बेरोजगार लोकांसाठी शेळीपालन अत्यंत उपयोगी आणि भरपूर नफा मिळवून देणारा व्यवसाय झाला आहे.शेळीला भारतात गरीबाची गाय असे म्हणतात. कोरडवाहू शेती सोबत करता येण्यासारखा हा एक शेतीपूरक व्यवसाय आहे.किरकोळ किंवा चढउतार असलेल्या पृष्ठभागाच्या जमिनी ह्या गाय किंवा इतर प्रकारच्याजनावरांसाठी चांगल्या नसतील तेथे शेळी हा उत्तम पर्याय आहे. या लेखात आपण शेळ्यांना होणारे महत्त्वाचे आजार आणि त्यावरील उपाय पाहणार आहोत.
शेळ्यांना होणारे महत्त्वाचे आजार आणि त्यावरील उपाय
आंत्रविषार
खाद्यातील बदलामुळे हा रोग होतो. अवकाळी पावसा नंतर किंवा पावसाळ्यात सुरुवातीला येणारा हिरवे गवतजास्त प्रमाणात खाल्ल्यास हा रोग होतो.मरण्यापूर्वी शेळीमध्ये फारशी लक्षणे दिसत नाहीत.संध्याकाळी उशिरा 1ते2 उड्या मारून किंवा चक्कर खाऊन शेळी हात पाय झाडत प्राण सोडते.
प्रतिबंध
1-या आजारासाठी लसीकरण फार महत्त्वाचे आहे. ईटीव्ही लस नोव्हेंबर डिसेंबर तसेच पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे उशिरात उशिरा 15 जून पर्यंत दरवर्षी द्यावी.
2-शेळ्यांना विशेषता करडांना कधीही ताजा पाला खाण्यासाठी देऊ नये.
- किंचित सुकलेला किंवा एक दिवसाचा शिळा चारा खायला द्यावा
धनुर्वात
जखमी द्वारे जंतूंचा प्रवेश होऊन हा रोग होतो.शरीरातील स्नायू आखडतात व शेळीचा मृत्यू होऊ शकतो.
प्रतिबंध
1-शेळी विण्यापूर्वी किंवा इतर वेळी कोठेही मोठी जखम झाल्यास प्रतिबंधक लस टोचुन घ्यावी.
फुफ्फुसदाह( निमोनिया)
- फुफ्फुसदाह रोग प्रामुख्याने शेळ्या पावसात भिजल्याने अथवा हवामानातील घटकांच्या अचानक होणाऱ्या बदलामुळेजेव्हा जनावराची प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा या रोगाची शक्यता बळावते.
- तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय अधिकार्याची संपर्क करून उपचार करून घ्यावेत.
- कुठल्याही परिस्थितीत करडे आणि शेळ्या पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.
हगवन
1-व्यवस्थापन योग्य नसेल तर हा रोग होतो.
- आणि मुळे या रोगास कारणीभूत असणाऱ्याजंतूंचा प्रसार होतो.
- आपल्या शेळी फार्मवरस्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
तोंडखुरी
- यालाच तोंडखुरी किंवा पायखुरी असे म्हणतात.
- जीभ, तोंड,खुरांचे बेचके आणि स्तनांवर फोड आलेले दिसून येतात.
- शेळी लंगडत चालते.
- यासाठी दरवर्षी पावसाळ्यापूर्वी लसीकरण करून घ्यावे.
सांसर्गिक गर्भपात
- कळपात राहणाऱ्या नराकडून हा रोग प्रसारित होतो.दोन ते अडीच महिन्याच्या गर्भधारणेनंतर गर्भपात होतोव त्यानंतर शेळी माजावर न येणे,कायमची भाकड होणे,वारंवार गर्भपात होणे असे प्रकार होतात.
- रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.
- गाभण शेळीचा गर्भपात झाल्यास गर्भ आणि वार खोल खड्डा करूनत्यावर चुना टाकून पुरून टाकावे.
स्तनदाह
1-सडातून कासेत किंवा कासेला झालेल्या जखमेतून जंतूंचा प्रवेश होतो.
2- करडू काही कारणाने मरून गेल्यास कासेत दूध राहते त्यामुळे जंतू वाढतात.
- कास घट्ट होते व दुधात गाठी दिसून येतात व दूध नासते.
- कासे मध्ये दूध राहणार नाही याची दक्षता घ्यावी व उपचार करून घ्यावे.
घटसर्प
1-शेळ्यांना हा रोग होतो व श्वास घेण्यास त्रास होतो.
2-घशातून खरखर आवाज येतो व ताप येतो.
Published on: 09 December 2021, 05:22 IST