Animal Husbandry

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आपणाला पशुपालन व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर डिजिटल तंत्रज्ञानासोबत चालावेच लागेल आता डिजिटलचा युग आला आहे. कोरोना काळात बाहेर पडणे अशक्य असल्याने डिजिटलचे काय महत्व आहे हे आपल्या सर्वांना समजलेच आहे. असे असताना ही आपण शेतकरी डिजिटल व्हायला घाबरतो. या कारणाने आपण हवी तेवढी आणि वेगाने प्रगती करु शकलो नाहीत. ही कमी भरुन काढण्यासाठी आपण धेनू ऍप बाजारात आणले आहे.

Updated on 12 April, 2021 2:03 PM IST

माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आपणाला पशुपालन व्यवसाय यशस्वी करायचा असेल तर डिजिटल तंत्रज्ञानासोबत चालावेच लागेल आता डिजिटलचा युग आला आहे. कोरोना काळात बाहेर पडणे अशक्य असल्याने डिजिटलचे काय महत्व आहे हे आपल्या सर्वांना समजलेच आहे. असे असताना ही आपण शेतकरी डिजिटल व्हायला घाबरतो. या कारणाने आपण हवी तेवढी आणि वेगाने प्रगती करु शकलो नाहीत. ही कमी भरुन काढण्यासाठी आपण धेनू ऍप बाजारात आणले आहे.

आम्ही आपणाला खात्री देतो की हे ऍप वापरून तुमची सर्व कामे सोपी होतील. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ढोबळमानाने शेती, पशुपालन, कुक्कुटपालन, शेळीपालन असे जोडव्यवसाय केले तर ते तोट्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.गेल्या दहा वर्षांमध्ये कित्येक व्यवसाय चालू होऊन बंद पडले याची देखील आपण खूप उदाहरणे पाहतो त्यामध्ये ज्ञानाचा अभाव, मार्केटिंगची माहिती नसल्याने तरुणवर्ग एक पाऊल मागे टाकताना दिसत आहे.आणि नोकरीला प्राधान्य देत आहेत लॉकडाउनच्या काळात सर्व उद्योगधंदे बंद होऊन प्रत्येकाने आपल्या गावाकडचा रस्ता धरला गावाकडे उद्योगधंदे नसल्याने हाताला काम नाही, उद्योगाचा काही शाश्वत स्रोत नसल्याने पैशाची चणचण भासू लागली, या सर्व परिस्थितीचा आढावा घेता धेनू टेक सोल्युशन प्रायव्हेट लि. कंपनीचे मुख्य अधिकारी श्री.संतोष खवळे सर व त्यांच्या सहकाऱ्यांनी पशुधनाच्या संबंधित दुग्ध उत्पादनाचे एक विकसित मॉडेल तयार व्हावे तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी धेनू ऍप विकसित केले आहे.

आपल्यापाशी ज्ञानाची शिदोरी असली कि, कोणताही व्यवसाय पूर्णतःवास सहज नेता येतो या विचारावर आधारित धेनू ऍपची निर्मिती केली गेली आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात संधी ओळखून जर उद्योगधंदे टाकले तर व्यवसायामध्ये यशस्वी होण्यासाठी जास्त काळ लागत नाही.आपला व्यवसाय चिरंतन टिकण्यासाठी त्यामध्ये होणारे कायिक बदल, नवीन तंत्रज्ञान, नविन मशिनरी, उत्पादनाची बाजारातील आवक तसेच मागणी व त्याचे दर जसजसा टेक्नॉलॉजीचा वापर वाढत जातो तसा पशुपालकांनी देखील आपल्यामध्ये बदलून घडवून आणणे खूप महत्त्वाचे असते. चला तर मग जाणून घेऊयात धेनु ऍपचे कार्य तसेच त्याचा वापर कसा करावा या ऍपमध्ये ४ मोड्यूल आहेत.

१) मंच २) ज्ञान ३) बाजार ४) व्यवस्थापन

१) मंच संबंधित-

  • या मोड्यूलमुळे तुम्ही खूप साऱ्या शेतकाऱ्यांसोबत संबंधित विषयावर चर्चा करू शकता.

  • तुम्ही तुमच्या प्राण्यांसोबतचे फोटो येथे टाकू शकता.

  • धेनु ऍपच्या माध्यमातून पशुपालकांसमवेत तुमच्या ओळखी होण्यास मदत होईल.

  • पशुपालकांचे गोठ्यातील नवनवीन तंत्रज्ञानाविषयीची माहिती तुम्ही जाणुन घेऊ शकता.

  • पशुपालकांनी टाकलेल्या पोस्ट तुम्ही स्थानानुसारही शोधू शकता.

  • तुम्ही पोस्ट टाकण्यासाठी, फार्म पोस्ट तयार करा या बटनावर क्लिक केल्यानंतर नंतर आवडणारा फोटो अपलोड करु शकता.

