Animal Husbandry

मत्स्यसंवर्धनासाठी अनेक संवर्धक कंपनीनिर्मित कृत्रिम पेलेटेड खांद्यावर अवलंबून असतात. कृत्रिम पेलेटेड खाद्य म्हणजे इष्टतम पोषणतत्व पुरविण्याच्या उद्देशाने बनविलेले पिलेटेड आकाराचे समतोलित खाद्य. काही कंपनीद्वारे विविध पोषणतत्व प्रमाण संयोजित असलेले खाद्य विक्री केली जाते.

Updated on 22 May, 2020 9:54 AM IST


मत्स्यसंवर्धनासाठी अनेक संवर्धक कंपनीनिर्मित कृत्रिम पेलेटेड खांद्यावर अवलंबून असतात. कृत्रिम पेलेटेड खाद्य म्हणजे इष्टतम पोषणतत्व पुरविण्याच्या उद्देशाने बनविलेले पिलेटेड आकाराचे समतोलित खाद्य. काही कंपनीद्वारे विविध पोषणतत्व प्रमाण संयोजित असलेले खाद्य विक्री केली जाते. मत्स्यसंवर्धनासाठी अनेक संवर्धक कंम्पनीनिर्मित कृत्रिम पेलेटेड खांद्यावर अवलंबून असतात. कृत्रिम पेलेटेड खाद्य म्हणजे इष्टतम पोषणतत्व पुरविण्याच्या उद्देशाने बनविलेले पिलेटेड आकाराचे समतोलित खाद्य. काही कंपनीद्वारे विविध पोषणतत्व प्रमाण संयोजित असलेले खाद्य विक्री केली जाते.

माश्याच्या खाद्य प्रणालीचा विचार केल्यास असे निदर्शनास येते की, जास्त तापमानामुळे उन्हाळ्यात माश्याची  खाद्य मागणी ही अधिक असते. शारीरिक व्यवस्थापनाकरिता माश्याना जास्त प्रमाणात ऊर्जा लागते. योग्य खाद्य मिळाल्यास माश्याची वाढ देखील लवकर होते. त्यामुळे योग्य व्यवस्थान अत्यंत महत्वाचे आहे. 

पाण्यातील प्राथमिक अन्न म्हणजेच प्लवंग निर्मित वाढविणे

माश्याचे प्राथमिक व आवडते खाद्य म्हणजे पाण्यातील प्लवंग. नैसर्गिक तलावात जिथे बाहेरून खाद्य दिले जात नाही तिथे बहुतांश मासे प्लवंगावर अवलंबून असतात. प्लवंग भरपूर पोषणतत्वयुक्त असतात म्हणून माशांच्या सुदृढवाढी साठी भरपूर महत्वाचे असतात. त्यामुळे अशा पारिस्थित प्लवंग निर्मितीवर अधिक लक्ष दिल्यास खाद्य व्यवस्थापन करणे सोपी होईल.

प्लवंग निर्मीती कशी वाढवायची ?

पाण्यातील उत्पादकतेवरती प्लवंग निर्मिती अवलंबून असते. तलावाची उत्पादकता म्हणजे त्यामध्ये असलेल्या मूलभूत घटकांचे प्रमाण व त्याची उपलब्धता होय. प्लवंग निर्मितीसाठी C:N:P (कार्बन:नायट्रोजन:फॉस्फरस) घटकाचे प्रमाण योग्य असणे अत्यंत महत्वाचे असते. या घटकांचे योग्य प्रमाण असल्यास पाण्यात प्लवंग उत्पादन चांगले असते व पाण्याचा रंग हिरवळ किव्हा किंचित तपकीर असतो. या घटकांचे प्रमाण कमी असल्यास पाण्यातील प्लवंग निर्मितीचे प्रमाण कमी असते. प्लवंग वाढविण्यासाठी तलावात हे घटक असलेले नैसर्गिक खत सोडणे गरजेचे असते. बहुतांश ठिकाणी प्लवंग निर्मितीसाठी शेणखत किंवा चुना यांचा प्रामुख्याने वापर केला जातो. अनेक गावात शेणखताची उपलब्धी असल्यामुळे त्याचा वापर करणे मत्स्यशेतकऱ्यास सहज शक्य आहे.

तलावात शेणखत किती व कसे टाकायचे ?

तलावाची पूर्वतयारी करताना शेणखत सोडलेले असल्यास शेणखताचे प्रमाण साधारणतः दर आठवड्याला 800 ते 1200 किलो प्रति हेक्टर प्रमाणे योग्य समजले जाते. उपलब्ध असल्यास शेणखतामध्ये गुळ रस (मोलासेसे) सुद्धा काही प्रमाणात मिळवू शकतात. शेणखतामध्ये पाणी घालून त्याची योग्य प्रवाही मिश्रण करून तलावाच्या चारही दिशेला ते सोडायचे. तेज सूर्यप्रकाश व जास्ती तापमान असल्यास प्लवंग निर्मिती लवकर होते. साधारणतः प्लवंग निर्मिती साठी 2-3 दिवसाचा कालावधी लागतो.

मत्स्यसंवर्धनाच्या ठिकाणी शेतकरी स्वतः खाद्य निर्मिती करू शकतात का?

