भारत हा शेती आणि पशुपालनात पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. आपल्याला माहित आहे कि, एकूण लोकसंख्येपैकी जवळ-जवळ ६० टक्के लोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. पण पशुपालनातील व्यवसायात मात्र फारच थोडे लोक काम करतात. आज या लेखामध्ये आपण असे काही व्यवसाय पाहणार आहोत. जे व्यवसाय पशुपालनासंबंधी आणि शेतीशी निगडित आहेत.
फायदेशीर पशुपालन व्यवसाय
पशुपालन व्यवसायामध्ये गाईंचे पालन हा व्यवसाय काही दिवसांपासून चांगल्याप्रकारे विकसित होत आहे. गायीपालन व्यवसाय फक्त गावांत पुरताच मर्यादित नाही तर शहरांमध्ये सुद्धा याचा विस्तार मोठ्या प्रमाणात होत आहे. गाईंचे पालन करून त्यापासून मिळणाऱ्या दुधावर दुग्धजन्य पदार्थ तयार करून ते विकणे हा फायदेशीर व्यवसाय होऊ शकतो. गाई पालन हा व्यवसाय एक फायदेशीर व्यवसाय आहे. या व्यवसायापासून मिळणाऱ्या दूध आणि शेणापासून चांगल्या प्रकारचा आर्थिक फायदा होऊ शकतो. गाय पालन व्यवसाय हा फक्त चार ते पाच गाई घेऊन सुरू करता येतो. गाईच्या दुधाचा विचार केला तर चांगल्या जातीची एक गाय साधारणपणे ३० ते ३५ लिटर दूध देते. एक लिटर दुधाची किंमत ४० रुपये असते. याप्रकारे एका दिवसात १२०० रुपये पर्यंत कमाई होते. पाच गायींपासून आपण दिवसाला ६ हजार रुपये कमावू शकतो. आपल्याला होणार आहे, त्या दिवसाचा खर्च वजा करून कमीत-कमी दिवसाला २ हजार रुपये अगदी आरामात कमवू शकतो.
मत्स्यव्यवसाय
मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून बऱ्याच प्रकारची मदत केली जाते. मत्स्यपालन हा असा व्यवसाय आहे, यामध्ये कमीत कमी भांडवल लागते व जास्तीचा नफा मिळू शकतो. या दिवसांमध्ये मच्छी पालनासाठी कृत्रिम तलाव या कृत्रिम टॅक इत्यादी कृत्रिमपणे बनवून त्यामध्ये मत्स्यपालन केले जात आहे. मासे खाणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. लोक प्रोटीन आणि माशांपासून मिळणाऱ्या तेलासाठी माशांचं सेवन करतात. एक मासा एक किलो असेल तर त्याला साधरण १०० रुपयांचा भाव आहे. या हिशोबाने आपण ५ हजार माशांची विक्री केल्यानंतर साधरण ४० हजार ते ५० हजार हजार रुपये प्रतिमहिना कमवू शकतो.
शेळीपालन
शेळीपालन पासूनही चांगला आर्थिक फायदा आपल्याला होऊ शकतो. शेळीपालन हा व्यवसाय पाच बकऱ्या येऊनही चालू करता येऊ शकतो. एक बकरी सहा महिन्यांमध्ये दोन पिलांना जन्म देते. जरी एक बकरी बाजारात ४ हजार रुपये प्रमाणे विकली जात असेल तर २ बकरी पासून ८ ते ९ हजार रुपये कमवू शकतात. शेळीपालनासाठी सरकार कर्जाची व्यवस्था करते. त्याच्यामुळे हा व्यवसाय आपण आरामात चालू करू शकतो.
पोल्ट्री व्यवसाय
भारतामध्ये पोल्ट्री व्यवसाय आधी काही वर्षांपासून चांगल्याप्रकारे बहरत आहे. मागील काही वर्षांपासून भारतामध्ये पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या बऱ्याच प्रमाणात वाढले आहे. बऱ्याच ठिकाणी पोल्ट्री फार्म उघडले जात आहे. पोल्ट्री व्यवसायामध्ये आपण अंडी आणि मांसच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे आर्थिक नफा कमवू शकतो. कोंबड्याच्या अंड्यामध्ये आणि मांसामध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने यांची मागणी फार मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
पशुपालनावर सरकारी अनुदान
सरकार गाय पालन, मत्स्यव्यवसाय, शेळीपालन आणि पोल्ट्री व्यवसायासाठी सरकार सब्सिडी देते. ज्यापासून आपण आपला व्यवसाय सुरू करून आपली आर्थिक प्रगती करू शकतो.
Published on: 20 October 2020, 05:36 IST