Animal Husbandry

हिंदू धर्मामध्ये गाय पवित्र मानली जाते. गायीचं शेण (Cow Dung) ग्रामीण भागामध्ये घर किंवा अंगण सारवण्यासाठी वापरलं जातं. तसंच इंधन म्हणून गोवऱ्यांच्या स्वरूपातही वापरलं जातं.

Updated on 17 February, 2022 4:26 PM IST

हिंदू धर्मामध्ये गाय पवित्र मानली जाते. गायीचं शेण (Cow Dung) ग्रामीण भागामध्ये घर किंवा अंगण सारवण्यासाठी वापरलं जातं. तसंच इंधन म्हणून गोवऱ्यांच्या स्वरूपातही वापरलं जातं. अशा प्रकारे शेणाचा अनेक गोष्टींसाठी वापर केला जातो. आता गायीच्या शेणापासून वीजनिर्मिती (Cow Dung Electricity) केली जाणार आहे. सरकार शेणापासून वीजनिर्मिती करणार आहे.

छत्तीसगड सरकार शेणापासून वीजनिर्मिती करणार आहे. यासाठी ४० तरुण उद्योजकांशी करार करण्यात आला आहे. गोधन न्याय योजनेअंतर्गत हा प्रकल्प चालवला जात आहे. गोधन न्याय योजनेअंतर्गत सरकार पशुपालक आणि शेतकऱ्यांकडून शेणखत खरेदी करते. शेणखत खरेदी करण्यासाठी तयार केले गेले आहेत. गोळा केलेल्या कचऱ्याचा वापर करून वीज निर्माण केली जाईल.

गौठाणांमध्ये गांडूळखत तयार करणे तसेच सुरू राहणार आहे. शासनाच्या या प्रकल्पामुळे केवळ रोजगार वाढणार नाही तर शेतकर्‍यांनाही फायदा होणार आहे. गौठाणांमध्ये शेणखत विकून चांगले उत्पन्न मिळते. शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

English Summary: Electricity will be generated from cow dung
Published on: 17 February 2022, 04:26 IST