Animal Husbandry

केंद्र सरकार राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गायी, म्हशी, डुक्कर आणि बकऱ्यांच्या कानात टॅग लावण्याच्या योजनेवर काम करत आहे. याचे फायदे देखील आहेत. शेतकऱ्यांचा हक्काचा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. शेतकऱ्यांना यामधून चार पैसे मिळतात. असे असताना यामध्ये अनेक बदल होत गेले आहेत.

Updated on 30 April, 2022 5:02 PM IST

शेतकऱ्यांचा हक्काचा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे बघितले जाते. शेतकऱ्यांना यामधून चार पैसे मिळतात. असे असताना यामध्ये अनेक बदल होत गेले आहेत. आता यामध्ये एक नवीन बदल आला आहे. केंद्र सरकार राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत गायी, म्हशी, डुक्कर आणि बकऱ्यांच्या कानात टॅग लावण्याच्या योजनेवर काम करत आहे. याचे फायदे देखील आहेत.

सध्या गाई- म्हशींसह इतर काही प्राण्यांच्या कानावर टॅगही दिसतो. आधार कार्ड भारतातील लोकांसाठी बनवले आहे. ज्यामध्ये लोकांचा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर टाकला जातो. त्याचप्रमाणे गाई-म्हशींच्या कानाला लावलेला टॅगही महत्त्वाचा आहे, जो त्यांच्यासाठी आधार कार्डापेक्षा कमी नाही.यामध्ये देखील सगळी माहिती आपल्याला समजणार आहे.

याबाबत माहिती अशी की, हा टॅग लसीकरणापूर्वी लावला जातो. केंद्राच्या राष्ट्रीय रोग नियंत्रण कार्यक्रमाचा एक भाग आहे. या कार्यक्रमांतर्गत प्राण्यांना FMD, खूर आणि तोंड आणि ब्रुसेलोसिस विरुद्ध लसीकरण केले जाते. याआधी, लसीकरणाची माहिती अद्ययावत राहण्यासाठी आणि ओळखीसाठी जनावरांच्या कानात टॅग लावले जातात.

यामध्ये प्राण्यांना 12 अंकी ओळख क्रमांक देखील दिला जातो. ज्याद्वारे लसीकरणाची माहिती वेळोवेळी अपडेट केली जाते. प्राण्यांची नोंदणी माहिती नेटवर्क पशु उत्पादकता आणि आरोग्य प्लॅटफॉर्मवर अपलोड केली जाते. जनावराचे लसीकरण तसेच इतर गोष्टी देखील सेव्ह केल्या जातात. यामुळे जनावर आजारी पडले तरी त्याची माहिती लगेच मिळते.

टॅगच्या आधारे अनेक योजनांचा लाभ घेता येईल. विविध योजनांमध्ये टॅग केलेल्या नोंदणीकृत जनावरांना प्राधान्य दिले जाते. त्याचबरोबर प्राण्यांच्या विम्यामध्ये हा टॅग अनिवार्य करण्यात आला आहे. तर जनावरांची चोरी झाल्यास हा टॅग अतिशय फायदेशीर आहे, ज्याद्वारे जनावरांचा शोध घेता येतो. यामुळे तुम्ही देखील आपल्या जनावरांना हा टॅग लावून घ्या.

महत्वाच्या बातम्या;
टाटा मोटर्स करणार धमाका! 'या' दिवशी करणार 400 किमी रेंज असलेली स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च..
तरुणांनो संधीच सोनं करा! ICMR मध्ये विविध पदांसाठी भरती, असा करा कर्ज..
दुध पावडरचे दर दुपटीने वाढले, दूध टंचाईचा मोठा फटका, शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता...

English Summary: Farmers benefit from 'Aadhar Card' tag on cow and buffalo ears! You get the benefit of 'Ya' scheme ..
Published on: 30 April 2022, 05:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)