शरीर मोठे असते. या गायिका आणि सफेद रंगाच्या असतात  तसेच या गाईचे वजन हे 580 किलोग्राम असते. या गाई अधिक दूध देतात परंतु या गाई जास्त तापमान सहन करू शकत नाह. पण या काही दूध देण्यात माहेर असून दररोज 25 ते 30 लिटर दूध देत असतात. मात्र त्यांच्या दुधातील फॅट कमी असते. साडेतीन टक्के फॅट त्याच्या दुधात असते. दिवसाला 30 लिटर दूध देणाऱ्या या गाई 40 ते 60 हजार रुपये मिळतात.

  • जर्सी गाय:

या गाई मुळात इंग्लंड मध्ये आढळतात. या गाई मध्यम आकाराच्या असतात याचा रंग लाल, कपाळ रुंद आणि डोळे मोठे असतात. याचे वजन चारशे ते साडेचारशे किलोग्राम असते. या गाई दिवसाला 12 ते 14 लिटर दूध देत असतात. या गावी कोणत्या वातावरणात राहतात म्हणजे भारतातील वातावरणात या गावी सहज राहत असतात. या गाईंची विशेषता म्हणजे या गाईंचे रोगप्रतिकारक क्षमताही चांगली असते. एचएफ गाईंचा तुलनेत या गाई अधिक तापमान सहन करू शकतात.

  • फुले त्रिवेणी गाय- त्रिवेणी गाय ही तीन जातींचा संकर आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील शास्त्रज्ञांनी आता परिश्रमातून या त्रिवेणी गाईची पैदास केली आहे. स्थानिक गिर गाय इं बरोबर जर्सी या विदेशी वळूचा संकर करून 50 टक्के जर्सी आणि 50 टक्के गिर ही गाय तयार करण्यात आली आहे. या संकरित गिर गायी ची प्रजोत्पादन क्षमता, वातावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता तसेच दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण चांगले दिसून आले.

या गाईची वैशिष्ट्ये

  • एका वितात जास्तीत जास्त सहा ते सात हजार लिटर दूध देते.
  • या फुले त्रिवेणी गाईच्या दुधात 5.2 टक्के फॅट मिळतो.
  • या गाईचे रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे.
  • पुढच्या पिढीतही दूध उत्पादनाचे प्रमाण टिकून राहते.

 

  • दुधात सातत्य राहते.
  • या गाईचा भाकड काळ हा 70 ते 90 दिवस आहे.
  • रोजच्या सरासरी दुधाचे प्रमाण 10 ते 12 लिटर असते.
  • त्रिवेणी गाईच्या दुधातील फॅट चार ते पाच पर्यंत असल्याचे आढळून आले आहे.
  • या जातीच्या कालवडी अठरा ते वीस महिने वयाच्या असताना माजावर येतात.
  • पहिली गर्भधारणा 20 ते 22 महिन्यांत होते.
  • या गाईच्या आणखी वैशिष्ट्य म्हणजे दोन वेतातील अंतर 13 ते 15 महिने असते.

 

English Summary: for milk production breeding cow are useful
Published on: 22 July 2021, 03:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)