होय, शेतकरी मत्स्यसंवर्धनाच्या ठिकाणी स्वतः खाद्य बनवू शकतात. उपलब्ध असलेल्या खाद्य सामग्रीचा योग्य वापर करून माश्यांच्या अन्न गरजा पूर्ण करणारे पूरक मत्स्यखाद्य बनविणे शक्य आहे. देशातील अनेक संवर्धक स्वतः शेतातच खाद्य निर्मिती करतात. यां मध्ये शेंगदाणा ढेप, सरसो ढेप, सोयाबीन ढेप, तील ढेप, तांदूळ कोंडा, गावाचा कोंडा, तांदूळ पॉलिश इत्यादी सामग्रीचा उपलब्धतेनुसार वापर केला जातो. पारंपरिक मत्स्यसंवर्धनात अनेक संवर्धक वेगवेगळ्या सामग्रीचे मिश्रण करून माश्याना खायला देतात. मिश्रणामध्ये खाद्य सामग्रीचे प्रमाण व समानीकरण सामग्री उप्लब्धतेनुसार केले जाते.

खालील तक्त्यात स्थानिक उपलब्ध असलेल्या विविध सामग्रीत असलेल्या प्रथिनांचे व मेदाचे प्रमाण नमूद आहे

सामग्री

प्रथिन प्रमाण

मेद प्रमाण

शेंगदाणा ढेप

40-45%

6-8%

तांदूळ कोंडा

10-12%

10-12%

सरसो ढेप

35-37%

5-6%

तीळ ढेप

35-36%

4-5%

जवस ढेप

30-32%

20-22 %

गहू कोंडा

11-14%

2-3%

 
खालील तक्त्यात विविध सामग्रीचे मिश्रणातील प्रमाण समीकरण नमूद केलेले आहे

सामग्री

प्रमाण समिकरिण
(प्रती100 ग्राम)

प्रथिन प्रमाण

मेद प्रमाण

शेंगदाणा ढेप : तांदूळ कोंडा

 50:50

 25%

 8.5%

सरसो ढेप : तांदूळ कोंडा

 60:40

 25%

 7.0%

सूर्यफूल ढेप : तांदूळ कोंडा

70:30

 24%

 10%

सरसो ढेप : जवस ढेप : तांदूळ कोंडा

45:15:40

24%

10%

तीळ ढेप :तांदूळ ढेप

60:40

25%

 7%


माश्यांचे
खाद्य कसे तयार करावे ?

  • गरजे नुसार खाद्य सामग्री वजन मापन करून त्यांचे मिश्रण केले जाते व त्यांना हातानी बारीक केले जाते
  • मिश्रण बारीक करण्यासाठी उपलब्ध असल्यास छोट्या चक्कीचा वापर करावा.
  • मिश्रणात 2-3% (प्रति किलो मागे 20-30 ग्रॅम) मैदा वापरावा यामुळे खाद्यात चिकटपणा येतो पाण्यात खाद्य लवकर नाही.
  • मिश्रणाला वाफेवर शिजवविल्या जाते. यामुळे खाद्य समग्रतिल अपोषक तत्वे नष्ट करणे शक्य होते व खाद्याची पचन प्रमाणात वाढ होते
  • मिश्रणाचे तापमान साधारण तापमानपर्यंत थंड होण्याकरिता काही काळ तसेच ठेवावे
  • खाद्य मिश्रणात 1% (1 किलोखाद्यामागे 10 ग्रॅम) व्हिटॅमिन व मिनरल मिश्र पावडर घालावे व योग्य मिश्रित करण्यात यावे. बाजारात अग्रीमिन पावडर यां नावाने व्हिटॅमिन मिनरल मिश्र पावडर विकल्या जाते.
  • मिश्रणात गरजे नुसार पाणी घालावे व त्याला योग्यरित्या तिंबून गोळा बनवावा.
  • तयार झालेल्या मिश्रणाचे हातानी छोट्या आकाराचे गोळे बनवावे मत्स्यसाठ्या नुसार खाद्यगोळे मास्यांना खायला द्यावे.
  • मत्स्यसंवर्धकाकडे पिलेट मशीन असल्यास योग्य आकाराचा साचा वापरून खाद्य पिलेट सुद्धा तयार करू शकतात.
  • तयार झालेल्या खाद्य पिलेटला सूर्यप्रकाशात सुखविण्यात यावे.व सदर पिलेट माश्यांना खायला घालावे.
  • माश्यांचाआकार लहान असल्यास सदर पिलेट खाद्याला बारीक चुरा करून माश्यांना खायला घालावं.

खाद्याची साठवणूक कशी कारायची ?

  • शक्य असल्यास शिजवलेले ताजे खाद्य वापरावे.
  • योग्यरीत्या तयार केलेले खाद्य काही आठवड्यापर्यंत साठवून ठेवता येते.
  • खाद्य साठवूणुकीकरिता प्लॅस्टिक पिशवीचा वापर करू शकतात.
  • साठवणूक कोरड्या जागेत करण्यात यावे ओलावा असलेली जागा टाळावी.
  • दर आठवड्यात एकदा तरी खाद्य उन्हात सुकायला ठेवावे यामुळे बुरशीची वाढ होत नाही.
  • बुरशी असलेले खाद्य माश्यांना खायला घालू नये.

लेखक:
शुभम
ये. कोमरेवर
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, गडचिरोली
८४५९६२९४५१

English Summary: Feed management in fisheries
Published on: 22 May 2020, 09:13 IST