Animal Husbandry

जास्त दूध व फॅट मिळवण्यासाठी तसेच त्यापासून विविध उपपदार्थ बनवण्यासाठी लागणारी गुणवत्ता आपल्या दूध उत्पादनामध्ये आणण्यासाठी व्यवस्थापन कौशल्य आत्मसात केली पाहिजे.यामध्ये जनावरांचे आरोग्य, स्वच्छ दूध,संतुलित आहार आणि पाणी व्यवस्थापन फार महत्वाचा असते.

Updated on 20 November, 2021 4:57 PM IST
AddThis Website Tools

जास्त दूध व फॅट मिळवण्यासाठी तसेच त्यापासून विविध उपपदार्थ बनवण्यासाठी लागणारी गुणवत्ता आपल्या दूध उत्पादनामध्ये आणण्यासाठी व्यवस्थापन कौशल्य आत्मसात केली पाहिजे.यामध्ये जनावरांचे आरोग्य, स्वच्छ दूध,संतुलित आहार आणि पाणी व्यवस्थापन फार महत्वाचा असते.

 दूध उत्पादन वाढण्यासाठी दुभत्या  जनावरांचे चारा आणि खाद्य व्यवस्थापन व्यवस्थित करणे फार आवश्‍यक असते. या लेखात आपण दुभत्या गाय आणि म्हशीचेचार आणि खाद्य व्यवस्थापन कसे करावे याबद्दल माहिती घेऊ.

दुभत्या गाई व म्हशी खाद्य आणि चारा व्यवस्थापण

  • जनावरांच्या व्यवस्थापनावरील एकूण खर्चापैकी सुमारे 70 ते 75 टक्के खर्च हा खाद्य आणि चाऱ्यावर होतो.
  • गाई,म्हशीना त्यांचे वजन, दूध उत्पादन याप्रमाणे व दूध उत्पादनाच्या स्थितीप्रमाणे सर्व खाद्य घटक मिळाले पाहिजेत. पशुखाद्यतील प्रथिने, फॅट, फायबर, कर्बोदके, एकूण सर्व प्रकारची खनिजे इत्यादी घटकांचे प्रमाण दूध उत्पादनानुसार ठेवावे. यासाठी आपल्या गोठ्यातील जनावरांचे विभाजन करावे.
  • सर्व जनावरांना सारखेच पशु खाद्य दिल्यास खर्चही वाढतो.पोषण व्यवस्थित मिळणार नाही म्हणून गोठ्यातील जनावरांचा गट पडावेत. यामध्ये पहिल्या गटात ताज्या विलेल्या( पहिले तीन महिने), दुसऱ्या गटात मधील काळात विलेल्या ( विल्यानंतर तीन ते सहा महिने व नुकत्याच गाभण झालेल्या) आणि तिसर्‍या गटात उशिरापर्यंत च्या काळातील ( विल्यानंतर सहा ते नऊ महिने व गाभण ) आणि चौथ्या गटात भाकड अशा पद्धतीने विभाजन करावे.
  • संतुलित पशुखाद्य तयार करण्यासाठी पशुआहार तज्ञांचा सल्ला घ्यावा. जनावरांना त्यांच्या वजनाच्या तीन ते साडेतीन टक्के चारा व खाद्य  ( कोरडे पदार्थ स्वरूपात )द्यावे. सुमारे 400 ते 500 किलो वजन व 15 ते 20 लिटर दूध देणाऱ्या गाईला सुमारे सहा ते सात किलो पशुखाद्य किंवा अंबोन ( घरगुती प्रकारचे सरकी,मका चुनी व इतर कच्चामाल एकत्र करून तयार केलेले पशुखाद्य ) विभागून दोन वेळेस द्यावे.

चारा( हिरवा व कोरडा)/ सायलेज

  • गाई व म्हशींच्या आहारातील चारा किंवा सायलेजचे एकूण प्रमाण सुमारे 20 ते 22 किलो कोरडा चाऱ्याचे प्रमाण पाच ते सहा किलो इतके ठेवावे. निरव या साऱ्या मधून जनावरांना जीवनसत्त्व ए व ई मिळते. यासाठी मका, डी एच एन सहा, नेपियर व हत्ती गवत यांचा वापर करावा.
  • कोरडा चारा कुट्टी करून द्यावा.कोरड्या चाऱ्यामुळे जनावरे व्यवस्थित रवंथ करतात.दुधामधील फॅट वाढवण्यासाठी मदतहोते.हिरव्या वैरणीचा प्रमाण वाढल्यास काही वेळा शेण पातळ होण्याची तक्रार वाढते.
English Summary: foder and feed management in animal husbundry
Published on: 20 November 2021, 04:57 IST