Animal Husbandry

जे शेतकरी भाताचे लागवड करतात अशा शेतकऱ्यांसाठी दुप्पट कमाई करण्याची चांगली संधी आहे.यासाठी शेतकऱ्यांना भाताची लागवड एका विशिष्ट पद्धतीने करावी लागते. या विशिष्ट प्रकारे करण्यात येणाऱ्या भातशेतीला फिशराईस फार्मिंग असे म्हणतात. या विशिष्ट प्रकारच्या शेतीत भात लागवडीमध्ये मासे पालनही करण्यात येते.त्यामुळे शेतकऱ्यांना धान आणि मासे विक्रीतून असा दुहेरी फायदा होतो.

Updated on 08 December, 2021 8:45 PM IST

जे शेतकरी भाताचे लागवड करतात अशा शेतकऱ्यांसाठी दुप्पट कमाई करण्याची चांगली संधी आहे.यासाठी शेतकऱ्यांना भाताची लागवड एका विशिष्ट पद्धतीने करावी लागते. या विशिष्ट प्रकारे करण्यात येणाऱ्या भातशेतीला फिशराईस फार्मिंग असे म्हणतात. या विशिष्ट प्रकारच्या शेतीत भात लागवडीमध्ये मासे पालनही करण्यात येते.त्यामुळे शेतकऱ्यांना धान आणि मासे विक्रीतून असा दुहेरी फायदा होतो.

फिश राईस फार्मिंग कसे करतात?

या शेतीमध्ये भात पिकामध्ये साठलेल्या पाण्यात मासे पालन केले जाते. अशाप्रकारे धान आणि मासे त्याच्या विक्रीतून दुप्पट उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते.यामध्ये शेतकरी भाताची लागवड करणे आदी फिशकल्चर तयार करू शकता.याशिवाय शेतकरी फिष कल्चर देखील खरेदी करू शकतात. अशा प्रकारची शेती केल्यास मत्स्यशेतीतून चांगला फायदा होऊ शकतो.यामध्ये माशांचे उत्पादन, भात लागवडीच्या पद्धती, माशांच्या प्रजाती आणि त्यावरील व्यवस्थापन वर देखील अवलंबून असते.

या प्रकारच्या शेतीत मासे आणि भात पीक एकाच शेतात घेतले जातात. माशांमुळे  तांदळाच्या उत्पादनावर कुठलाही प्रकारचा परिणाम होत नाही.एकाच शेतात एकत्रितपणे मत्स्य पालन केल्यानेभातरोपांची रोगांपासून मुक्तता मिळते.

फिश राईस फार्मिंग  साठी कोणती शेत जमीन निवडावी?

फिश राईस फार्मिंग साठी कमी उतार असलेली जमीन निवडणे महत्वाचे असते. या प्रकारच्या शेतात पाणी सहजतेने जमा होते.

तसेच शेताची तयारी करण्यासाठी सेंद्रिय खतांवर अवलंबून राहावे. साधारणपणे मध्यम पोत असलेली गाळाची माती उत्तम असते.

फिशराइस फार्मिंग कुठे कुठे केली जाते?

 अशा प्रकारची शेती सध्या बांगलादेश,मलेशिया,कोरिया, इंडोनेशिया,थायलंड आणि चीन या देशात केली जाते. भारताच्या काही भागात देखील फिश राइस शेतीच्या माध्यमातून शेतकरी चांगले उत्पन्न मिळवतआहेत.

English Summary: fish rice farming is benificial method in fishary and give most benifit to farmer
Published on: 08 December 2021, 08:45 IST