पोल्ट्री फार्म व्यवसायात खाद्य व्यवस्थापनाला फार महत्त्व आहे. कोंबड्यांच्या वाढीसाठी पोषक आहार गरजेचा असतो. अशा वेळी त्यांना पिल्लांच्या अवस्थेत आणि मोठे झाल्यावर ही खाद्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन आवश्यक असते. खाद्य चांगले साठवणे आणि वेळ देणे असे दोन्ही घटक यामध्ये येतात. त्यासाठी पोल्ट्री शेडमध्ये विशेष लक्ष पुरवणे गरजेचे असते.
पोल्ट्री शेड मध्ये खाद्य व्यवस्थापन कसे करावे?
- शेडमध्ये वेगळ्या खोलीत खाद्याच्या पोत्यांची व औषधांची साठवण करावी.
- खाद्याची गुणवत्ता खराब होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
- भिंतीपासून एक फूट लांब आणि जमिनीच्या वर एक फूट उंचीवर लाकडी फळ्यांची रॅक बनवून त्यावर 5,5 त्या लॉटमध्ये पोते ठेवावेत.
- खाद्य ठेवण्याची जागा कोरडी असावी तसेच जास्त प्रमाणात खाद्य एकत्र ठेवल्यास उष्णता वाढून खाद्याची प्रतवारी खराब होते.
- ज्या ठिकाणी आपण खाद्य ठेवलेले आहेत याठिकाणी उंदीर होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण उंदीर हे खाद्याची नासाडी करतात.
- खाद्याचा अपव्यय टाळण्यासाठी पन्नास पिल्लांसाठी एक फिडर असेल त्याप्रमाणे नियोजन करणे महत्त्वाचे असते. तसेच फिटर जवळ पिल्लांची गर्दी होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
- खाद्याची भांडी प्रत्येक आठवड्याला स्वच्छ आणि साफ करून घ्यावीत.
- खाली असलेल्या तूसावर खाद्य पडणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्यावी तसेच सांडलेले खाद्य आणि त्यासह जर तूस पक्षांनी खाल्ल्यास त्यामुळे आजार वाढतात.
- खाद्य सर पाणी देण्यासाठीही पिल्ले व मोठ्या कोंबड्या यांच्यासाठी प्रत्येकी 50 साठी एक ड्रिंकर असणे महत्वाचे आहे.
- खाद्य हे पिल्ले व कोंबड्यांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचे असून या मुद्द्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
आपण शेडमध्ये खाली भुईमुगाच्या शेंगांची टरफले किंवा गव्हाची साळ म्हणजेच तूस पसरवतो कारण पिल्लांच्या पायांना इजा होऊ नये हे त्या मागचे कारण असते. खाली अंथरलेल्या तूसची व्यवस्थित काळजी न घेतल्यास किल्ले व कोंबड्यांना काही आजार होऊन वजनाची योग्य प्रमाणात वाढ होण्यास सह मरतूख वाढते.
तूसची काळजी कशी घ्यावी?
- शेडमध्ये खाली पसरवण्यासाठी आणलेली टरफले किंवा तूस धूळ बसलेली अजिबात असू नये. कारण धुळयुक्त तूसा मुळे पक्ष्यांना श्वसन दाह होऊ शकतो.
- प्रति एक हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या शेडमध्ये चारशे किलो तूर वापरावे.
- उन्हाळ्यात तुसाचा थर हिवाळ्याच्या तुलनेत कमी असावा. हिवाळ्यात चार इंच तर उन्हाळ्यात दोन इंचाचा थर टाकावा.
- तुसामधील आद्रता 20 टक्क्यांपेक्षा जास्त वाढल्यास पिलांना जिवाणू व विषाणूजन्य आजारांची लागण होऊ शकते. अशावेळी मग तूस तातडीने बदलावे.
- तसा मध्ये अमोनिया या वायूचे प्रमाण वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे पक्षी आजारी पडून वजन वाढ रोखली जाते. हे टाळण्यासाठी एक हजार चौरस फुटांवर गरजेनुसार दहा ते 20 किलो सुपर फॉस्पेट फवारावे.
Published on: 14 July 2021, 03:05 IST