Animal Husbandry

शेळीपालन हा शेतीला पूरक आणि बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्याची ताकद असलेला अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीला भारतात गरीबाची गाय असे म्हटले जाते. या लेखामध्ये आपण शेळ्यांना होणारे आजार व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय कोणते याबद्दल माहिती घेणार आहोत.

Updated on 16 October, 2021 10:25 AM IST

 शेळीपालन हा शेतीला पूरक आणि बेरोजगार युवकांना रोजगार मिळवून देण्याची ताकद असलेला अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे. शेळीला भारतात गरीबाची गाय असे म्हटले जाते. या लेखामध्ये आपण  शेळ्यांना होणारे आजार व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय कोणते याबद्दल माहिती घेणार आहोत.

शेळ्यांना होणारे गंभीर स्वरूपाचे आजार

  • आंत्रविषार( ई. टी.व्ही.)-खाद्यातील बदलामुळे हा रोग होतो. अवकाळी पावसानंतर किंवा पावसाळ्यात सुरुवातीला येणारे हिरवे गवत जास्त प्रमाणात खाल्ल्यास हा रोग होतो. मरण्यापूर्वी शेळीमध्ये फारशी लक्षणे दिसत नाहीत. संध्याकाळी उशिरा एक दोन उड्या मारून किंवा चक्कर खाऊन शेळी हात पाय झाडत प्राण सोडते.

प्रतिबंध

  • लसीकरण महत्त्वाचे आहे.इटीव्ही लस नोव्हेंबर-डिसेंबर तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे उशिरात उशिरा 15 जून पर्यंत दरवर्षी द्यावी. सगळ्यांना विशेष माकडांना कधीही ताजा पाला खाण्यासाठी देऊ नये.
  • किंचित सुकलेला किंवा एक दिवसाचा शिळा चारा खायला द्यावा.
  • धनुर्वात- जखमी द्वारे जंतूंचा प्रवेश होऊन हा रोग होतो. शरीरातले स्नायू आखडतात व शेळीचा मृत्यू होऊ शकतो.

प्रतिबंध

  • शेळी विण्यापूर्वी किंवा इतर वेळी कोठेही मोठी जखम झाल्यास प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
  • फुफ्फसदाह( निमोनिया)-फुफ्फुस दाह हा रोग प्रामुख्याने शाळा पावसात भिजल्याने अथवा हवामानातील घटकांच्या अचानक होणाऱ्या बदलामुळे जेव्हा जनावराची प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा या रोगाची शक्यता बळावते. तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकार्‍यांशी संपर्क करून उपचार करून घ्यावेत. कुठल्याही परिस्थितीत करडे आणि शेळ्या पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
  • हगवन- व्यवस्थापन योग्य नसेल तर हा रोग होतो. घाणीमुळे या रोगास कारणीभूत असणाऱ्या इकोलाय सारख्या जंतूंचा प्रसार होतो. आपल्या शेळी फार्म वर स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
  • खुरी यालाच तोंडखुरी किंवा पायखुरी असे म्हणतात. जीभ, तोंड, खुरांचे बेचके आणि स्तनांवर फोड आलेले दिसून येतात. शेळी लंगडी चालते. यावर प्रतिबंध म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घ्यावे.
  • फऱ्या- पुढच्या किंवा मागच्या फऱ्यावर किंवा मागच्या पुठ्ठ्यावर सूज येते. कातडी काळी पडते. शेळी खात पीत नाही. उपचार न केल्यास शेळी 8 ते 24 तासात मरते. त्यामुळे लक्षणे दिसताच उपचार सुरू केले पाहिजेत.
  • यावर प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जून महिन्यात लस टोचून घ्यावी. घटसर्प आणि फर्या अशी एकत्रित लस पण उपलब्ध आहे.
  • सांसर्गिक गर्भपात- कळपात राहणार्‍यांनरा कडून हा रोग प्रसारित होतो. दोन ते अडीच महिन्याच्या गर्भधारणेनंतर गर्भपात होतो. नंतर शेळी माजावर न येणे, कायमची भाकड होणे असे प्रकार होतात. यामध्ये रक्त तपासणी आवश्यक असते. गाभन शेळी चा गर्भपात झाल्यास गर्भ आणि वार खोल खड्डा करून त्यावर चुना टाकून पुरून टाकावे.
  • घटसर्प- स्वयं हा रोग क्वचित होतो. श्वास घेण्यास त्रास होतो तसेच घशातून खरखर आवाज येतो व ताप येतो.

शेळ्यांचे बहुतांश आजार लसीकरणा द्वारे टाळता येऊ शकतात. शक्यतो उन्हाळ्याच्या शेवटी लस टोचून घ्यावी.

English Summary: dengerous disease in goat farming and vacccination
Published on: 16 October 2021, 10:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)