1. पशुसंवर्धन

शेळ्यांच्या आहाराकडे द्या लक्ष; अन् मिळवा भरघोस उत्पन्न

KJ Staff
KJ Staff


अगदी कमी पैशात भरघोस उत्पन्न देणारा एकमात्र स्रोत म्हणजे शेळीपालन. डोंगराळ आणि दुष्काळी भागात शेळीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. कमीत कमी जागेत आणि कमी मजूराच्या मदतीने शेळीपालन केले जाते. एका दोन माणसे शेळीपालनाचा व्यवसाय सहज करु शकतात. यामुळे शेळीपालन फार खर्चिक नाही, तर अधिक फायदा देणारे आहे. मजूरी, अल्पभधारक, पशुपालनाची आवड असणाऱ्यांसाठी शेळीपालन हा खूप फायदेशीर व्यवसाय आहे. महाराष्ट्रात मुख्यत: चार प्रकारच्या शेळ्या पाळल्या जातात.

उस्मानाबादी, संगमनेरी शेळी, सुरती, कोकण कन्याल या शेळ्या राज्यात पाळल्या जातात.  शेळी पालन करताना जर आपल्याला अधिक उत्पादन हवे असेल तर शेळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागते, यासह त्यांच्या आहारकडेही लक्ष दिले पाहिजे.   शेळ्या कोणताही चारा खात असल्या तरी आपल्याला त्याकडे लक्ष दिले पाहिजे.  आज आपण त्याच्या आहाराविषयी जाणून घेणार आहोत.  करडांच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी दुधाव्यतिरिक्त चारा व खाद्य देणे आवश्यक आहे.  करडे एक आठवडा वयाची झाल्यानंतर त्यांच्यासमोर हिरवा पाला टांगून ठेवावा. त्यांना चारा खाण्याची सवय लागल्यास त्यांच्या पचन इंद्रियांची व पोटाची लवकर वाढ होऊन ते कार्यक्षम होते.  शेळीपालनातून अधिक नफा मिळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीने शेळ्या व करडांचे व्यवस्थापन आवश्यक आहे.  शेळ्यांची एक चमत्कारिक गोष्ट असते. वरचा हलत्या ओठाच्या साहाय्याने त्या बारीक गवतही खाऊ शकतात.   शेळ्यांच्या अशाच काही सवयी आधी आपण जाणून घेऊ.

शेळ्यांच्या आहारविषयक सवयी:

⦁ वरचा हलता ओठ आणि जिभेच्या साहाय्याने शेळ्या खूप लहान गवत खाऊ शकतात आणि थोड्या उंचीवरील (झुडपे ,लहान झाडे) पाल्यावर चरू शकतात.
⦁ शेळ्या खाण्याच्या बाबतीत अतिशय चोखंदळ असतात.
⦁ शेळ्या विविध प्रकारचा पाला आणि वनस्पती खाऊ शकतात.
⦁ शेळ्या वेगवेगळ्या प्रकारची चव ओळखू शकतात (कडू,गोड,आंबट,खारट).
⦁ जिथे वनस्पतींचा पुरवठा तुरळक असतो तिथे शेळ्या औषधी वनस्पती आवडीने खातात आणि त्यामुळे वाळवंटात त्या सुद्धा राहू शकतात.
⦁ शेळ्यांमध्ये खनिज मिश्रणाची गरज जास्त असते.
⦁ काष्ठतंतूचा वापर करण्याची शेळ्यांमध्ये अद्भुत क्षमता असते.
⦁ पायाभूत चयापचय दर आणि थायरोक्झीनचे प्रमाण शेळ्यांमध्ये जास्त असल्यामुळे शेळ्यांना जास्त खाद्य लागते.
⦁ द्विदल जातीचा चारा शेळ्या आवडीने खातात.

चाऱ्याचे प्रमाण खालीलप्रमाणे असावे: हिरवा चारा: ३ ते ४ किलो
वाळलेला चारा: ०.५०० ते १ किलो
पशुखाद्य: २५० ते ३०० ग्रम
शेळ्यांचे खाद्यामध्ये क्षार व जीवनसत्वांचा अपुरा पुरवठा असल्यास क्षारविटा गोठ्यात उपलब्ध कराव्यात. मांसल शेळ्यांना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या ३ ते ४ टक्के शुष्क पदार्थांची गरज असते. दुध देणाऱ्या शेळ्यांना त्यांच्या शरीराच्या वजनाच्या ५ ते ७ टक्के शुष्क पदार्थांची गरज असते. शेळ्यांना संतुलित आहार तयार करण्याच्या सुत्राविषयी आपण जाणून घेवू

करडांसाठी व दूध देणाऱ्या
माद्यांसाठी
खाद्य घटक सुत्र क्रमांक १ सुत्र क्रमांक २
मका ५०% ३७%
शेंगदाणा पेंड २०% २५%
गुळाची/ साखरेची मळी  १०% -
गव्हाचा कोंडा  ७% २०%
मासळीचा चुरा  १०% -
खनिज मिश्रण १% १%
चुना १% १.५%
मीठ १% ०.५%
हरभरा १% १५%

वरील संतुलित आहारामध्ये १८ टक्के प्रथिने आणि ७५ टक्के पचनीय घटक असतात. 

पैदाशी बोकड व माद्यांसाठी
खाद्य घटक मिश्रणाचे प्रमाण
गव्हाचा तांदळाचा भुसा ४५ टक्के
शेंगदाणा पेंड २० टक्के
मका ज्वारी १२ टक्के
गुळाची/ साखरेची मळी १० टक्के
डाळीचा भरडा १० टक्के
मीठ १ टक्के
चुना १ टक्के
खनिज मिश्रण १ टक्के

वरील संतुलित आहारमध्ये १५ प्रथिने आणि ६५ - ७० पचनीय घटक असतात.

लेखक:
डॉ. सागर अशोक जाधव, (M.V.Sc., पशूपोषण शास्त्र विभाग)
मोबाईल - ९००४३६१७८४.

 

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters