Animal Husbandry

भारतात जवळपास निम्म्याहून अधिक जनसंख्या शेतीवर निर्धारित आहे असे असले तरी जे अल्प भूधारक शेतकरी बांधव आहेत त्यांचे मात्र फक्त शेतीतुन उदरनिर्वाह होत नाही म्हणुन जोडधंदा म्हणुन बरेचसे शेतकरी पशुपालनकडे वळतात. भारतात फार पूर्वीपासून गाय म्हैस बरोबरच शेळीपालन करण्यात येत आहे. शेळीपालन करण्याचा एक फायदा आहे जे अल्पभूधारक किंवा भूमिहीन शेतकरी पैशामुळे गाय किंवा म्हैस पाळू शकत नाहीत ते कमी पैशात शेळीपालन करू शकतात. शेळीपालनात कमी खर्च असतो आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न खूपच जास्त असते.

Updated on 12 September, 2021 7:54 PM IST

भारतात जवळपास निम्म्याहून अधिक जनसंख्या शेतीवर निर्धारित आहे असे असले तरी जे अल्प भूधारक शेतकरी बांधव आहेत त्यांचे मात्र फक्त शेतीतुन उदरनिर्वाह होत नाही म्हणुन जोडधंदा म्हणुन बरेचसे शेतकरी पशुपालनकडे वळतात. भारतात फार पूर्वीपासून गाय म्हैस बरोबरच शेळीपालन करण्यात येत आहे. शेळीपालन करण्याचा एक फायदा आहे जे अल्पभूधारक किंवा भूमिहीन शेतकरी पैशामुळे गाय किंवा म्हैस पाळू शकत नाहीत ते कमी पैशात शेळीपालन करू शकतात. शेळीपालनात कमी खर्च असतो आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न खूपच जास्त असते.

गाय किंवा म्हैस यांना जास्तीच्या आहाराची गरज असते पण शेळ्यांना मात्र जास्त आहाराची गरज नसते ते झाडांचा पाला किंवा रानातील गवत खाऊन आपला आहार भागवून घेतात. ह्या सर्व्या गोष्टींचा हिशोब लावला तर शेळीपालन हे खूपच परवडत आणि शेळीपालनात खर्च खूपच नगन्य असतो. एवढेच नाही तर शेळीपालणासाठी बँकाकडून लोन देखील मिळते आणि सरकार कडून सबसिडी पण मिळते.

बकरीचे दुध आरोग्यासाठी खूपच असते गुणकारी

शेळीच्या दुधात लहान-लहान फॅटचा कण असतात. तसेच, त्यात उपलब्ध असलेले प्रथिने लहान मुलांमध्ये दुधामुळे उलटी येण्याच्या समस्येला कमी करण्यास मदत करते.  शेळीच्या दुधात गाईच्या दुधापेक्षा सेलेनियम, नियासिन आणि व्हिटॅमिन ए जास्त असते.  अनेक शोध हे दाखवतात की शेळीच्या दुधात गाईच्या दुधाच्या तुलनेत ऍलर्जी-उत्तेजक घटक नसतात. याव्यतिरिक्त, त्यात दुग्धशर्कराचे म्हणजेच साखरेचे प्रमाण देखील गाईच्या दुधापेक्षा खूपच कमी असते.

अरे वा! मस्तच बकरीचे दुध ठरते ह्या आजारात फायदेशीर

शेळीचे दूध रक्तदाब नियंत्रित करते. शेळीचे दुध रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. यासोबतच शेळीच्या दुधाच्या नित्य सेवणाने आपली हाडे मजबूत होतात. एका संशोधनात असे दिसून आले आहे की शेळीचे दूध पिल्याने आतड्यात होणारी जळजळ कमी होते. म्हणुनच सांगितले जाते की, रोज एक ग्लास बकरीचे दूध पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

बरं का मंडळी बकरी पालणासाठी भेटत लोन

हे बघा आपल्याला बँकेकडून मिळणारे लोन हे एक प्रकारचे वर्किंग कॅपिटल आहे ज्याचा वापर आपण शेळीपालणासाठी करू शकतो. साहजिकच कोणत्याही व्यवसाय सुरु करण्यासाठी ज्या प्रकारे पैशांची गरज भासते त्याप्रकारेच शेळीपालणासाठी देखील पैशांची गरज भासणारच. वर्किंग कॅपिटल गरजा पूर्ण करण्यासाठी आणि कॅश फ्लो राखण्यासाठी, ग्राहक विविध खाजगी आणि सरकारी बँकांनी देऊ केलेल्या शेळीपालन कर्जाची निवड करू शकतात.

कोणकोणत्या कामासाठी वापरता येणार लोन

शेळीपालनासाठी मिळणाऱ्या कर्जाचा वापर जमीन खरेदी, शेड बांधकाम, शेळ्या खरेदी, चारा इ. कामासाठी केला जाऊ शकतो. सरकारने शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक नवीन योजना आणि अनुदान सुरू केले आहेत. बँका किंवा कर्ज देणाऱ्या संस्थांच्या मदतीने सुरू केलेल्या काही प्रमुख योजना आणि सबसिडी यांची माहिती खाली दिल्या आहेत.

 शेळीपालणासाठी सबसिडी पण मिळते बरं!

नाबार्ड हे विविध बँका व काही वित्तीय संस्था यांच्या माध्यमातून लोक कल्यानासाठी पशुपालनसाठी लोन देते. नाबार्डच्या योजनेनुसार, जे लोक दारिद्र्य रेषेखालील, एससी/एसटी श्रेणीत येतात त्यांना शेळीपालनावर 33 टक्के अनुदान मिळते. इतर लोक जे ओबीसी आणि ओपन कॅटेगरी अंतर्गत येतात त्यांना 25 टक्के सबसिडी मिळते. जे जास्तीत जास्त 2.5 लाख रुपये असेल.

 कोणकोणत्या बँका देतात बरं शेळीपालणासाठी लोन

1.SBI

  1. नाबार्ड पण खाली दिलेल्या बँकेच्या माद्यमातून लोन देते

»व्यापारी बँक

»प्रादेशिक ग्रामीण बँक

»राज्य सहकारी कृषी आणि ग्रामीण विकास बँक

»राज्य सहकारी बँक

»अर्बन बँक इ.

3.कॅनडा बँक

4.आयडीबीआय बँक

5.बकरीपालणासाठी मुद्रा लोन पण भेट

 

शेळीपालणासाठी लोन घेण्यास लागणारे कागदपत्रे

»4 पासपोर्ट साईजचे फोटो

»मागील 6 महिन्यांचे बँकचे स्टेटमेंट

»रहिवाशी पुरावा

»उत्पन्नाचा पुरावा

»आधार कार्ड

»बीपीएल कार्ड, उपलब्ध असल्यास

»जात प्रमाणपत्र, जर SC/ ST/ OBC

»अधिवास प्रमाणपत्र

»शेळीपालन प्रकल्प अहवाल

»जमीन नोंदणी दस्तऐवज

 

English Summary: for goat farming recceive loan by bank
Published on: 12 September 2021, 07:54 IST