Animal Husbandry

भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. शेतीला मुख्य जोडधंदा म्हणून पशुपालन आकडे पाहिले जाते. या व्यवसायामध्ये चाऱ्या चे व्यवस्थापन फारच आवश्यक असते. जेवढा चारा पौष्टिक तेवढे पशूंची कार्यक्षमता वाढते. या लेखात आपण अशाच पशु साठी उपयुक्त आशा चाऱ्याच्या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत.

Updated on 31 December, 2021 11:24 AM IST

भारतामध्ये पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. शेतीला मुख्य जोडधंदा म्हणून पशुपालन आकडे पाहिले जाते. या व्यवसायामध्ये चाऱ्या चे व्यवस्थापन फारच आवश्यक असते. जेवढा चारा पौष्टिक तेवढे पशूंची कार्यक्षमता वाढते. या लेखात आपण अशाच पशु साठी उपयुक्त आशा चाऱ्याच्या प्रकाराबद्दल जाणून घेणार आहोत.

पशु साठी उपयुक्त चाऱ्याचे प्रकार

मारवेल गवत

1- मारवेल हे डोंगरी गवताप्रमाणे दिसते. परंतु डोंगरी गवत आपेक्षा याचे पाने मोठी व रसाळ असतात. हे गवत गायरान, चराऊ कुरणे व शेताच्या बांधावर लावण्यासाठी योग्य आहे.

2- लागवडीआधी दोन डोळ्यांच्या हेक्‍टरी 20 ते 22 हजार कांड्या लागतात.

3- या गवताची लागवड खरिपात करावी लागते.

4- 20 ते 25 दिवसांच्या अंतराने कापणे घेतल्यास हेक्टरी वर्षभरात 80 ते 85 टन वैरण मिळू शकते

स्टायलो गवत

1- हे द्विदल वर्गातील बहुवार्षिक चारा पीक असून यामध्ये 15 ते 16 टक्के प्रथिने असतात.

2-स्टायलो या गवताची लागवड जून-जुलै महिन्यात करावी. 30 सेंटीमीटर अंतरावर काकऱ्या मारून या गवताचे बी टाकावे. अथवा बी फोकून पेरणी करावी. हेक्‍टरी 10 किलो बियाणे लागते.

3- फुले क्रांती या पिकाचे महत्त्वपूर्ण जात आहे.

4- या पिकाची कापणी तीस ते पस्तीस दिवसांच्या अंतराने करता येते. हिरव्या चाऱ्याची 200 ते 800क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन मिळते.

चवळी

1- चवळी हे द्विदल वर्गातील चारा पीक आहे. त्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 13 ते 15 टक्के असते. मका व ज्वारी यासारख्या एकदल पिकाबरोबर मिश्र पीक किंवा आंतरपीक म्हणून हे पीक घेतले जाते.

2- या पिकाची लागवड जून ते ऑगस्ट आणि उन्हाळी हंगामात फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान करावी.

3- चवळी चारा हिरवा किंवा  वाळवून देता येतो.

4- पेरणीसाठी 40 किलो बियाणे प्रति हेक्‍टरी लागते. मिश्र पिकासाठी 20 किलो बियाणे लागते.

5- हिरव्या चाऱ्याची हेक्‍टरी उत्पादन तीनशे ते साडेतीनशे क्विंटल इतके मिळते.

English Summary: Cow peas, marvel and stylo is most benificial fodder for animal
Published on: 31 December 2021, 11:24 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)