आजकाल चे शेतकरी शेती ला तोट्याचा व्यवसाय समजत आले आहेत. तसेच नवतरुण युवकांना सुद्धा एखादी 10/15 हजाराची नोकरी करावी शेतीपेक्षा असे वाटत आहे. कारण शेतकरी वर्गाला प्रत्येक वर्षी अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये पाऊस, गारपीट, पिकावरील रोग किंवा कीड, दुष्काळ आणि सुकाळ ही अनेक संकट शेतकरी वर्गासमोर नेहमी उभी राहिलेली असतात. या सर्वांचा सामना करून कसेबसे शेतकरी आपले पीक आणत असतो. परंतु तेवढ्यातच होईल असं नाही.
शेतकऱ्याने आपल्या रानात पिकवलेला माल किंवा उत्पन्न याला बाजारपेठेत चांगला भाव मिळेलच असे नाही. बऱ्याच वेळा शेतकरी वर्गाला बाजारभाव नसल्यामुळे तोच।माल रस्त्यावर टाकून द्यावा लागतो.या सर्व संकटातून वर येण्यासाठी शेतकरी शेती बरोबरच अनेक शेतीपूरक व्यवसाय करत आहे. या मध्ये शेतीबरोबरच पशुपालन तसेच दुग्धव्यवसाय करत आहे, कुकुडपालन, आणि शेतीमधील तळ्यात मत्स्यव्यवसाय करत आहे. या पूरक व्यवसायांमुळे शेतकऱ्यांना शेतीपेक्षा भरघोस नफा मिळत आहे.
हेही वाचा:जाणून घ्या जनावरांमध्ये असलेला मुतखडा व त्यावरील उपाय
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातला आहे त्यामुळे सर्वत्र बंदी होती. याच काळात शेतकरी वर्गात मांसल प्राणी पाळायला सुरवात केली. कारण या काळात मटनाला मोठ्या प्रमाणात मागणी आली त्यामुळे शेतकरी वर्गाने या काळात लहान बकरी, बोकड या सारख्या मांसल प्राण्यांची खरेदी केली आणि त्यांची संभाळनुक करून ठराविक काळानंतर म्हणजेच 2 महिन्याच्या काळात याची विक्री करू लागले. या 2 महिन्याच्या काळात शेतकऱ्यांना मांसल प्राणी विकून दुप्पट नफा मिळू लागला आहे. तसेच काही शेतकऱ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुद्धा सुरू केला आहे. आज भरपूर शेतकरी स्वतः मांस मटण विकताना दिसत आहे त्यामुळं यातून त्यांना चांगलाच नफा मिळत आहे. शिवाय कमी कष्ट करून दुप्पट फायदा मिळत आहे.
या मध्ये शेतकरी लहान बोकड,बकरी, यांची खरेदी करतात. त्यांचे योग्य पद्धतीने संगोपन करून त्यांची 2 महिन्यात पूर्णपणे वाढ होऊ देतात. आणि 2 महिन्यानंतर त्याची विक्री व्यापाऱ्यांना करतात या प्रक्रियेत त्यांना दुप्पट ते तिप्पट पैसे मिळून जातात. म्हणून शेतकरी आता शेतीबरोबरच मांसल प्राण्यांची विक्री करत आहे.
Published on: 12 July 2021, 06:20 IST