आपल्या देशातील वराहपालन जागतिक स्तरावर आणण्यासाठी विविध भागधारकांना तंत्रज्ञान, उद्योजकता विकास आणि आर्थिक पाठबळ यांसारख्या बाबतीत विविध स्तरांवर प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. जागतिक बाजारपेठेत सॉसेज, हॅम, खारवून वाळवलेले मांस आणि हवाबंद केलेली मांस उत्पादने, तसेच गोठवलेले मांसाला चांगली मागणी आहे.
कृषी सकल देशांतर्गत उत्पादनापैकी एक चतुर्थांश पशुधन क्षेत्राचे योगदान आहे, पशुपन प्रजातींमध्ये वराहांना महत्त्वाचे स्थान आहे. इतर पशुधन प्रजातींच्या तुलनेत वराहपालकांना जलद आर्थिक परतावा मिळण्यास मोठी क्षमता असते, कारण उच्च प्रजननक्षमता, चांगले खाद्य रूपांतरण कार्यक्षमता, लवकर लैंगिक परिपक्वता आणि दोन पिढीतील अल्प अंतर यांसारख्या अंतर्भूत वैशिष्ट्यांमुळे वराहपालन हा इतर पशुपालनापेक्षा वेगळा ठरतो. या व्यवसायात वराहपालनासाठी शेड तसेच इतर उपकरणांसाठी अल्प गुंतवणूक आवश्यक आहे.
ब्रॉयलर कोंबडी वगळता इतर मांस उत्पादक प्राण्यांच्या तुलनेत वराह खाल्लेल्या खाद्याच्या प्रति किलो वजनात अधिक युनिट मांसात रूपांतरित करतात.
(१) भारतात वराह संख्या विसाव्या प्राणी जनसंख्येनुसार ९.०६ दशलक्ष असून ग्रामीण भागात ९० टक्के, शहरी भागात १० टक्के वराह आहेत. भारतातील एकूण वराहांची संख्या मागील जनगणनेच्या तुलनेत १२.०३ टक्यांनी कमी झाली आहे.
शेतकऱ्यांनो खतातील बनावटपणा असा ओळखा, पिकाचे नुकसान होणार नाही..
जगात सर्वाधिक वराह चीनमध्ये आहे. जागतिक वराह संख्येत ४८ टक्के हिस्सा हा एकट्या चीनचा असून, भारताचा केवळ एक टक्के वाटा आहे. हा व्हिएतनाम (२.८३ टक्के) सारख्या लहान देशापेक्षाही अतिशय कमी आहे. आपल्या देशात एकूण पाळीव प्राण्यांत वराहाचे योगदान १.७ टक्के आहे. भारतात ७९ % वराह हे देशी वा नोंद नसलेले असून, २१ % वराह हे नोंद केलेल्या प्रजातीचे आहे. जगातील एकूण मांस उत्पन्नात ४० % वराहाच्या मांसाचा हिस्सा असून भारतात मात्र एकूण मांस उत्पादनात हा वाटा फक्त ५ % आहे. युरोपीय महासंघामध्ये दरवर्षी प्रति व्यक्ती ४२.६ किलो, अमेरिकेमध्ये २९.७ किलो वराह मांस खाल्ले जाते. चीनमध्ये वराह मांस हे मुख्य अन्न आहे. येथे प्रति व्यक्ती प्रति वर्ष ५२ किलो वराह मांस आहारामध्ये असते.
(३) आसाम राज्य वराह संख्येत क्रमांक एक वर आहे. महाराष्ट्र यामध्ये खूप मागे आहे. भारतातील २८ % वराह संख्या ईशान्येकडील ७ राज्यात एकवटलेली आहे. बहुसंख्य आदिवासी लोकसंख्येसाठी, पशुधन पाळणे विशेषतः वराह पालन हा पूर्वोत्तर राज्यांसाठी त्यांच्या जीवनशैलीचा एक अविभाज्य भाग आहे.
