जनावरांमधील दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी प्रोटीन असलेला आहार जनावरांना खायला घातला जातो. जनावरांचे दूध उत्पादन क्षमता चांगली राहिली तर पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होते परिणामी त्यांची आर्थिक स्थिती सुधारते.
आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून अशा एका आहाराबद्दल माहिती देणार आहोत,जो जनावरांना खायला घातल्याने दूध उत्पादनात वाढ होते. इतकचं नाही तर त्यांचे आरोग्य देखील स्वस्थ राहते.
आपण माहिती घेणार आहोत दशरथ घास बद्दल. त्याचे वैज्ञानिक नाव हे डेसमेंथस असे आहे. यामध्ये प्रोटीनची मात्रा जास्त प्रमाणात असते. जे जनावरांसाठी फारच फायदेशीर आहे.दूध देणारी गाय, म्हैस आणि बकरी इत्यादींसाठी दशरथ घास खूप पौष्टिक मानला जातो.
हा चारा शेतकरी जनावरांना खाऊ घालून जास्त कालावधीपर्यंत दूध उत्पादन मिळवूशकतात. दशरथ घासाची लागवड ही दुष्काळ प्रवण क्षेत्र देखील केली जाते.याच्या लागवडीच्या माध्यमातून शेतकरी दरवर्षी 30 ते 50 टन प्रति हेक्टर चारा प्राप्त करू शकतात.
दशरथ घास आहे जनावरांसाठी उपयुक्त(Dashrath Grass Benificial For Animal)
दशरथ घास मध्ये प्रोटीन ची मात्रा अधिक प्रमाणातमिळते. यासोबतच यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सुद्धा जास्त असते.जेजनावरांमधील दूध उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त असते.
पशुपालन क्षेत्रांमध्ये जनावरांचे दूध उत्पादन क्षमता वाढावी यासाठी इतर काही देशांमधून बऱ्याच प्रकारचे चाऱ्याच्या प्रजाती भारतात आणले गेले आहेत. त्यामध्ये एक आहेत दशरथ घास. दशरथ घास चीप्रजाती 1976 मध्ये थायलंड मधून भारतात आणली गेली आहे. कृषी वैज्ञानिकांच्या संशोधनानुसार मानले जाते की,हा चारा जनावरांच्या आरोग्यासाठीफायदेशीर आहे. त्यामुळे पशुपालकांनी जनावरांच्या पौष्टिक आहारासाठी या चाऱ्याचा वापर जरूर करावा.
Published on: 20 November 2021, 01:23 IST