शेतकऱ्यांचा हक्काचा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय होत. शेतकऱ्यांच्या दारात एक तरी गाई असतेच. तसेच काही शेतकऱ्यांचा मोठा गोठा असतो. यामधून त्यांना चांगले पैसे मिळतात. असे असताना जनावरांची काळजी घेणे गरजेचे आहे. यामध्ये उष्णतेचा जनावरांवर मोठा दुष्परिणाम होतो. यामुळे याकाळात जनावरांची काळजी घेणे खूपच गरजेचे असते. याबाबत आपण माहिती घेऊयात.
उष्णतेचा जनावरांवर होणारा दुष्परिणाम-
१) जनावराच्या शरीराचे तापमान वाढल्यास जनावर अन्नग्रहण कमी करते.
२) जनावरांची त्वचा कोरडी पडते तसेच लघवीचे प्रमाण कमी-जास्त होते.
३) उष्णतेमुळे जनावराच्या दुधातील फॅट व प्रथिने कमी होऊन दुधाची प्रत ढासळते.
४) जनावराचे डोळे लालसर होतात तसेच डोळ्यातून चिकट पदार्थ किंवा पाणी येते.
५) संकरित जनावरांच्या नाकातुन कधी-कधी लाल गडद रंगाचे रक्त वाहते.
६) उष्णतेमुळे दुधाळ जनावरांमध्ये भूक मंदावते त्यामुळे दूध उत्पादनात घट येते.
७) गाई पेक्षा म्हशींच्या शरीर पोषणावर किंवा किंवा प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतात.
८) तापमानामुळे जनावरांच्या शरीरातील ऊर्जा कमी होते त्यामुळे जनावरे थकतात तसेच अशक्त बनतात.
९) गरम हवा पोटात गेल्याने जनावरे डिहायड्रेशन खाली जातात तसेच अतिउष्णतेमुळे जनावरे माज दाखवत नाहीत.
१०) शरीराचे तापमान जास्त वाढल्याने श्वसनाचा वेग वाढतो त्यामुळे तोंड उघडे ठेवून जनावरे श्वास घेऊ लागतात.
११) वातावरणातील तापमान ४२ अंश ते ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यास जनावरे उष्माघाताला बळी पडतात.
१२) उन्हाळ्यात जनावरांची काळजी न घेतल्याने उष्माघात होऊन गाबण जनावरात गर्भपात होऊ शकतो.
१३) जनावरे जास्त प्रमाणात पाणी जास्त पितात त्यामुळे कोरडा चारा खाण्याचे प्रमाण ५० टक्के कमी होते.
१४) जनावराला उष्माघाताचा त्रास झाल्याने जनावरे चालताना अडखळतात किंव्हा एका ठिकाणी बसून राहतात
१५) जनावरांच्या शरीराचे तापमान प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास जनावरे धापा टाकतात व सारखी लाळ गाळतात.
उपाय-
जनावरांच्या गोठयातील पत्र्यावर गवत किंवा नारळाच्या झावळ्या टाकाव्यात.
दुपारच्या वेळी जनावरांच्या अंगावर पाणी मारावे.
सर्व जनावरे गोठ्यातच बांधावीत.मुक्त संचार गोठ्यातील पाण्याच्या टाकीवर सावली करावी.
गोठयाच्या आजूबाजूला पाणी मारावे जेणेकरून गोठ्यातील वातावरण थंडगार होईल.
गोठ्यात २४ तास थंडगार मुबलक पाण्याची सोय करावी.
स्ट्रेस मध्ये गेलेल्या जनावरांना ग्लुकोज पावडर पाजावी.
सकाळी ११:०० वा नंतर दुपारी ३:०० वा पर्यंत जनावरे मोकळी सोडू नये.
गोठ्यत मोठे फॅन लावावेत जेणेकरून थंडावा निर्माण होईल.
गोणपाटाची पोती भिजवून जनावरांच्या अंगावरती टाकावीत.
'सदर जमीन ही वादग्रस्त आहे, ही जमीन रक्त मागत आहे'
ऊस, कांदा उत्पादकांच्या व्यथांचा भोंगा कोण वाजवणार! तुम्हाला फक्त मतदानाला विचारणार
जनावरांना खरारा करण्यासाठी गोठ्यात ग्रूमिंग ब्रश बसवावेत जेणेकरून जनावरे खरारा करतील.
टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
लिंक -https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=XXPBY3
लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल-nitinpisal94@gmail.com
महत्वाच्या बातम्या;
योगी सरकारचा मोठा निर्णय! घरातील एका सदस्याला मिळणार नोकरी, जाणून घ्या योजना
"स्वतः कारखाना चालवण्याची वेळ येते तेव्हा सगळे मागे सरकतात, हा अनुभव मला आहे"
आमदार रोहित पवार यांना मोठा धक्का, कारखाना भाडेतत्त्वावर देण्याच्या निर्णयाला स्थगिती
Published on: 23 May 2022, 05:35 IST