Animal Husbandry

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात लंपी रोगाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामुळे आता याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. यामुळे आता काळजी घेणे गरजेचे आहे. यावर आता उपाययोजना केल्या जात आहेत. लंपी रोगाचा फैलाव देशातल्या महाराष्ट्रासह (Maharashtra) इतर 11 राज्यांमध्ये झाला आहे.

Updated on 12 September, 2022 6:20 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात लंपी रोगाने थैमान घातले आहे. यामुळे अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. यामुळे आता याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसत आहे. यामुळे आता काळजी घेणे गरजेचे आहे. यावर आता उपाययोजना केल्या जात आहेत. लंपी रोगाचा फैलाव देशातल्या महाराष्ट्रासह (Maharashtra) इतर 11 राज्यांमध्ये झाला आहे.

यामध्ये हजारो जनावरांचा मृत्यू झाला आहे तर ११ लाखांहून अधिक संक्रमित जनावरे समोर आली आहेत. असे असताना आता जनावरांमधील लंपी या साथीच्या रोगाला आळा घालण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार मैदानात उतरले आहेत. याबाबत त्यांनी माहिती दिली. कर्जत जामखेड मतदारसंघात दोन दिवसांपासून प्रतिबंधात्मक लस देण्यास सुरवात झाली आहे.

त्यासाठी 'बारामती अ‍ॅग्रो 'च्या माध्यमातून सरकारी अधिकाऱ्यांना १ लाख लसी मोफत उपलब्ध करुन देण्यात आल्या आणि गरजेनुसार आणखीही उपलब्ध करुन देण्यात येतील. सरकारी व खासगी डॉक्टर, त्यांचे कर्मचारी तसंच सातारा जिल्ह्यातील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने मतदारसंघात हे लसीकरण वेगात सुरुय.

देशाचे आयटी हब संकटात! पावसाचा हाहाकार, घरात बाहेर सगळीकडे पाणी, हॉटेलमध्ये ४० हजार भाडे..

सर्व पशु पालकांनी आपल्या जनावरांचं लसीकरण करुन लंपीला प्रतिबंध करण्यास सहकार्य करावं, असेही ते म्हणाले. लंपी (Lumpy) त्वचारोग हा देशासाठी एक नवीन आपत्ती म्हणून समोर आला आहे. महामारीच्या रुपात कोरोना नंतर आता देशभरात लंपी त्वचारोग पसरू लागला आहे. परिणामी, सध्या देशातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लंपी त्वचा रोगाने पाय पसरले आहेत.

शेतकऱ्यांचा दुष्काळच हटणार! उसाला 3600 रुपये दर करा, राज्य सरकारची मोदी सरकारकडे मागणी

आतापर्यंत लाखोंहून अधिक जनावरांना या विषाणूची लागण झाली आहे. राजस्थान आणि गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या देशात त्वचारोगाची पहिली प्रकरणे नोंदवली गेली. त्यानंतर काही महिन्यांतच त्वचेचा रोग देशाच्या १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोहोचला आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या;
१०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता, करोडो रुपये जप्त, सोलापूरमध्ये खळबळ...
शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार 50 हजार रुपये, मोदींचा निर्णय..
पतसंस्थाना सीबील लागू होणार? राज्य सरकारची मोदी सरकारकडे मागणी..

English Summary: Farmers be careful! Lumpy disease scourge, 1 lakh free vaccines available through Baramati Agro
Published on: 12 September 2022, 06:20 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)