मत्स्य शेतीकडे बऱ्याच शेतकऱ्यांचा ओढा असल्याचे दिसून येते. आता मत्स्य शेतीमध्ये नव-नवीन प्रयोग केले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा फायदा होणार आहे. मत्स्य शेतीच्या या नव्या पद्धतीमुळे आपण कमी पाण्यात आणि कमी खर्चात अधिक माशांचे पालन करु शकतो. या पद्धतीला बायोफ्लॉक्स पद्धत म्हटलं जातं. ही एक वैज्ञानिक पद्धत असून यात अनेक प्रजातीचं पालन केले जाते. शेतकरी तळे न बनवता एका टाकीत मत्स्य पालन करु शकतो. पँगासिअस मासा, तिलापिया, देशी मंगुर, सिंधी मासा, कॉमन कार्प, हे मासे बायोफ्लॉक्स पद्धतीत पालन करण्यात येते.
काय आहे बायोफ्लॉक्स पद्धत
या पद्धतीने आपण कमी खर्चात मत्स्य पालन करु शकतो. यात आपण एका टाकीत मत्स्य पालन केले जाते. ही पद्धत बॅक्टेरियाच्या विष्ठा आणि जास्तीचे अन्न प्रथिने पेशींमध्ये रूपांतरित करते. यानंतर, हे फिश फूडमध्ये वापरले जाते. यामध्ये बायोफ्लोक्स, एकपेशीय वनस्पती, बॅक्टेरिया, प्रोटोझोआन आणि सेंद्रिय पदार्थांचा समावेश आहे त्यामध्ये सुमारे २५ ते ५० टक्के प्रथिने आढळतात. यासह सुमारे ५ ते १५ टक्के चरबी आहे.
या पद्धतीसाठी २४ तास वीज हवी असते. विना विजेचे मत्स्य पालन केले जाऊ शकत नाही. यात एक ऐरोबिक बॅक्टोरिआ पाळला जातो. त्याला जिवंत ठेवण्यासाठी नेहमी हवेची गरज असते. यासह या प्लांटला सिमेंट टाकी, तिरपाल टाकी, एरिएशन सिस्टम, विजेची उपलब्धता, प्रोबायोटिक्स, मत्स्य बीज या साहित्यांची आवश्यकता असते.
मत्स्य पालनाचा आर्थिक लाभ-
जर आपण या पद्धतीने मत्स्य शेती केली तर आपल्याला नक्कीच लाखो रुपयांचा फायदा होणार आहे. जर १० हजार लिटर पाणी साठवण्याची क्षमता असलेली टाकी आपल्याकडे असेल तर आपल्याला ३२ हजार रुपयांचा खर्च होईल. पण ५ वर्षापर्यंत खर्च करण्य़ाची गरज नाही. बरेच लोकांना मासे खाण्यास आवडत असल्याने बाजारात माश्यांना मोठी मागणी आहे. हे एक स्वादिष्ट, प्रथिने आणि जीवनसत्व मिळवण्याचे स्त्रोत आहे. भारत सरकारने मत्स्यपालनासाठी बर्याच योजना चालवल्या आहेत. मत्स्यपालनासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना ४०टक्के अनुदान शासन दिले जाते. याशिवाय एससी, एसटीसह दुर्बल घटकांना ६० टक्के अनुदान दिले जाते.
Published on: 25 April 2020, 11:31 IST