शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी बांधव पशूपालन, कुकुटपालन, शेळीपालन तसेच मधुमक्षिका पालन ह्यासारखे व्यवसाय करतात. परंतु आता अत्यल्प गुंतवणूक करतात तसेच कमीत कमी जागेत व थोड्याशा आश्रमात फायदेशीर व्यवसाय म्हणून ससे पालन हा जोडधंदा म्हणून नावारूपास येत आहे. तर पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर काही जिल्ह्यांत बऱ्याच ससे पालन संस्था, फार्म उभारण्यात आली आहेत. यापैकी काही संस्था ससे पालनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देतात व ससे पालन व्यवसाय साठी लागणारी सामग्री व स से ही पुरवतात. या लेखामध्ये आपण ससे पालन व्यवसायाविषयी माहिती घेऊ.
व्यवसायाचे महत्त्व
सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे मासाची आवश्यकता व मागणी वाढल्यामुळे देशांतर्गत मांस उत्पादन कमी पडत आहे. त्या अनुषंगाने आपल्या देशातील मांस उत्पादन आणखी चार ते पाच पटीने वाढण्याची आवश्यकता आहे. कमी पडत असलेल्या मांसाची गरज भागवण्या करता कमी कमी वेळेत जास्तीत जास्त मांस उत्पादन करणारे प्राणी भारतासारख्या विकसनशील देशात माणसाच्या अन्नाची स्पर्धा न करता जगणारे प्राणी म्हणून ससा हा अत्यंत उपयुक्त प्राणी आहे.
सशांमधील दोन पिढीतील अंतर सात ते आठ महिने असते व एका वेळेस सशांची मादी पाच ते दहा किंवा त्यापेक्षा जास्त पिल्ले देते. याशिवाय सशांच्या मांसाला एक प्रकारची वैशिष्टपूर्ण चव असल्यामुळे त्याला भरपूर मागणी आहे.
सशाच्या विविध जाती व राहण्याची व्यवस्था
सशाचे मुळस्थान पाहिले तर हा मूळचा युरोपातील प्राणी असून आता त्याचे जगभर उत्पादन सुरू झाले आहे. न्युझीलँड व्हाईट, न्युझीलँड ब्लॅक, ग्रे व्हाइट, रशियन चिंचेला इत्यादी जातींचे ससे सध्या पाळण्यासाठी उपलब्ध आहेत. ससे पालनासाठी लोखंडी पिंजरे योग्य असतात. सशांना पिंजऱ्यामध्ये खाद्य व्यवस्थित प्रकारे देता येते तसेच वाढ बारकाईने लक्षात येते. याबरोबरच रोगांचा प्रादुर्भाव होणे शक्य नसते हल्ली सशांचे युनिट किंवा जोडी पुरवतात ते केंद्रे पिंजरे उपलब्ध करून देतात.
या व्यवसायातून आर्थिक लाभ कसा मिळतो
सशांचे एक युनिट म्हणजे चार नर व सहा माद्या, लागणारे पिंजरे, कटोर्या तसेच लागणारी औषधे हे ससे पालन केंद्रातून विकत मिळतात. साधारणपणे एका युनिट पासून 160 ते 180 पिल्ली मिळतात व 25 ते 30 टक्के मृत्यू दर पाहता 110 ते 120 पिल्ली विक्रीकरिता उपलब्ध होतात. प्रौढ ससे योग्य वेळेत कळपातून काढावी लागतात. तीन ते चार महिन्यांपासून मांस साठी विक्री करता येते. तसेच मेलेल्या सशांच्या चामड्यापासून व खतापासून ही चांगले उत्पन्न मिळते. वरील सर्व बाबींचा विचार करता ससे पालन हा व्यवसाय अल्प गुंतवणुकीतून, कमी वेळ देऊन कमी जागेत, गृहिणी, महिला बचत गटहा व्यवसाय म्हणून उद्योग सुरू करू शकता.
व्यवसाय सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या संस्था ससेपालन प्रशिक्षण देतात. प्रशिक्षण घेऊन व्यवसाय सुरू केल्यास यातील बारकावे लवकर माहीत होतात व चांगला फायदा मिळतो. म्हणून या विषयी संपूर्ण माहिती करून घ्यावी. म्हणून खात्रीलायक फायदा मिळवून देणारा व विक्रीची हमी असणारा हा व्यवसाय नियोजनपूर्वक जोडधंदा म्हणून अवलंबून करण्यात हरकत नाही.
आहार
ससा हा प्राणी शाकाहारी आहे त्याला बस सिम, लासूनातं हा प्रथिन युक्त चारा तसेच पालक, कोबीइत्यादी पालेभाज्या.गव्हाचा कोंडा, स्वयंपाक घरातील उरलेले अन्न व भाजीपाल्याचा टाकून भाग घ्यावा आहारात प्रथिने मिळवण्यासाठी सोयाबीन किंवा भुईमुगाची भेट द्यावी तसेच दिवसभरात स्वच्छ व मुबलक पाणी द्यावे. सशांना मुळा, कांदा, बटाटा, शेंगदाणे इत्यादी देऊ नये.
माहिती स्त्रोत- कृषी समर्पण
Published on: 10 June 2021, 03:50 IST