Animal Husbandry

कृषी क्षेत्रात दिवसेंदिवस क्रांती घडत आहे. आधी शेती पारंपारिक पद्धतीने केली जात होती, त्यानंतर कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागला आहे.

Updated on 26 August, 2020 6:22 PM IST


कृषी क्षेत्रात दिवसेंदिवस क्रांती घडत आहे. आधी शेती पारंपारिक पद्धतीने केली जात होती, त्यानंतर कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाचा वापर होऊ लागला आहे. आता या अर्थव्यवस्थेचा भार संभाळणाऱ्या क्षेत्रात टेक्नोलॉजीचा वापर होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना शेतमालासाठी बाजारपेठ मिळवण्यास सोपे झाले आहे. हवामानाचा अंदाज योग्य पद्धतीने शेतकऱ्यांना लागत असल्याने पिकांचे नुकसान होणे कमी झाले आहे. दरम्यान आता मोबाईल एप बाजारात आले आहेत.

भारतीय कुरण आणि चारा संशोधन संस्था (ग्रासलँड) ने  चाऱ्यांविषयीची माहिती देणारे ४ एप बनविण्यात आले आहेत.  चारा एप, फॉरेज इंडिया, फॉरेज सीड, फोडर एंड रेंज ग्रासेस ही मोबाईल असून याच्यामाध्यमातून बळीराजा आणि पशुपालक चाराविषयी माहिती जाणून घेऊ शकतात.  या एपमध्ये चारा पीक आणि प्रगतशीलपणे शेती करण्याच्या पद्धतीची माहिती आहे. यासह एपच्या माध्यमातून नवीन प्रकारचे बियाणे, मशीनरी, किंमती, हवामान, कीड, रोगांवरील माहिती मिळणार आहे.

पीकांना कोणते खते- औषधे आवश्यक आहेत यासह शेतमालांची विक्रीविषयीची माहितीही मिळणार आहे. चारा पिकांसाठी कृषी शास्त्रज्ञांचा सल्ला देखील यातून मिळणार आहे. जनावरांना कोणता चारा द्यावा, पौष्टिक आहार मिळावा याचाही माहिती या एपमध्ये आहे. चारा पिकांचे बियाणे घ्यायची असतील तर या एपच्या मदतीने आपण बियाणे मागवू शकतो.  हे एप ग्रासलँड द्वारे बनविण्यात आले असून बळीराजा हे एप एंड्राइड मोबाईलवर डाऊनलोड करु शकतात. प्ले स्टोअरमध्ये जाऊन हे एप डाऊनलोड करु शकतात.

English Summary: feed information cattle breeders will get through Mobile App
Published on: 26 August 2020, 06:21 IST