शेतकऱ्यांचा प्रमुख जोडव्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाकडे बघितले जाते. यामध्ये व्यवस्थापन नीट केले तर आपल्याला चांगले पैसे मिळतील. यामध्ये डेअरी फार्मचे काही नियम आहेत. दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेतले तर उप्तादनात भर पडणार आहे. यामुळे याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. सध्या दुधाला चांगला दर मिळत असल्याने शेतकरी काहीसा समाधानी आहे.
दुग्धव्यवसायासाठी डेअरी फार्मचे नियम;
१) प्रत्येक व्यक्तीस ओळखपत्रा सह नाव नोंदणी करून फी भरल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.
२) अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीस स.१० ते संध्या ६ वाजेपर्यंत प्रवेश बंद.
३) आजारी असल्यास त्या व्यक्तीला गोठ्यात प्रवेश मिळणार नाही.
४) गोठ्यातील गणवेश/कोट घातल्याशिवाय गोठ्यात प्रवेश मिळणार नाही.
५) शु कव्हर घालून पूर्ण निरजंतूक झाल्याशिवाय गोठ्यात प्रवेश देता येणार नाही.
६) जनावरांना हात लावून फोटो काढता येणार नाहीत.
७) जनावरांना धरण्यासाठी जनावरांच्या मागे पाळता येणार नाही.
८) वाहतुकीच्या किंवा मालाच्या गाडीचे टायर गेट वर निरजंतूक झाल्याशिवाय गेट वरून प्रवेश मिळणार नाही.
९) मालकाचे नाव सांगून गोठ्यात प्रवेश मिळणार नाही आपली संबंधित ओळख गेटवर पटवावी लागेल.
१०) मोबाईल, कॅमेरा, पेन, घड्याळ, इत्यादी वस्तू गेट मधून आत नेता येणार नाहीत.
११) गोठ्यात एका वेळी फक्त ५ व्यक्तीलाच प्रवेश मिळेल.
१२) गोठ्यात सावकाश चालावे लागेल तसेच चर्चा व हातवारे करता येणार नाहीत.
१३) कोणतेही इलेक्ट्रिक उपकरणाचे बटण चालू बंद करता येणार नाही.
१४) गोठ्यात मद्यपान, धूम्रपान तसेच गोवा, गुटखा खाता येणारं नाही.
१५) गोठा पाहून झाल्यावर शु कव्हर कचरा पेटीतच टाकावेत.
पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोअर वरून Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा...
लिंक – https://play.google.com/store/apps/details?id=com.dhenoo.tech&referrer=LLCRNX
लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल-nitinpisal94@gmail.com
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो शेतीत वापरले जाणारे प्लास्टिक मल्चिंग धोक्याचे, धक्कादायक माहिती आली समोर
शेतकऱ्याचा दिलदारपणा! कर्जबाजारी झाला पण पट्ट्याने फुकटातच कांदा वाटला
गोड उसाची कडू कहाणी! एकीकडे ऊस तोडला म्हणून मिरवणूक तर दुसरीकडे गळ्याला फास
Published on: 16 May 2022, 04:33 IST