Animal Husbandry

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणत आहेत. या योजनांचा फायदा घेऊन शेतकरी शेतीचा विकास चांगल्या पद्धतीने करू शकतात व त्यांच्या आर्थिक उत्पन्न सुधारू शकते. तसेच तरुणांना स्वयंरोजगार देण्यासाठी शेतकरी व तरुणांना मदतीसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागात शेतीशी संलग्न असलेले बरेच व्यवसाय आहेत.त्यामध्ये दुग्धव्यवसाय हा सगळ्यात महत्त्वाचा आणि भरपूर नफा देणारा व्यवसाय आहे.

Updated on 25 September, 2021 2:25 PM IST

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आणत आहेत. या योजनांचा फायदा घेऊन शेतकरी शेतीचा विकास चांगल्या पद्धतीने करू शकतात व त्यांच्या आर्थिक उत्पन्न सुधारू शकते. तसेच तरुणांना स्वयंरोजगार देण्यासाठी शेतकरीवतरुणांना मदतीसाठी अनेक प्रकारच्या योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागात शेतीशी संलग्न असलेले  बरेच व्यवसाय आहेत.त्यामध्ये दुग्धव्यवसाय हा सगळ्यातमहत्त्वाचा आणि भरपूर नफा देणारा व्यवसाय आहे.

आपल्या गावातच एखादी दूध डेअरी सुरू करून आपण निमित्त उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो.याच दूध डेरी स्थापन करण्यासाठी डेअरी उद्योग विकास योजनेअंतर्गत नाबार्डकडून कर्ज वअनुदान दिल्या जाते. या योजनेअंतर्गत  तुम्ही दोन ते दहा गाईची दूध डेरी उभारण्यासाठी नाबार्डकडून अनुदान दिले जाते. या लेखात आपण या योजनेविषयी माहिती द्या

 दुग्ध उद्योजक विकास योजना नेमकी काय आहे?

 योजना केंद्र सरकार द्वारे चालवली जाते. या योजनेच्या माध्यमातून एकूण प्रकल्प खर्चा वर पशुपालन करणाऱ्या व्यक्तीला 33.33 टक्‍क्‍यांपर्यंत सबसिडी दिली जाते.नाबार्ड या योजनेसाठी कर्जमाफी प्रदान करते. या योजनेमध्ये दहा म्हशीच्यादुग्धशाळेसाठी सात लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत सामान्य प्रवर्गातील लोकांना 25 टक्‍क्‍यांपर्यंत सबसिडी आहे. विशेष म्हणजे कोणत्याही श्रेणीतील महिलांसाठी अनुदानाचा दर हा 33.33 टक्के आहे.

 या योजनेअंतर्गत डेरी उद्योगासाठी तुमची स्वतःची गुंतवणूक किती असेल?

 जर तुम्हाला स्वतःचा डेअरीचा प्लांट उघडायचा असेल तर त्या प्रकल्पाच्या एकूण किमान 10 टक्के रक्कम तुम्हाला गुंतवावी लागते. यात महत्त्वाचे म्हणजे डीइडीएस योजनेअंतर्गत दुग्ध कर्ज मंजुरीच्या नऊ महिन्यांच्या आत सुरू केले जाणे अपेक्षित असते. यापेक्षा जास्त काळ लागला तर सबसिडीचा लाभ मिळत नाही. विशेष एक लक्षात घेण्यासारखं म्हणजे या योजने अंतर्गत दिलेली सबसिडी बॅक एंडेड सबसिडी असते.म्हणजे नाबार्डच्या बँकेकडून कर्ज घेते त्याच बँका ला अनुदानाची रक्कम जाहीर करेल.

 या योजनांतर्गत कोणत्या गोष्टीसाठी कर्ज मिळते?

 या योजनांतर्गत तुम्हाला गाय म्हैस, दुधाचे मशीन दुभत्या जनावरांच्या खरेदीसाठी, कोणत्याही दुग्धजन्य वस्तूंच्या खरेदीसाठी, डेरी प्लांट शेड बनवण्यासाठी कर्ज दिले जाते.

 या योजनेसाठी कोण पात्र असतात?

  • शेतकरी
  • वैयक्तिक उद्योजक
  • स्वयंसेवी संस्था
  • कंपन्या
  • असंघटित आणि संघटित क्षेत्र गट
  • संघटित क्षेत्रातील समाजामध्ये बचत गट
  • डेअरी सहकारी संस्था
  • दूध संस्था आणि दूध संघ इत्यादी

डेअरी स्थापन करण्यासाठी अर्ज कसा करावा?

 यासाठी तुम्हाला डेअरीची नोंदणी करावी लागते.नंतर तुम्हाला बँकेत जाऊन सबसिडी फॉर्म भरावा लागेल आणि त्यातअर्ज करावा लागतो.

जर तुमच्या कर्जाची रक्कम मोठी असेल तर व्यक्तीला नाबार्डला तुमच्या प्रकल्पाचा अहवाल सादर करावा लागतो. नंतर दुग्ध शाळेसाठी एक स्वच्छ आणि तपशीलवार प्रकल्प तयार करावा लागेल. ज्या प्रकल्पांमध्ये दुग्ध शाळेचे स्थान, जनावरांची संख्या आणि खर्च इत्यादी सर्व माहिती असावी. नंतर हा प्रकल्प नाबार्डने अधिकृत केलेल्या बँकेकडे घेऊन जावे लागते आणि कर्जासाठी अर्ज करायलालागतो.

 अधिक माहितीसाठी नाबार्डची वेबसाईट www.nabard.orgया संकेतस्थळावर भेट द्यावी.

English Summary: for dairy establishment give loan nabaard
Published on: 25 September 2021, 02:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)