आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये मंदी कधीच येत नाही. मंदीच्या काळातही या व्यवसायात मागणीवर फारसा परिणाम होत नाही.
हा डेअरी फार्मिंग व्यवसाय ( दुग्ध व्यवसाय कसा करायचा ) आहे, ज्यातून तुम्ही दूध उत्पादन करून भरपूर कमाई करू शकता.( डेअरी फार्मिंग व्यवसायात नफा ) यामध्ये सरकारकडून दुग्ध व्यवसायास सबसिडीही मिळते.
2) दुग्ध व्यवसाय कसा सुरु करायचा :
दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी, तुम्हाला सुरुवातीच्या टप्प्यात कमी गाई किंवा म्हशी निवडावे लागतील मागणीनुसार नंतर जनावरांची संख्या वाढवता येईल.
यासाठी आधी गीर जातीची गाय यांसारखे चांगल्या जातीची गाय खरेदी करून तिची चांगली निगा व अन्नाची काळजी घ्यावी. याचा फायदा म्हणजे अधिक प्रमाणात दुधाचे उत्पादन होईल. त्यामुळे उत्पन्न वाढेल. काही दिवसांनी तुम्ही प्राण्यांची संख्या वाढवू शकता.
नक्की वाचा:पंजाबच्या गाई जास्त दूध देतात आणि आपल्या का कमी देतात, शेतकऱ्यांनो वाचा करणे
3) किती अनुदान दिले जाईल:
दुग्ध व्यवसाय साठी शासनाकडून 25 ते 50% अनुदान आहे. हे अनुदान राज्यानुसार बदलू शकते. प्रत्येक राज्यात काही दूध सहकारी संस्था आहेत. ज्या शेतकऱ्यांना दूध उत्पादनातून उत्पन्न वाढविण्यास मदत करतात. तुम्हालाही दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर तुमच्या राज्यातील दूध सहकारी संस्थेशी संपर्क साधा आणि कोणती कागदपत्रे लागतील ते शोधा
4) तुम्ही किती कमवाल :
जर तुम्हाला 10 गाईंपासून 100 लिटर दूध मिळाले तर तुम्ही दूध कसे विकता यावर तुमचा नफा अवलंबून असेल. जर तुम्ही सरकारी डेअरीवर दूध विकले तर तुम्हाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळतात.
तर तेच दूध तुम्ही जवळपासच्या शहरातील अनेक दुकानांमध्ये किंवा मोठ्या सोसायट्यांमध्ये खाजगीरित्या विकल्यास 60 रुपये प्रतिलिटरपर्यंत दर मिळतात. दोन्हीची सरासरी घेतली तर तुम्ही 50 रुपये लिटरने दूध विकू शकता. अशाप्रकारे 100 लिटर दूध म्हणजे तुमचे रोजचे उत्पन्न 5000 रुपये होईल. म्हणजेच एका महिन्यात 1.5 लाख रुपये सहज कमवले जातील.
नक्की वाचा:वाढलेले दुधाचे दर केंद्राला बघवेनात, केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे दूध दरात कपात
नक्की वाचा:Nutrilop ब्रँड आहे चारा पिकांसाठी उत्तम, शेतकऱ्यांना मिळेल दुप्पट नफा
Published on: 07 June 2022, 09:25 IST