अगोदर कुक्कुटपालन हा व्यवसाय एक परसबागेत केला जाणारा व्यवसाय होता. त्यावेळी पाळल्याजाणाऱ्या कोंबड्या हे त्यांचे खाद्य उत्तरेतून किंवा वाया जाणाऱ्या अन्नातून मिळवत असत.
परंतु विसाव्या शतकापासून पोल्ट्री उद्योग यामध्ये बरेच शास्त्रीय संशोधन झाले व या व्यवसायाने उद्योगाचे म्हणजे पोल्ट्री इंडस्ट्रीजच्या रूपाने विकसित झाले. कोंबडी पालनाचा व्यवसाय अधिक फायदेशीर होण्यासाठी कोंबड्यांना लागणारा आहार हा समतोल आहार देणे गरजेचे आहे.असा संतुलित आहार कोंबड्यांना खायला दिल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचा जास्तीत जास्त उपयोग मांस आणि अंडी यांच्या उत्पादनासाठी होऊ शकतो हेही प्रयोगांनी सिद्ध झाले. तसेच कोंबड्यांच्या वयोमानाप्रमाणे व शारीरिक गरजेनुसार विविध अन्न घटकांची आवश्यकता विविध प्रयोगांती सिद्ध झाल्यामुळे खादयातील घटकांमध्ये फेरफार करणे उपयुक्त ठरले. कोंबड्यांना लागणारे खाद्य तपासून घ्यावे तसेच पुढील काही दिवसात अपेक्षित लागणारे खाद्य मोजून घ्यावे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे शिल्लक असलेल्या कोंबड्या, वातावरणामध्ये पुढील काही दिवसात होणारी त्यांची वाढ, बाजारपेठेची मागणी आणि शिल्लक खाद्य या बाबींचा विचार करून नवीन खाद्य खरेदी करावे. बऱ्याचदा कोंबड्यांच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे खाद्याची नासाडी होते. जर आपण विचार केला तर एका कोंबडी मागे 50 ते 100 ग्रॅम खाद्य नासाडी झाल्यास साधारण अडीच ते तीन रुपयांचे नुकसान एका कोंबडी मागे होते त्यामुळे काटेकोरपणे खाद्य व्यवस्थापन करणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे.
अशा पद्धतीने करावे ब्रॉयलर कोंबड्यांचे खाद्य व्यवस्थापन…
- शेडमध्ये वेगळ्या खोलीत खाद्याच्या पोत्यांची व औषधांची साठवण करावी.
- खाद्याची गुणवत्ता खराब होणार नाही याची दक्षता घ्यावी.
- शेडच्या भिंतीपासून एक फूट लांब आणि जमिनीच्या वर एक फूट उंचीवर लाकडी फळ्यांची रॅक बनवून त्यावर 5,5 च्या लॉटमध्ये खाद्याचे बॅगा ठेवाव्यात.
- खाद्य ठेवण्याची जागा कोरडी असावी तसेच जास्त प्रमाणात खाद्य एकत्र ठेवल्यास त्यामध्ये उष्णता वाढून खाद्याची प्रतवारी खराब होण्याची शक्यता बळावते.
- खाद्य ठेवण्याच्या जागेवर उंदीर होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण उंदीर खूप जास्त प्रमाणात खाद्याचे नासाडी करतात.
- खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी पन्नास पिल्लांसाठी एक फिडर असेल त्याप्रमाणे नियोजन करणे महत्त्वाचे असते. तसेच फिटर जवळ पिल्लांची गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
- शक्य असल्यास एका आठवड्याला खाद्याची भांडी स्वच्छ करून घ्यावीत.
- खाली शेडमध्ये असलेल्या तूस व खाद्य पडणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी. तसेच सांडलेले खाद्य आणि त्यासहतूसपक्षांनी खाल्ली तर आजार होण्याची शक्यता वाढते.
- खाद्या सोबत पाणी देण्यासाठी पिल्ले व मोठ्या कोंबडी यांच्यासाठी प्रत्येकी 50 साठी एक ड्रिंकर असणे महत्वाचे आहे.
- खाद्य हे पिल्ले व कोंबड्यांच्या वाढीसाठी खुप आवश्यक असून त्यामुळे खाद्य व्यवस्थापनाकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
Published on: 14 February 2022, 04:26 IST