ग्रामीण भागात शेती पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन मोठ्या प्रमाणावर केले जाते. त्यातून शेतकरी बंधूना थोडाफार आर्थिक हातभार मिळतो. मात्र शेळ्या आणि कोंबड्यांचे पालन केल्यानंतर त्यांच्या आहाराबाबत काळजी घेणे तितकेच महत्वाचे आहे. आपण अनेकदा प्राण्यांच्या खाण्याकडे फारसे लक्ष देत नाही. ज्याप्रमाणे आपण आपल्या आहाराची काळजी घेत असतो अगदी त्याचप्रमाणे प्राण्यांची विशेष काळजी घेणं महत्वाचं आहे.
आजच्या या लेखात आज आपण शेळ्या आणि कोंबड्यांना कोणते अन्न द्यावे याबाबत माहिती घेणार आहोत. शेळी हा असा प्राणी आहे ज्यातून आपल्याला दूध आणि मांस दोन्ही मिळते. शिवाय यातून चांगला नफादेखील मिळवता येतो. परंतु इतर प्राण्यांच्या तुलनेत त्याच्या खाण्याच्या सवयी वेगळ्या आहेत. शेळी तिच्या शरीराच्या वजनाच्या ३-४ टक्के कोरडे पदार्थ आरामात शोषून घेऊ शकते.
चारा
खूप आधी शेळीपालन करणारा शेतकरी शेळ्यांना रानात चरायला घेऊन जात असे. अशा प्रकारे फिरून खाण्याच्या पद्धतीमुळे शेळ्यांना वेगवेगळ्या प्रकारचा चारा खायला मिळत होता. मात्र आता बंदिस्त शेळीपालनामुळे ती विविधता कमी झाली आहे. शेळीच्या आहारात विविधता ठेवणे अत्यंत गरजेचं झालं आहे. शेळ्यांना तृणधान्य पिकांपासून मिळणारा चारा, शेंगांचा हिरवा चारा, झाडांच्या पानांचा चारा, विविध प्रकारचे गवत इ.खायला द्यावे. शेळ्यांना झाडपाला या प्रकारचा चारा सर्वाधिक आवडतो.
शेतकऱ्यांची मेहनत 'पाण्यात'; पावसामुळे भाजीपाल्यांचे नुकसान,शेतकरी संकटात
मग तो कोणत्याही झाडाचा पाला असो. शेवरी, सुबाभूळ, दशरथ यांची लागवड बाग पद्धतीने केली तर कायमस्वरूपी किमान एका वेळेस शेळ्यांना त्यांच्या आवडीच्या चाऱ्याची सोय होऊन जाईल. पारंपरिक पद्धतीच्या चाऱ्याचा विचार केला तर मका, ज्वारी त्याचबरोबर लसूण घास हे देखील शेळ्यांच्या आहाराच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचे आणि पौष्टिक आहे. शिवाय हायब्रीड नेपियर, गिनी गवत , पॅरा गवत हे देखील हिरव्या चाऱ्याचे उत्तम स्रोत आहेत.
कोंबडीसाठी संतुलित आहार
पोल्ट्रीमधून आपल्याला अंडी आणि मांस दोन्ही मिळतात, कुक्कुटपालन हा उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे. शेतकऱ्यांनी कोंबड्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, जेणेकरून त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकेल. पाणी हे मुख्य स्रोत असून जे धान्य मऊ आणि पचण्यास मदत करते, पचलेले अन्न रक्तात वाहून नेण्यास, शरीराचे तापमान राखण्यासाठी आणि शरीरातील वाईट घटक शरीरातून बाहेर काढण्यास मदत करते, म्हणून कोंबड्यांना वेळोवेळी पाणी द्या.
हिरवा चारा द्या, ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच कोंबडीला पिवळा मका, ज्वारी, तांदूळ इत्यादी धान्ये पुरेशा प्रमाणात खायला देणे आवश्यक आहे.कोंबडीचे मांस हे फक्त प्रथिनांसाठीच खाल्ले जाते, तसेच अंडी देखील मिळते, त्यामुळे कोंबडीमधील प्रथिनांचे प्रमाण टिकून राहण्यासाठी शेंगदाणे, तीळ आणि सोयाबीन केक, मसूर, माशांचा चुरा, हरभरा खायला देणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या:
जगावेगळा अवलिया!! साॅफ्टवेअर कंपनीतील नोकरी सोडून सुरु केले गाढव फार्म; देशभरात चर्चा
बाप रे! बैलाने तोंडात डबा पकडला आणि नंतर आख्ये शहर घेतले डोक्यावर, जाणून घ्या 'अजब गजब' प्रकार...
Published on: 13 June 2022, 04:17 IST