भारतातील शेतकरी पशुपालन करून चांगली कमाई करत आहेत पण पशुपालनात यशस्वी होण्यासाठी आणि त्यातून चांगली कमाई करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पशुची निगा आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे. पशुमध्ये अनेक गंभीर आजार जाणवतात त्यामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होते. आज आम्ही आपणांस पशुना होणाऱ्या अशाच एका भयंकर आजाराविषयीं सांगणार आहोत
त्यामुळे पशुपालक शेतकरी ह्या आजारावर वेळीच नियंत्रण मिळवू शकतो आणि आपले पशुधन वाचवून चांगली कमाई करू शकतो. मित्रांनो कृषी जागरण आपल्या वाचक मित्रांसाठी पशुमध्ये होणारा बबेसिओसिस ह्या आजारावर माहिती घेऊन आले आहे. बबेसिओसिस ह्या आजारात पशुच्या मलमुत्रातुन रक्त बाहेर येते. आपण ह्याला रक्ताचे अतिसार असे म्हणू शकतो. चला तर मग ह्याविषयीं संपूर्ण माहिती जाणुन घेऊया.
पशुला होणारे रक्ताचे अतिसार हे सामान्य अतिसारापेक्षा अधिक गंभीर आहे. हा बबेसिओसिस रोग झाल्यावर आतड्यांच्या श्लेष्मल त्वचेला सूज येते. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की पशुला जास्त ताप आल्यावर, अचानक तीव्र सर्दी झाल्यावर आणि सडलेला चारा खाल्ल्याने, दूषित पाणी पिण्यामुळे रक्ताचे अतिसार सुरु होतात. हा रोग गुदाशयावर परिणाम करतो आणि त्यामुळे पशुला पातळ रक्ताचे अतिसार होतात. हा रोग गाई, म्हशी, बकरी, मेंढी, कुत्रे, मांजर इत्यादी जनावरांना होतो. मानवाला ह्या रोगाची लागण होत नाही.
रक्ताचे अतिसार होण्याचे कारण
कोक्सीडिया नावाचा प्रोटोझोआ हा या रोगाचे मुख्य कारण आहे आणि ह्याच्या विविध प्रजाती आहेत. पशुना खाल्लेला चारा, उष्ट पाणी आणि कुरणे द्वारे ह्या रोगाचा प्रसार होतो.
ह्या रोगाचे लक्षण
»पातळ, दुर्गंधीयुक्त पाण्यासारखे अतिसार होतात ज्यात श्लेष्मल आणि रक्त असू शकते. पशुमध्ये हा रोग अचानक सुरु होतो.
»रक्त ताजे किंवा गुठळ्या सारखे विष्ठतून पडू शकते
»पशु विष्टा बाहेर टाकताना कन्हते व खुप जोर लावते आणि काहीवेळेस गुदाशय बाहेर देखील येऊ शकतो.
»पशुच्या शरीरात पाण्याची कमतरता भासते, पशु थकतो आणि तणावग्रस्त होऊन जाते.
ह्या रोगावर उपचार
»वासराला सल्फोप्रिसच्या 1-2 गोळ्या द्या.
»Sulphaguanidine, Sulphaguanidine गोळ्या, Sulfa बोलूस च्या गोळ्या द्या
»तुम्ही प्राण्याला तोंडाने बोलस देखील देऊ शकता, उदा.- NT-Zone मोठ्या पशुला दिवसातून दोनदा, लहान वासरला (शेळीचे कोकरू) अर्धा बोलस दिवसातून दोनदा.
»पशुच्या आसपास लाइकार अमोनिया फोर्ट 10% ची फवारणी करा.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
»वासराच्या जन्माच्या वेळी गोठा कोरडा व स्वच्छ असावा.
»गोठ्यात शेण संगळू देऊ नये ते वेळीच गोठ्या बाहेर उकिरड्यावर टाकावे.
»जनावरांची खाण्याची जागा स्वच्छ असावी. त्यांना ज्या भांड्यात पाणी दिले जाईल ते स्वच्छ असावे.
»
गोठ्यात हवेच्या हालचालीसाठी योग्य व्यवस्था असावी.
»वासरांना जुलाब झाल्यास, गोठा जंतुनाशक पदार्थांनी स्वच्छ करावा आणि वासरांना नवीन स्वच्छ गोठ्यात ठेवावे.
»गोठ्यातील बछड्यांची संख्या कमी असावी
»आजारी बछड्यांना स्वतंत्र जागी ठेवून त्यांचा उपचार करावा.
»नवीन वासरे गोठ्यात आणण्यापूर्वी त्यांना काही काळ वेगळे ठेवावे.
»जन्माच्या 12 तासांच्या आत वासरांना कोलोस्टनम दिले पाहिजे.
Published on: 25 October 2021, 03:43 IST