  • पुढे तुम्ही अपलोड केलेल्या प्रतिमेसंदर्भात माहिती लिहू शकता तसेच प्राण्यांचा प्रकार निवडू शकता जसे की गाय,म्हैस,शेळी आणि मेंढी नंतर हॅशटॅग निवडून तुम्ही तुमची पोस्ट तयार करू शकता.

  • आपल्या गोठ्यातील सर्व गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्याच्या नोंदी या ऍपमध्ये भरू शकता. 

  • तुम्ही आवडलेले फोटो लाईक करू शकता तसेच त्यावर टिप्पणी करू शकता आणि तो फोटो शेअर ही करू शकता.

  • धेनू ऍपने यामध्ये एक फिचर टाकले आहे, ज्यामुळे तुम्ही आक्षेपार्ह असलेल्या पोस्टवर फ्लॅगचे बटन क्लिक करु शकता जेणेकरून ॲपकडून त्याची तपासणी करून ती पोस्ट डिलीट केली जाईल.

  • त्याच मोड्यूलमध्ये तुम्हाला प्रश्न/उत्तरे हा एक पर्याय दिसेल जिथे तुम्हाला प्राण्यांबद्दल असणारे सर्व प्रश्न येथे तुम्ही प्रश्न विचारा या बटनावर क्लिक करुन तुमचे प्रश्न विचारू शकता त्यानंतर तिथे तुम्हाला पशु वैद्यकीय तज्ञांकडून अचूक उत्तरे मिळतील.

 

२) ज्ञान संबंधित- 

  • हे मोड्यूल खरे तर पशुपालकांपर्यंत पशुधनाची आधुनिक माहिती मिळावी त्याचा त्यांना  दैनंदिन व्यवस्थापनात उपयोग व्हावा यासाठी बनवला गेला आहे.

  • पशुधनाविषयीची माहीती आपणाला आर्टिकल, व्हिडिओ आणि ऑडीवो यामार्फत मिळेल.

  • येथे तुम्हाला आवडणारे आर्टिकल लाईकही करू शकता जे तुम्हाला माझी पसंत या विभागात दिसतील तसेच सर्वात लाईक झालेले आर्टीकल तुम्हाला सर्वात लोकप्रिय या विभागात दिसतील तसेच ते आर्टिकल आपण इतर मित्रांना देखील पाठवू शकता.

  • जर तुम्हाला विशिष्ट प्रकाराबद्दल माहीती वाचायची किंवा ऐकायची असेल जसे की गाय,शेळी, आरोग्य, व्यवस्थापन, उत्पादकता, लसीकरण तर तुम्ही तिथे दिसणाऱ्या हॅशटॅग वर क्लिक करुन ती विशीष्ट प्रकारची माहीती वाचू शकता.

  • जनावरांची निगा कशी राखावी व त्यांचे व्यवस्थापन कसे करावे,

  • जनावरांना कोणत्या प्रकारचा चारा द्यावा. 

  • सकस चाऱ्याचे विक्रमी उत्पादन कसे घ्यावे.

  • मुरघास कसा तयार करावा त्याचे पशु आहारातील फायदे.

  • ओल्या व सुक्या चाऱ्याचे पशु आहारातील महत्व. 

  • जनावरांचा गोठा कसा बांधावा तसेच त्याचे डिझाईन कसे असावे.

  • मुक्त संचार गोठ्याचे फायदे. 

  • गोठ्याचे सिझन नुसार व्यवस्थापन कसे करावे,

  • नवजात वासराची निगा कशी राखावी.

  • अश्या अनेक विषयासंबंधित माहिती आपणास पाहावयास मिळेल. 

 

३) बाजार संबंधित-

  • बाजार हा मोड्यूल तुम्हाला खुपच फायदेशीर ठरणारा आहे.

  • यामध्ये आपण घरबसल्या आपल्या परिसरातील विक्रिस असणारी जनावरे पाहू शकता.

  • विक्रिस असणाऱ्या प्राण्याची माहीती जसे की जनावराचा प्रकार, जात, लिंग, अपेक्षीत किंमत, तुमच्या पासुन तो किती अंतरावर आहे आणि त्याचे स्थान हे ही तुम्ही पाहू शकता.

  • प्राण्याच्या फोटोवर क्लिक केले असता तुम्हाला विक्रेत्याचा मोबाईल नंबर ही मिळेल जेणेकरुन तुम्ही त्याच्याशी सहजतेने संपर्क करुन जनावराची खरेदी विक्री करू शकता.

  • तुम्हाला विशिष्ट प्राण्याबद्दलच्या विक्री बद्दल माहिती घ्यायची असेल तर त्या किवर्ड वर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर्गीकरण होऊन माहिती येईल.

  • तुम्हाला जर प्राण्याची विक्री करावयाची असेल तर तुम्ही यामध्ये खाली दिसणाऱ्या छोट्या प्राण्याच्या आयकॉन वर क्लिक करावे नंतर तिथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील.

  • प्राणी व्यवस्थापन मधून प्राणी निवडा- यामध्ये जर तुम्ही प्राण्याचा प्रोफाईल पहीलेच सेव्ह केला असेल तर तिथुन प्राणी घेऊ शकता. 

