हंगामाच्या सुरुवातीस वातावरणाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटांना समोरे जावे लागले मात्र असे असताना सुद्धा शेतकऱ्यांनी विविध औषधांची फवारणी करून पिकांचे रक्षण केले. वातावरण पोषक झाले असून आता कुठे तरी पिके जोमात वाढत आहेत तो पर्यंत वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरू केले आहे. यामुळे पिकांचे नुकसान झाले आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांचे सुद्धा कष्ट वाढलेले आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या वन्यप्राण्यांसाठी एक वेगळीच युक्ती लढवली आहे. या कडाक्याच्या थंडीत शेतकरी शेतात न जाता लाऊडस्पीकर मध्ये भीतीदायक आवाज रेकॉर्ड करून शेतात लावले आहेत त्यामुळे वन्यप्राणी आता शेताकडे सुद्धा फिरकत नसल्याचे चित्र दिसत आहे.
रब्बी हंगामातील पिकांची नासधूस :-
रब्बी हंगामातील पिके आता पोषक वातावरण असल्यामुळे जोमात वाढत आहेत मात्र रानडुकरांना यामध्ये खण्यासारखे काहीच नाही तरीही शेतात येऊन ते नासधूस करत आहेत. या वाढत्या नुकसाणीमुळे आता उन्हाळी भुईमूग पिकाकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष लागत आहे. पेरणी केल्यापासून ते पिकाची काढणी होईपर्यंत शेतकऱ्यांना शेतात लक्ष द्यावे लागते. दिवसेंदिवस शेतात रानडुकरांचे साम्राज्य वाढत असल्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे तसेच वनविभागाकडून सुद्धा कोणती कारवाई केली जात नाही.
शेतकऱ्यांचे अनोखे जुगाड :-
शेतकरी दिवसभर शेतात असतात त्यामुळे वन्यप्राण्याणी शेतात येत नाहीत मात्र रात्री शेतात शेतकरी नसल्याने वन्यप्राणी शेतात येऊन पिकांमध्ये धुमाकूळ घालत आहेत. त्यामुळे नांदेड मधील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लाऊडस्पीकर लावून त्या स्पीकरमध्ये भीतीदायक वन्यप्राण्यांचे आवाज रेकॉर्ड करून रात्रभर लावतात. मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांनी ही युक्ती आपल्या शेतात लढवल्याने कोणताही वन्यप्राणी शेताकडे फिरकत नसल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आता पिकांची नासधूस ही होत नाही.
पीक संरक्षणाचे हे आहेत अन्य उपाय :-
शेताच्या भोवतीने विविध प्रकारच्या साड्या लावलेल्या आहेत त्यामुळे प्राण्यांना असे वाटतेय की शेतात कोणीतरी व्यक्ती आहेत त्यामुळे शेतात ते फिरकत नाहीत. रानडुकरांची दृष्टी आणि श्रवण हे कमकुवत असतात जे की ते त्यांच्या ज्ञानेंद्रीयाच्या मदतीने निवारा आणि अन्न शोधत असतात. शेतामध्ये केस विस्कटल्याने ते अन्नाच्या शोधात येतात आणि ते केस त्यांच्या श्वसन नलिकेत अडकतात त्यामुळे ते सैरभैर होतात आणि तिथून पळतात. मराठवाडा विभागातील अनेक शेतकऱ्यांनी असा प्रयोग लढवला आहे.
Published on: 01 February 2022, 06:42 IST