गेल्या काही दिवसांपासून दुधाचे बाजारभाव वाढल्याने शेतकऱ्यांना चार पैसे मिळू लागले आहेत. यामुळे शेतकरी आनंदी आहे. असे असताना मात्र आता शेतकऱ्यावर एक मोठे संकट आले आहे. आता ग्रामीण भागातील गायींमध्ये लम्पीच्या आजाराचा संसर्गही वाढू लागले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जनावरांमधील लम्पी संसर्गजन्य आजाराची लागण होत आहे.
यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आता पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये काही प्रमाणात जनावरे बाधित सापडलेली आहेत. यामुळे दुधाच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. राज्यात नसलेला हा संसर्ग आता राज्यात आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात देखील लम्पीसदृश जनावरे आढळून आलेली असल्याने शेतकरी हताश झाला आहे.
येथील बुधे वस्ती येथे तीन जनावरे लम्पीसदृश आढळल्याने शिक्रापूरसह परिसरात शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे आता जनावरांमध्ये काही बदल तसेच आजारांची लक्षणे जाणवल्यास तातडीने पशूवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन पशु संवर्धन विभागाच्या वतीने केले आहे. यामुळे येणाऱ्या काळात काळजी घेणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांनी जगायचे कसे? उडीद, तुरीचे मोठे नुकसान, रोहित पवारांची मदतीची मागणी
हा संसर्ग टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी गोठा व परिसर स्वच्छ ठेवत त्या ठिकाणी माश्या होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. सध्या बाजारातून जनावरे आणणे टाळावे, असे आवाहन करण्यात येत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या पशु संवर्धन विभाग, पशुसंवर्धन आयुक्तालयांच्या मार्गदर्शनाखाली लम्पीसारख्या चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व जनावरांना उपचार मिळण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहेत.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर राणे कुटुंबाच्या कारला अपघात, ट्रकने दिली धडक
यासाठी ग्रामपंचायतीने गोठ्यात फवारणी करण्यासाठी खर्च करण्याची परवानगी दिली असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. आता दुधाला चांगला दर मिळत असल्याचे हा संसर्ग वाढत आहे, यामुळे शेतकरी चिंतेत आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनी दाखवला पीक विमा कंपनीला हिसका! पीक विमा भरपाई देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
'अहमदशाह, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशहा आता अमित शाह'
दिल्लीचा ऐतिहासिक राजपथ आता होणार 'कर्तव्यपथ', मोदी सरकार नाव बदलणार..
Published on: 06 September 2022, 03:26 IST