  • नवीन प्राणी विक्री करा-

  • यामध्ये तुम्ही जनावराचा प्रकार आणि लिंग या प्रकारची माहिती भरून प्राणी विक्रीस ठेऊ शकता.

 

४) व्यवस्थापना संबंधित-

  • या मोड्यूल खास करून प्रौढ पशू व्यवस्थापन आणि बाल पशू व्यवस्थापन या संबंधित बनवला गेला आहे.

१) प्रौढ पशू व्यवस्थापन- 

  • आपण आपल्या प्राण्यांसंबंधित प्रोफाइल  इथे तयार करु शकता.

  • तुम्हाला खाली उजव्या बाजुला असणाऱ्या हिरव्या बटनावर क्लिक करायचे आहे आणि तिथे सर्व माहिती भरल्यानंतर प्रौढ पशू प्रोफाईल तयार करा या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या प्राण्याचा प्रोफाईल तयार होईल.

  • त्यानंतर तुम्ही प्रजनन स्थितीवर क्लिक करावे आणि त्या प्राण्याची डिलीवरी, पहिली हीट, पहीले क्रतिम रेतन याची तारीख भरावी नंतर अपेक्षीत तारीख आपोआप पुढे येईल आणि त्या अधिसुचना वेळेवर आपणाला मिळत राहतील.

  • अश्याच प्रकारे आपण लसिकरण केलेल्या तसेच जंतनाशक दिलेल्या तारखा टाकु शकता जेणेकरून तुम्हाला अपेक्षीत तारखा पुढे येतील आणि त्याप्रमाणे अधिसूचना वेळेवर मिळत राहतील.

   २) बाल पशु व्यवस्थापन-

  • प्रौढ पशू व्यवस्थापन प्रमाणेही बाल पशु व्यवस्थापन आपण वापरु शकतो.

  • यामध्ये वासराच्या वाढीची स्थिती,जंतनाशन आणि लसीकरण याच्या तारखा टाकल्या तर पुढच्या तारखा आपोआप अपेक्षीत दिनांक मध्ये प्रविष्ट होतील.

  • आपल्याला शेळी, गाय, म्हैस, मेंढी हे किवर्ड दिसत आहेत ज्यावर क्लिक केले की आपल्याला त्या विशीष्ट प्राण्याबद्दलची  माहिती दिसेल.

  • या व्यवस्थापन  मोड्यूलमध्ये आपल्याला वरती उजव्या बाजुला घंट्याचे चिन्ह दिसेल ज्यावर क्लिक केले की आपल्याला आलेल्या सर्व अधिसुचना दिसतील. उदा- तुमची गिता शेळी २९ डिसेंबर ते ३ जानेवरी या दरम्यान हिटवर येऊ शकते. या अधिसूचनेमुळे उपाययोजना करणे सोपे जाते.

  • धेनु अँप घेते जनावरांच्या अचूक नोंदींची दखल त्यामुळे जनावरांच्या व्यवस्थापनात अडचण निर्माण होत नाही.  

  • प्राण्यांची शिंगे काढण्याचे फायदे काय आहेत या विषयीची माहिती आपणाला इथे मिळेल.

  • व्यवस्थापना संबंधित नवनवीन माहिती आपणाला ऑडिओ मार्फतही ऐकायला मिळतील.

  • या ॲपमध्ये होमपेजवर वरती डाव्याबाजुला हॅमबर्गर मेंनू दिसेल ज्या आडव्या तिन रेषा आहेत यावर क्लिक केले असता तिथे तुम्हाला तुमचा प्रोफाइल फोटो दिसेल.

  • तुम्हाला तुमच्या ॲपची भाषा बदलता येईल तसेच तुम्हाला आवडलेली पोस्ट पाहता येईल.

  • तुम्ही विक्रीस ठेवलेल्या प्राण्यांच्या पोस्ट दिसतील तसेच आवडलेली विक्री पोस्ट पाहता येईल.

  • धेनू ॲप निशुल्क असल्याने आपण इतर पशुपालकांना शेयर करु शकता त्याचा फायदाही त्यांना घेता येईल तसेच तुमच्या मार्फत डाउंनलोड झालेले शेतकरी ही ईथे दिसतील त्यांचे तुम्ही आता रेफरल असाल.

  • अश्या प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेत प्रकाशित झालेले पशुपालकांच्या अविरत सेवेसाठी वापरण्यास अगदी सुलभ,सोपे आणि सुटसुटीत असणारे धेनू ॲप.

 

टीप- पशुधनासंबंधित आधुनिक माहिती व नवनवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअर वर जाऊन धेनु ॲप डाऊनलोड करा किंव्हा खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपला व्यवसाय दुपट्टीने वाढवा.

 https://www.dhenoo.com/app/

 लेखक 

नितीन रा.पिसाळ

प्रकल्प समन्वयक,(डेअरी प्रशिक्षक)

धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी, पुणे.

मो.बा- 9766678285. ईमेल-nitinpisal94@gmail.com

English Summary: Dhenu app is a boon for catttle breeders
Published on: 23 February 2021, 07:04 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)