Cow Rearing: पशुपालन (Animal Husbandry) आपल्या देशात सर्वत्र केले जात आहे. राज्यातील शेतकरी बांधव (Farmer) देखील अतिरिक्त उत्पन्न (Farmer Income) मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पशुपालन करत आहेत. आपल्या देशातील शेतकरी बांधव गाईचे पालन (Cow Farming) सर्वाधिक करत असतात. गाय पालन मुख्यतः दुग्ध व्यवसायासाठी शेतकरी बांधव करत असतात.
यामुळे जाणकार लोक पशुपालक शेतकरी बांधवांना (Livestock Farmer) गाईच्या जास्त दूध देणाऱ्या जातींचे (Cow Breed) पालन करण्याचा सल्ला देतात. अशा परिस्थितीत आज आपण आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी गाईच्या एका सुधारित आणि जास्त दूध देणाऱ्या गाई च्या जातीची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
मित्रांनो आम्ही ज्या गाईच्या जातीबद्दल आपणास सांगणार आहोत ती आहे गिरगाय. सध्या पशुपालन मोठ्या प्रमाणात होत आहे. या क्षेत्रातील कमाई सदाबहार आहे, कारण काळाच्या ओघात पशुपालक खूप प्रगत होत आहेत. त्यामुळे जनावरांची वाढ आणि त्यांच्यापासून होणारे उत्पादनही वाढत आहे. अशा परिस्थितीत, आज या लेखात आपण 50 ते 80 लिटर दूध उत्पादन देणाऱ्या गीर गायीच्या जातीची माहिती देणार आहोत, तर चला जाणून घेऊया या गायीच्या जातीबद्दल.
गीर गायीची जात
गीर गायीची जात मुख्यतः गुजरातमध्ये आढळते. गुजरातच्या गिर जंगलास या गाईचे उगमस्थान म्हणून ओळखले जाते. हेच कारण आहे की, या गाईच्या जातीला गीर गाय म्हणून संबोधले जाते. ही एक अतिशय मागणीमध्ये असलेली जात आहे. असे सांगितले जाते की गिर गायचे दूध काढण्यासाठी एक नव्हे तर चार लोकांची गरज असते.
आम्ही तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, गीर गाय 50 लिटर ते 80 लिटर दूध देऊ शकते. देशातील सर्वाधिक दूध देणाऱ्या गायींमध्ये तिचे नाव समाविष्ट आहे. यामुळे या देशी गाईचे देशातील पशुपालक शेतकरी मोठ्या प्रमाणात पालन करत असतात. फक्त भारतातच नव्हे तर ब्राझील आणि इस्रायलमधील लोकांना या जातीचे संगोपन करणे सर्वात जास्त आवडते.
गीर गाईचा आकार
गीर गायीच्या शरीराच्या रचनेबद्दल बोलायचे झाले तर या जातीचा रंग लाल आणि कासे मोठे असतात. याशिवाय कान खूप लांब असतात आणि खाली लटकतात. त्याचे वजन 385 किलोच्या आसपास असते आणि उंची 130 सेमी पर्यंत असते.
गीर गायीला काय खायला द्यावे
जर आपण गीर गाईच्या खाण्यापिण्याबद्दल बोललो तर त्यांना प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेला संतुलित आहार दिला पाहिजे. बार्ली, ज्वारी, मका, गहू, कोंडा आणि इतर पदार्थ त्यांच्या अन्नात समाविष्ट करू शकतात. हे चारा म्हणून बरसीम, चवळी, मका, बाजरी इ. खातात.
Published on: 06 July 2022, 08:38 IST