बळीराजा शेती बरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे पूरक व्यवसाय सुद्धा करत असतो त्यामध्ये शेळीपालन, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यव्यवसाय व दुघव्यवसाय इत्यादी प्रकारचे वेगवेगळे व्यवसाय करून आपले उत्पन्न वाढवत असतो तसेच उत्पन्नाचा नवीन स्रोत तयार करत असतो.
दशरथ घासाचे फायदे:-
पशुपालन, शेळीपालन करायचे असेल तर सर्व नियोजनात्मक असणे खूप गरजेचे असते त्यामध्ये पाणी, ओला कचरा, सुका कचरा, रोगराई व्यवस्थापन करणे खूपच गरजेचे असते. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना आपल्या दुभत्या गाईंसाठी ओल्या चाऱ्याची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते परंतु बऱ्याच वेळा गाई किंवा दुभत्या जनावरांना ओला चारा नेहमी देणे शक्य नसते. उन्हाळा, किंवा दुष्काळ असलेल्या परिस्थिती मध्ये तर बिल्कुल शक्य नसते. परंतु या वर उपाय म्हणून तसेच दुभत्या जनावरांना आवश्यक असणारा दशरथ घास हा ओल्या चाऱ्याची कमतरता पुरवत आहे. दशरथ घास हा जनावरांसाठी खूप मोठया प्रमाणात पौष्टीक असतो. तसेच दुभत्या जनावरांना जर का दशरथ घास खाऊ घातल्यास दुधाचे उत्पन्न सुद्धा वाढते. तसेच या मध्ये जनावरांना आवश्यक असणारे प्रोटिन्स चे प्रमाण मोठया प्रमाणात आढळते. तसेच गाई च्या दूध देण्याच्या क्षमतेत सुद्धा सातत्य राहिल्यामुळे शेतकरी वर्गाला सुद्धा मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे.
आवश्यक तत्वे:-
दशरथ घास हा जनावरांना मोठ्या प्रमाणात पौष्टीक घटक पुरवत असतो. दशरथ घासमध्ये प्रोटिन्स, फॉस्फरस तसेच कॅल्शियम चे प्रमाण मोठया प्रमाणात असते. तसेच दूध वाढीसाठी दशरथ घास फार उपयुक्त आहे. सध्या आपल्या देशात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे घास उपलब्ध आहेत. त्यामधील एक म्हणजे हा दशरथ घास. या घासाची प्रजाती ही 1976 साली थायलंड या देशातून आपल्या देशात आणली आहे. कृषी वैज्ञानिक यांच्या मते दशरथ घास हा जनावरांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे तसेच दुग्धव्यवसाय करणाऱ्या लोकांनी याचा वापर आपल्या जनावरांच्या चाऱ्यात केला तर मोठया प्रमाणात दुधाचे उत्पन्न वाढेल असे सुद्धा सांगितली आहे.
लागवड आणि कापणी प्रक्रिया:-
दशरथ घास लागणीसाठी कोणत्याही प्रकारचे जमीन उपयुक्त असते. परंतु शक्य असल्यास पाणी धरून ठेवणारी आणि काळी मृदा असलेल्या जमिनीचा वापर करावा. तसेच पेरणी च्या वेळी शेतामध्ये शेणखत घालावे. या घासाची पहिली कापणी ही 25 दिवसांनंतर येते. परंतु दुसऱ्या कापणी 15 दिवसात होते.
Published on: 15 December 2021, 03:02 IST