Animal Husbandry

भारत हा दुग्ध व्यवसायात एक अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो, देशात मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जाते. असे असताना जनावरांची काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे असते. योग्य आहार, पाणी, तसेच वेळेवर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. असे असताना अलीकडच्या काळात अनेक शेतकरी मुरघासाकडे वळाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. तसेच शेतकऱ्यांना या मुरघासामुळे चांगले दिवस आले आहेत

Updated on 19 January, 2022 3:07 PM IST

भारत हा दुग्ध व्यवसायात एक अग्रेसर देश म्हणून ओळखला जातो, देशात मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जाते. असे असताना जनावरांची काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे असते. योग्य आहार, पाणी, तसेच वेळेवर सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. असे असताना अलीकडच्या काळात अनेक शेतकरी मुरघासाकडे वळाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. तसेच शेतकऱ्यांना या मुरघासामुळे चांगले दिवस आले आहेत. याचे कारण म्हणजे वेळेची मोठी बचत होत आहे, एकदाच मुरघास केला तर त्या शेतकऱ्याला रोजच जनावरांसाठी खाद्य आणायला जावे लागत नाही.

असे असले तरी मुरघास बनवण्यासाठी मोठी दक्षता देखील घ्यावी लागते, नाहीतर हा मुरघास खराब होण्याची शक्यता असते. यामुळे तो बनवतानाच काळजी घेणे गरजेचे आहे. चाऱ्याची कुटी केल्यानंतर ती ताबडतोड खड्यात, पिशवीत किंवा बांधकामात भरली पाहिजे. पहिला २ फुटाचा थर टाकून तो तुडवला पाहिजे. कुटी जेवढी तुडवली जाते, तेवढाच जास्त त्यामध्ये मुरघास बसणार आहे. पहिला थर हा १.५ ते २ फुटांचा असला पाहिजे, यापेक्षा जास्त जाडीचा असल्यास त्यातील हवा काढणे अडचणीचे ठरू शकते.

१ फुटापर्यंत कुटी टाकल्यानंतर समान पसरवून घ्या. कुटी तुडवत असताना एका व्यक्तीने मध्ये तुडवावे आणि दुसऱ्या व्यक्तीने पिशवीच्या किंवा खड्याच्या बाजूने तुडवावे. नंतर दोन्ही व्यक्तींनी बाजूंनी तुडवायला सुरुवात करावी. समसमान तुडवल्यास पिशवी योग्यरीतीने भरता येते. पहिल्यादांच मुरघास बनवत असाल तर बाजारात उपलब्ध असलेल्या culture चा वापर करावा. एकावर एक थर भरायचे झाले की ते हवाबंद राहील याची खात्री करून घ्या. या सर्व गोष्टीचे काटेकोरपणे पालन करून मुरघास केल्यास तो नक्कीच चांगल्या प्रतीचा होईल. तसेच तो एकदा बंद केल्यानंतर सारखे उघडून बघू नका, असे केल्यास त्यात हवा लागेल, आणि तो खराब होईल.

४५ दिवस ते ६० दिवसात तो मुरघास पूर्णपणे बंद करून ठेवावा, त्यानंतर तो खाण्यासाठी योग्य होतो. यामध्ये देखील त्याच्या वासावरून त्याची गुणवत्ता ठरते. हा मुरघास हिरवट-पिवळा किंवा सोनेरी-तपकिरी रंग आलेला असतो. मुरघासला आंबट-गोड वास येत असतो म्हणजेच तो आम्लधर्मी आहे. तसेच तो खाण्यासाठी योग्य आहे असे समजावे. मात्र याउलट मुरघासाचा रंग काळसर व बुरशीयुक्त असेल, तर तो खराब झाला असे समजावे. तसेच, खराब मुरघासात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि त्याला घाण वास येतो. जर तो घाण असेल तर तो खाण्यासाठी हानीकारण ठरू शकतो, तसेच चांगला असेल तर दुधाचे प्रमाण देखील वाढेल.

English Summary: Farmers should take care while making silage, animals will not fall ill, milk will also increase.
Published on: 19 January 2022, 03:07 IST