आजकाल वाढती बेरोजगारी लक्षात घेता तरुणांनी शेतीकडे वळण्याची खुप गरज आहे. त्यामुळे जास्तीत जास्त तरुणांनी शेतीकडे वळावे यासाठी शहरी तसेच ग्रामीण भागांमध्ये कृषी किंवा पशु प्रदर्शने आयोजित केली जातात. प्रदर्शनामध्ये एकाच छताखाली शेती किंवा पशुधनाच्या संबंधित असणारी सर्व माहिती शेतकऱ्यांना पहायला मिळते. कृषी आणि पशु व्यवस्थापनामध्ये दररोज काही ना काही बदल होत असतात त्याबद्दलचे आधुनिक तंत्रज्ञान उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे व त्या तंत्रज्ञानाचा शेतकरी बांधवांना फायदा व्हावा या अनुषंगाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी श्री. तुळजाभवानी कृषी महोत्सवाचे दि- १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान आयोजन केले होते.
या पाच दिवस चालणाऱ्या कृषी प्रदर्शनात विविध कंपन्यांचे स्टॉल्स सहभागी झाले होते. त्यात पशुधनाचे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचावे व शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता यावा यासाठी धेनू कंपनीने सहभाग नोंदवला होता. या कृषी प्रदर्शनात नवनवीन तंत्रज्ञान अनुभवण्यासाठी लाखों शेतकरी, महिला पशुपालकांसह शालेय विद्यार्थ्यांनी तसेच छोट्या-मोठ्या उद्योजकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. त्यात धेनू अॅप हे दूध उत्पादक शेतकरी व पशुपालकांचे प्रमुख आकर्षण ठरले होते.
धेनू ॲपची खास वैशिष्ट्ये-
• शेतकरी व पशुपालकांच्या हक्काचे डिजिटल व्यासपीठ
• गोठ्यातील नाविन्य व आधुनिकता दर्शवण्यासाठी- मंच विभाग
• पशुपालना संबंधित अडचणींच्या निराकरणासाठी- प्रश्न-उत्तरे विभाग
• दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी स्वतंत्र- पशु ज्ञान विभाग.
• जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी- पशु बाजार विभाग
• जनावरांच्या डिजिटल (नोंदीसाठी) व्यवस्थापनासाठी- पशुव्यवस्थापन विभाग
• शेतकरी ग्राहक ते थेट व्यावसायिक जोडले जाण्यासाठी- बिजनेस सबस्क्रिप्शन विभाग
• तज्ञांचे मार्गदर्शन व पशुपालकांच्या यशोगाथा जाणून घेण्यासाठी- धेनू इंडिया यूट्यूब चॅनल
• ताज्या घडामोडींसाठी - धेनू बुलेटीन / वार्ता
• पशुधनाच्या काळजीचा सल्ला- दररोज धेनू पशुसल्ला
दुग्धव्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञानाचं भव्य पशु दालन-धेनू ॲप
ग्रामीण भागातील पशुपालकांचा विकास व्हावा व त्यांचे एकात्मिक दूध उत्पादन वाढावे यासाठी पशुपालन व दुग्धव्यवसायातील अत्याधुनिक माहिती देणारे धेनू ॲप हे मंच, पशु ज्ञान, पशु बाजार, पशु व्यवस्थापन यांसारख्या विविध फीचर्ससह प्लेस्टोअरवरती मोफत उपलब्ध करून दिले आहे.
गुलाबराव पाटील गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? शेतकरी नेत्याने केली जोरदार टीका..
आज धेनू ॲप हे लाखों शेतकऱ्यांच्या दुग्धव्यवसायात बदल करून उत्पादन वाढविण्यासाठी खूप महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येत आहे.
काय आहेत कृषी प्रदर्शनाचे फायदे?
• नवनवीन खते, बियाणे आणि औषधे याची माहिती डेमोसहित पाहायला मिळते.
• ट्रॅक्टर-चलीत नवनवीन यंत्रे जसे की नांगरणी, पेरणी, खुरपणी, डवरणी, छाटणी आणि सोंगणी यंत्रे पहायला मिळतात.
• कमी जागेमध्ये जास्त पीक उत्पादन कसे घेतले आहे त्याचे डेमो प्लॉट देखील पाहायला मिळतात.
• रोग व किडींचे नियंत्रण करण्यासाठी केलेल्या व्यवस्थापनाचे प्लॉट देखील पाहायला मिळतात.
