Animal Husbandry

शेती अनेकदा तोट्यात जाते, म्हणून शेतकरी आपल्याकडे चार जनावरे पाळतातच. शेतकऱ्यांचा हक्काचा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. शेतकऱ्यांना पशुपालन करून चार पैसे मिळतात. पशुपालनाचा (animal husbandry) चांगला व्यवसाय देखील होतो. हा व्यवसाय करताना दुधाच्या जातींच्या गायी घेणे किंवा ओळखणे गरजेचे आहे.

Updated on 11 June, 2022 11:26 AM IST

शेती अनेकदा तोट्यात जाते, म्हणून शेतकरी आपल्याकडे चार जनावरे पाळतातच. शेतकऱ्यांचा हक्काचा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. शेतकऱ्यांना पशुपालन करून चार पैसे मिळतात. पशुपालनाचा (animal husbandry) चांगला व्यवसाय देखील होतो. हा व्यवसाय करताना दुधाच्या जातींच्या गायी घेणे किंवा ओळखणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिकचे उत्पन्न मिळते. तसेच कमी कष्टात जास्त पैसे देखील मिळून जातात.

अनेक शेतकऱ्यांना चांगल्या जाती पाळायच्या असतात. मात्र त्यांना त्याबद्दल माहिती नसते. या जाती कोणत्या? हे शेतकऱ्याने जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. या जाती आपण आज जाणून घेणार आहोत. तसेच या जाती किती दूध देतात, त्यांना किती चारा लागतो, हे देखील माहिती असणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल.

यामध्ये, डांगी गाई- पशुपालनात (animal husbandry) अनेक नवीन जाती पाहायला मिळतात. मात्र ही जात एक वेगळी आहे. या जातीचे नाव आहे डांगी. ही जात गुजरात प्रमाणे महाराष्ट्रातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात आणि पश्चिम घाटामध्ये देखील आढळते. ही गाई दूध उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे अनेक शेतकरी ही गाई पाळतात. गुजरातच्या डांग भागावरूनच ह्या जातींचे नाव डांगी पडले.

घरात पडेल पैशांचा पाऊस!! 'या' झाडाची करा लागवड, वास्तुशास्त्रात आहे मोठे महत्त्व

या गाईच्या शरीरावर लाल किंवा काळे डाग असतात, तर शरीर मध्यम आकाराचे असते. ह्या जातीच्या गाईचे डोके लहान असते आणि मानेची कवळी लटकलेली दिसते. कान लहान असतात आणि खांद्याचा आकार मध्यम असतो. यामुळे इतर गायींच्या तुलनेत ही गाय वेगळी ठरते. मका, बार्ली, ज्वारी, बाजरी, चणे, गहू, ओट्स, कोंडा, तांदूळ, कॉर्न भुसी, कोरडे धान्य, भुईमूग हे खाद्य खातात.

राज्यात सहकारी साखर कारखान्यांकडून 41 टक्के साखर निर्यात, महाराष्ट्र राज्याला असाही फायदा

तसेच चवळी, गवारचा पाला, ज्वारी, बाजरी, हत्ती गवत, नेपियर बाजरी, सुदान गवत हे देखील खातात. ही गाय 100 ते 400 दिवस दुध उत्पादन देण्यास सक्षम आहे. दुधातील चरबी सुमारे 4.3 टक्के असते. यामुळे ही गाई फायदेशीर ठरते. 40 लिटर पर्यंत ही गाय दूध देऊ शकते.

महत्वाच्या बातम्या;
मोठी बातमी! दारू 40 टक्यांनी स्वस्त, महसूल वाढीसाठी मोठा निर्णय
थायलंडमध्ये गांज्याच्या लागवडीला आणि विक्रीला मान्यता, मान्यता देणारा पहिलाच देश
शेतकऱ्यांनो सोयाबीन पेरणीबाबत वाचा तज्ञांचा सल्ला, वाढेल उत्पादन

English Summary: Farmers, caste rhythm is heavy !! cow gives most milk
Published on: 11 June 2022, 11:26 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)