नवं उधोजकांनी शेती आधारित पशुपालन व दुग्धव्यवसाय करण्याआधीचं त्या संबंधीचे धेनू ॲप सारखे नव-नवीन आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेऊन जर व्यवसाय सुरू केला तर भरमसाठ होणारा खर्च देखील वाचेल आणि आर्थिक प्रगती देखील साधता येईल हे नक्की आहे.
कोणताही व्यवसाय करायचा म्हटले की, त्यासाठी तीन गोष्टी खुप महत्त्वाच्या असतात ज्ञान, पैसा आणि चिकाटी. जर आपल्याकडे ज्ञान असेल तर कमी वेळात व्यवसाय यशस्वी करता येतो. जर पैसा उपलब्ध असेल तर त्याचा व्यवसाय वाढविण्यासाठी उपयोग करता येतो. आणि जर चिकाटी असेल तर त्या व्यवसायाचा योग्य ताळमेळ घालता येतो.
आपण कोरोना महामारीच्या काळामध्ये पाहिले असेलच की, सगळे व्यवसाय बंद असताना देखील दुग्धव्यवसाय हा अत्यावश्यक सेवेमध्ये गणला गेला. एकमेव व्यवसाय सुरु होता. दूध दररोज लागणारी बाब आहे. तसेच दूध हे पूर्ण अन्न म्हणून ओळखले जाते. लहानांपासून थोरांपर्यंत लागते त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थाच्या निगडित जर व्यवसाय केले, तर त्याला सध्या ही खूप चांगले भविष्य आहे.
येणाऱ्या काळामध्ये त्याला चांगले भविष्य असणार आहे हे नक्कीच. शहरी भागामध्ये इंटरनेटचा वापर वाढत गेल्याने शहरी भागांचा तर विकास झालाच परंतु ग्रामीण भागातही मोबाईलचा वापर वाढत गेला आणि शेतकरी व पशुपालक बांधवांपर्यंत तंत्रज्ञान सहज पोहोचायला लागले आहे. परंतु या तंत्रज्ञानाचा ग्रामीण भागामध्ये म्हणावा असा वापर करून प्रगती किंवा बदल होताना दिसून आलेला नाही.
आजकाल ग्रामीण भागामध्ये शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्धव्यवसाय हा खुप मोठ्या प्रमाणावर केला जातो. कारण, शेतीतून दर सहा महिन्याला किंवा वार्षिक उत्पादन मिळत असते. त्यामुळे घर खर्च चालवण्यासाठी दूध उत्पादन हा एकमेव मार्ग असतो. कोणत्याही व्यवसायाला नफा आणि तोटा या दोन बाजू तर असतातच परंतु जर नफ्यामध्ये दुग्धव्यवसाय करायचा असेल तर बदलत्या काळाबरोबर स्वतःमध्ये बदल करून समोर चालणे देखील खूप महत्त्वाचे असते.
आज ग्रामीण भागातील लाखों शेतकरी व पशुपालकांसाठी धेनू ॲपचे तंत्र ही खरी पर्वणीचं ठरली आहे. अनेक शेतकरी दुग्धव्यवसायात धेनू ॲपचे तंत्र शिकून आपल्या व्यवसायात बदल करून नफा देखील मिळवत आहेत अशा यशस्वी शेतकऱ्यांची बरीच उदाहरणे देता येतील तरी आपणही दुग्धव्यवसाय करू इच्छित असाल आणि आपल्यासमोर भरमसाठ अडचणी असतील तर त्यावर एकच उत्तर असेल ते म्हणजे धेनू ॲप...!
आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे काय?
यांत्रिकीकरण पद्धतीने वेगवेगळे तंत्रज्ञान वापरून कमी वेळेमध्ये, कमी जागेमध्ये, कमी कष्टामध्ये जास्त उत्पादन घेणे यालाच आधुनिक तंत्रज्ञान असे म्हणतात.
फायदे
• व्यवसाय वाढीसाठी मदत होते.
• एकात्मिक कष्ट कमी होतात.
• वेळ वाचतो आणि मजुरी खर्च कमी होतो.
• उत्पादनात भरमसाठ वाढ होते.
धेनू ॲप हा दुग्धव्यवसायातील डिजिटल व आधुनिक तंत्रज्ञानाचा आत्माच म्हणावा लागेल. पशुपालकांनी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर त्यांचे दूध एकात्मिक उत्पादन तर वाढेलच परंतु जे अडाणीपणाचा, चुकीचा किंवा तोट्यात दुग्धव्यवसाय करत आहेत त्यांना सावरण्यासाठी खूप भरीव मदत होईल. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मुक्त संचार गोठ्याचे फायदे काय आहेत?
सकस चारा निर्मिती कशी करावी? कृत्रिम रेतन तंत्र काय आहे? अधिक दूध उत्पादन देणारी गाई कशी तयार करावी? मुरघास निर्मिती व साठवणुकीचे तंत्रज्ञान काय आहे? जनावरे आजारी पडण्याची कारणे व त्यांच्यावर औषध उपचार काय करावा? जनावरांच्या प्रजननाचे व्यवस्थापन कसे करावे? दूध उत्पादन वाढीसाठी काय करावे? गाई-म्हशी व शेळ्या-मेंढ्यांना लसीकरण कधी करावे?
हिवाळ्यातील, उन्हाळ्यातील आणि पावसाळ्यातील आहार व्यवस्थापन कसे असावे? जनावराच्या भाकड काळातील व्यवस्थापन कसे असावे? जनावरांचे रक्त, लघवी, दूध, शेण, चारा, तपासणी का करावी? गाई व म्हशीच्या दुग्धव्यवसायातील फरक काय आहे? शेतकऱ्यांच्या ए टू झेड प्रश्नांचे उत्तर, पशुपालकांचे अनुभव, तज्ञांचे मार्गदर्शन, पशु सल्ला याशिवाय बरचं काही आपणाला धेनू ॲप कडून ऑडीओ, व्हिडीओ व तज्ञांचे लेख या स्वरुपात मोफत पाहायला मिळेल.
पशुपालकांनो दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा.
लिंक - https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=XXPBY3
लेखक- नितीन रा.पिसाळ, प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक), धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो. 9766678285. ईमेल-nitinpisal94@gmail.com
Published on: 02 February 2022, 01:59 IST