दुग्ध व्यवसाय हा जगातील जवळपास सर्वच देशांचा मुख्य व्यवसाय आहे. यामुळे अनेक देश यामध्ये अग्रेसर आहेत. यामध्ये न्यूझीलंडचा देखील वरती नंबर लागतो. दूध उत्पादनात जगातील पहिल्या दहा देशांमध्ये समावेश असलेल्या न्यूझीलंडने गायींसह गुरांसाठी नवा कायदा केला आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे. हा देश पर्यावरणाला घेऊन सुद्धा खूप अलर्ट आहे. इथे होणारे कायदे, नियम हे सगळे पर्यावरणाला (Environment) पूरक असतील असा विचार करूनच ते अंमलात आणले जातात.
आता गायींसह गुरांसाठी नवा कायदा आणल्याने गायींचे मालक या कायद्यामुळे खूप नाराज आहेत. यामुळे हा कायदा एक चर्चेचा विषय बनला आहे. न्यूझीलंड सरकारच्या निर्णयानुसार आता गायीसह इतर गुरांनी ढेकर दिल्यावर त्यांच्या मालकांना शेतकऱ्यांना कर (Tax) भरावा लागणार आहे. असा कायदा आणणारा न्यूझीलंड हा जगातील पहिला देश ठरला आहे. यामुळे हा आगळा वेगळा कायदा वाचून अनेकांना नवल वाटले आहे.
याबाबत माहिती अशी की, ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार असलेल्या हरितगृह वायूंच्या (ग्रीनहाउस गॅस) उत्सर्जनावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गुरांनी ढेकर दिल्याने हरितगृह वायूचे उत्सर्जन होते आणि त्यामुळे पर्यावरणाची हानी होते, असे या कायद्यात म्हटले आहे. न्यूझीलंडच्या पर्यावरण मंत्रालयाने या नव्या कायद्यासंदर्भात बुधवारी एक मसुदा जाहीर केला आहे.
मोठी बातमी! दारू 40 टक्यांनी स्वस्त, महसूल वाढीसाठी मोठा निर्णय
यामुळे आता शेतकऱ्यांना आता 2025 पासून गुराढोरांच्या ढेकर देण्यावर कर भरावा लागणार आहे. 50 लाख लोकसंख्या असलेल्या न्यूझीलंडमध्ये सुमारे 1 कोटी गुरेढोरे आहेत. मेंढ्यांची संख्याही 26 लाख आहे. या निर्णयामुळे मात्र शेतकरी नाराज असल्याचे सांगितले जात आहे. सर्वात जास्त काळ वातावरणात राहणाऱ्या गॅसवर अधिक कर,कमी काळ वातावरणात राहणाऱ्या गॅसवर कमी कर आकाराला जाईल, यामुळे या निर्णयाची सध्या चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या;
मोफत रेशन धारकांसाठी आनंदाची बातमी! सरकारने घेतला मोठा निर्णय
शेतकऱ्यांची काळजी मिटली! आता प्रत्येक शुक्रवारी हवामानाच्या अंदाजासह मिळणार कृषी तज्ज्ञांचा सल्ला
शेतकऱ्यांनो 'ही' जात लय भारी!! गाई देते सर्वात जास्त दूध, वाचा सविस्तर..
Published on: 11 June 2022, 04:10 IST