शेतकऱ्यांच्या हक्काचा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. अनेक शेतकरी यामधून चांगले पैसे कमवतात. असे असताना पावसाच्या अवकृपेमुळे केवळ खरीप हंगामातील पिकांचे नुकसान एवढेच नाही तर शेतीचा जोडव्यवसायही अडचणीत आला आहे. अनेक जनावरांचा यामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये केवळ 4 दिवसात 30 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
यामध्ये वेल्हा तालुक्यातल्या घाटमाथ्यावर वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने, चांदर गावात जवळपास 30 जनावरांनाचा मृत्यू झाल्याची घटना आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच पावसामुळे अनेक जनावरे आजारी पडत आहेत. पाऊस, गारठा यामुळे जनावरांचा मृत्यू झाला आहे.
काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या चांदर गावासह परिसरात सतत जोरदार पाऊल पडत आहे. तसेच गार वारा आणि जोरदार पाऊस यामुळे गारठून मृत्यू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
खत म्हणून कोळसा आणि वाळू, बोगस कंपन्यांचा राज्यात धुमाकूळ...
नुकसान झालेल्या शेतकऱ्यांमध्ये मारुती सांगळे, कोंडिबा सांगळे, गणेश सांगळे, पांडुरंग सांगळे,सीताराम सांगळे,विठ्ठला पोळ, रामचंद्र सांगळे, वसंत सांगळे या शेतकऱ्यांच्या गाई, म्हैस, बैल, शेळी, मेंढी, कोंबड्या या सारख्या प्राण्यांचा समावेश आहे. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
रोगांचा धोका वाढला, पावसामुळे बळीराजाचे असेही नुकसान..
वाईमध्ये ढगफुटीदृश्य पाऊस, शेतकऱ्यांसह घरांचे मोठे नुकसान
पिक्चर अभी बाकी है! उद्धव ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा दिलाच नाही, कारण..
Published on: 30 July 2022, 12:17 IST