• कमी जागेमध्ये व्हर्टीकल शेती कशी करावी शेडनेट, पॉलिहाऊस, ग्रीन हाऊस शेती व पीक उत्पादने पाहायला मिळतात.
• टाकाऊ पदार्थांचे विघटन व टाकावू पासून टिकाऊ पदार्थांची निर्मिती या संबंधित विविध बाबी पाहायला मिळतात.
• ऑटोमॅटिक पद्धतीने शेताला पाणी व खत व्यवस्थापनासाठी सूक्ष्म सिंचन प्रणाली, रेनगन, स्प्रिंकलर इरिगेशन प्रणाली संच पाहायला मिळतात.
• इलेक्ट्रिक व सौर उर्जेवर चालणाऱ्या मोटारी, वाहने, गाड्या, ट्रॅक्टर्स पाहायला मिळतात.
• शेतकऱ्यांनी घेतलेले विविध रंगांमधील दर्जेदार पीक उत्पादने उदा- कांदा, मिरची, डाळिंब, पेरू, संत्री, द्राक्ष, ऊस, केळी पाहायला मिळतात.
• शेतीमध्ये आपणाला येणाऱ्या प्रत्येक अडचणींचे समाधान या कृषी दालनांमध्ये होते.
• शेती क्षेत्रातील विविध तज्ञ मंडळी, वैज्ञानिक या ठिकाणी त्यांच्या कार्याची माहिती प्रसारीत करण्यासाठी उपलब्ध असतात.
काय आहेत पशु प्रदर्शनाचे फायदे?
• अधिक दूध उत्पादन देणाऱ्या गाई-म्हशी व त्यांची वंशावळ या ठिकाणी पाहायला मिळते.
• चारा व्यवस्थापनातील आधुनिकता जसे कि उदा. चारा बियाणे, सायलेज बंकर, बेल सायलेज, मुरघास बॅग इत्यादी.
• जनावरांचे हूप ट्रिमिंग, हूप बाथ, हेअर ट्रिमिंग, काल्फ पेन, हेड लॉक सिस्टिम पाहायला मिळतात.
• जनावरांच्या आरामासाठी रबर मॅट, खरारा करण्यासाठी ग्रुमिंग ब्रश, दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन, चारा कट करण्यासाठी कुट्टी मशीन, गोठ्यात थंडावा निर्माण करण्यासाठी कमर्शिअल फॅन व फॉगर्स पाहायला मिळतात.
• टी.एम.आर मशीन, पशुखाद्य तयार करण्याची मशीन, जनरेटर इत्यादी छोट्या-मोठ्या मशिनरी पाहायला मिळतात.
• देशी गाई पासून बनवलेली देशी गो-उत्पादने आपणाला पहावयास मिळतात.
• थेट गाई, म्हशी, शेळी व मेंढी पालकांसोबत संवाद साधू शकता व त्यांच्या यशस्वी गोपालनाची माहिती घेऊ शकता.
शेतकऱ्यांनो खतातील बनावटपणा असा ओळखा, पिकाचे नुकसान होणार नाही..
दुग्धव्यवसायामधील डिजिटल तंत्रज्ञानाची माहिती देऊ शकता.
• दुग्धव्यवसायातील तज्ञांशी व वैज्ञानिकांशी संवाद साधून आपल्या अडचणीचे निराकरण करू शकता.
• पशुपालना संबंधित असलेली पुस्तके, व्हिडीओ कॅसेट, बुकलेट खरेदी करू शकता व माहिती मिळवू शकता.
जाहिरात-
1) पशुधन मिल्किंग मशीन
पशुधन मिल्किंग मशीन ऑर्डर करण्यासाठी कॉल करा.
मो. नं. - ८२०८५२०९४१
2) दिपकार
देशी गाईच्या शेणापासून दिवे बनवण्याची मशीन
पकार मशीन ऑर्डर करण्यासाठी आजच या नंबरवर कॉल करा.मो. नं. 9130233557, 7499944628
• दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्लेस्टोअर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
• लिंक -https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=XXPBY3
लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा. लि. भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285.
ईमेल-nitinpisal94@gmail.com
महत्वाच्या बातम्या;
दुबईमध्ये 17 व्या आंतरराष्ट्रीय कृषी विज्ञान परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन, कृषी जागरणचाही सहभाग
शेतकऱ्यांनो गहू कीड नियंत्रण माहिती
शेतकऱ्यांनो उसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव कसा घालवायचा, जाणून घ्या..
Published on: 17 February 2023, 02:32 IST