शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना असतात. मात्र त्या लोकांपर्यंत जात नाहीत, अनेकांना त्याचा लाफ घ्यायचा असतो, मात्र त्याबद्दल माहिती नसल्याने त्याचा लाभ घेता येत नाही. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी पशुपालन, कुक्कुटपालन यांसारखे व्यवसाय मोठ्या प्रमाणात करतात. यासाठी शासन वेगवेगळ्या योजना देखील उपलब्ध करून देते. यामध्ये आता पशुसंवर्धन विभागाकडून उद्योजगता व कौशल्य विकासावर आधारित राष्ट्रीय पशुसंवर्धन योजना २०२१-२२ या वर्षापासून राबविण्यात येत आहे.
यामध्ये शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर मदत केली जाते, जेणेकरून शेतकरी आत्मनिर्भर होईल. आता या योजनेद्वारे शेळीपालन, मेंढी पालन, कुक्कुटपालन, वराह पालन, आणि त्यासोबत मुरघास निर्मिती टीएमआर, फॉडर ब्लॉक निर्मिती तसेच वैरण बियाणे उत्पादन या सर्वांसाठी आता ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. यामुळे लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये व्यवसायासाठी अनुदान देण्याची क्षमता मर्यादित आहे. वेगवेगळ्या व्यवसायासाठी ही रक्कम कमीजास्त होत असते. यामध्ये आता शेळी- मेंढीपालन - ५० लाख रुपये, कुक्कुट पालन - 25 लाख रुपये, वराह पालन -30 लाख रुपये, पशुखाद्य व वैरण विकासासाठी - 50 लाख रुपये अशी रक्कम आहे. यामुळे तुम्ही स्वतःचा व्यवसाय देखील सुरु करू शकता. केवळ नोकरीच्या मागे न धावत तुम्हाला यामधून चांगले पैसे मिळतील. या अनुदानासाठी तुम्हाला संबंधित कागदपत्रे लागणार आहेत.
तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करून अर्जासोबत पॅन कार्ड, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, पासपोर्ट फोटो, बँकेचा रद्द केलेला चेक ही महत्त्वाची कागदपत्रे लागणार आहेत. तसेच यासाठी https://ahd.maharashtra.gov.in/ किंवा http://www.nlm.udyamimitra.in या संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता. या योजनेचा लाभ व्यक्तिगत व्यावसायिक स्वयंसहाय्यता बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था, सहकारी जोखीम गट सहकारी संस्था, खाजगी संस्था, स्टार्टअप ग्रुप यांना आहे. यामुळे हे फायदेशीर ठरेल.
Published on: 17 January 2022, 04:43 IST