(४) दरडोई उत्पन्न, शहरीकरण आणि जीवनशैलीतील बदल व खाण्यातील बदललेल्या सवयीमुळे वराह मांसाची मागणी या भागात वाढत आहे. यातील बहुतांश मागणी भारतातील इतर राज्यांतून आणि म्यानमारमधून आयात करून पूर्ण केली जाते. ईशान्य भारतात वराहाचे मांस खाण्याचे प्रमाण उर्वरित देशापेक्षा जास्त आहे. या राज्यांपैकी नागालँडमध्ये दरडोई वापर सर्वाधिक आहे. वराह मांस गोवा आणि भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये लोकप्रिय आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि संस्थात्मक क्षेत्रातील तसेच उच्च श्रेणीतील किरकोळ विक्रेत्यांच्या मागणीमुळे गेल्या वर्षी आयात वाढण्यास मदत झाली. भारतातील वराह मांस आयातीमध्ये जवळजवळ संपूर्णपणे प्रक्रिया केलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. आयातीच्या एका छोट्या भागामध्ये उच्च दर्जाचे गोठविलेल्या वराह मांस आयातीचा समावेश आहे.
शेतकऱ्यांनो उसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव कसा घालवायचा, जाणून घ्या..
भारतात वराहांच्या विदेशी जातीमध्ये प्रामुख्याने लार्ज व्हाइट यॉर्क शायर, हॅम्पशायर, ड्युरोक, लँड्रेस, टॅमवर्थ यांचा समावेश आहे. काही लोकप्रिय देशी वराहांच्या जातींमध्ये घुंगरू, निअंग मेघा, अंकमाली, अगोंडा गोअन, टॅनी वो यांचा समावेश आहे. देशी वराहांच्या वेगवेगळ्या जातींना देशातील सर्वांत वैविध्यपूर्ण हवामान परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. परंतु ते अतिशय कमी उत्पादक आहेत. त्यामुळे हल्ली त्यांचा वावर हा दुर्गम प्रदेशापुरताच मर्यादित आहे.
(२) भारतात वराहपालन क्षेत्र अत्यंत असंघटित आहे. भारतामध्ये, केरळ, पंजाब आणि गोव्यातील मर्यादित संख्येतील अर्ध-व्यावसायिक वराह फार्म वगळता, ७० टक्के वराहांची संख्या पारंपरिक अल्प भूधारक, कमीत कमी खर्च व मागणी आधारित उत्पादन प्रणाली अंतर्गत पाळली जाते.
(३) भारतात पारंपरिक पद्धतीने वराहपालन केले जाते. सामान्य उत्पादन प्रणालीमध्ये एक साधी पिगरी असते. खाद्यामध्ये स्थानिक पातळीवर सहजपणे उपलब्ध असलेले धान्य, भाजीपाला आणि स्वयंपाकघरातील उष्टावळी, कृषी उप-उत्पादनांचा समावेश असतो. वराह हे अखाद्य, तेलाच्या घाण्याच्या उद्योगातून मिळणारे उत्पादन, खराब खाद्य तसेच बाजारातील उरलेल्या भाजीपाला यांसारख्या गोष्टींचे रूपांतर मूल्यवान पोषक पदार्थात करतात. यातील बहुतेक पदार्थ हे मानवाच्या उपयोगाचे आणि खाण्यायोग्य नसतात.
(४) व्यवसायवृद्धीसाठी सुधारित वराहपालन कार्यक्रम आणि वराह आधारित एकात्मिक मत्स्यपालन महत्त्वाचे आहे. भारतात ठेवलेल्या २० टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात विदेशी जातीचे नर वापरले जातात परंतु दिशाहीन प्रजनन आणि निवडीमुळे मोठ्या प्रमाणात अयोग्य प्रजनन होते.
(५) भारतातील वराह मांस उत्पादन मर्यादित आहे, जे देशातील प्राणी प्रथिन स्रोतांपैकी फक्त ९ टक्के आहे.
(६) प्रक्रिया केलेल्या वराह मांस उत्पादनांची भारतीय बाजारपेठ लहान आहे. या बाजारपेठेतील बहुतांश माल आयातीद्वारे पुरवला जातो. सॉसेज आणि खारवून वाळवलेले मांस यांसारखी प्रक्रिया केलेली उत्पादने तयार करणाऱ्या काही स्थानिक कंपन्या असूनही, त्यांचे प्रमाण मर्यादित आहे, भारतात अंदाजे ३६०० कत्तलखाने आहेत, तरी यापैकी बहुतेकांत निर्यातयोग्य सुविधा नाहीत.
महत्वाच्या बातम्या;
उस्मानाबादच्या कृषी प्रदर्शनात धेनू ॲप ठरले पशुपालकांचे प्रमुख आकर्षण, शेतकऱ्यांना होतोय फायदा..
दुबईमध्ये 17 व्या आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन, कृषी जागरणचाही सहभाग
शेतकऱ्यांनो गहू कीड नियंत्रण माहिती
Published on: 17 February 2023, 03:07 IST