महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात सध्या कॉंगो तापाची साथ पसरल्याच्या बाबतीत पालघर प्रशासनाने पालघर जिल्ह्यात काँगो नामक तापाच्या संभाव्य पसारा बाबत अधिकाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. क्रिमियन काँगो हेमोरोजीक फिवर म्हणजेच काँगो असे या तापाचे नाव आहे. मुख्यत्वे हा ताप टिक म्हणजेच गोचीड नामक रक्तपिपासू किड्यापासून पसरतो.
कुणाला आहे या तापाचा सर्वाधिक धोका
पालघर जिल्हा प्रशासनाच्या माहितीप्रमाणे covid-19 च्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर काँगो ताप हा आजार पशुपालक, मांसविक्रेते आणि पशुसंवर्धन यांच्यासाठी चिंता वाढणार आहे. पशुपालक हे नेहमी गुरांच्या सानिध्यात असल्यामुळे गुरांच्या अंगावरील गोचीडपासून हा रोग पसरत असल्याने सर्वाधिक धोका पशुपालकांना आहे. या तापावर कोणतेही औषध अद्याप उपलब्ध नसल्याने वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
या तापाचे संक्रमण कसे होते?
शासनाच्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, हा एक विषाणूजन्य रोग एका विशिष्ट रक्तपिपासू टिक म्हणजेच गोचीड नामक किड्यापासून एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्यांमध्ये संक्रमित होतो. संसर्ग झालेल्या प्राण्यांच्या रक्ताच्या संपर्कात आल्याने किंवा संक्रमित प्राण्यांचे मांस खाल्ल्याने हा रोग मानवामध्ये पसरतो.
या तापाची प्रमुख लक्षणे
डोकेदुखी, उच्च ताप येणे, पाठ दुखी, सांधेदुखी, पोट दुखणे आणि उलट्या या रोगाची लक्षणे आहेत. त्यासोबतच डोळे लाल होणे, घसा लाल होणे आणि टाळूवरील डाग ही काँगो तापाची सामान्य लक्षणे आहेत.
कशी घ्याल काळजी?
या रोगाच्या प्रसाराची किंवा संक्रमणाची सर्वाधिक किती पशुपालक किंवा माऊस विक्रेत्यांना आहे. त्यामुळे प्राण्यांमध्ये वावरताना विशेष काळजी घेणे महत्त्वाचे आहे. प्राण्यांमध्ये वावरताना मुख्यतः संपूर्ण हातांचे ग्लोव्हस घालायला पाहिजेत. एखाद्या पशूचे अंगावर गोचीड असेल तर संरक्षक कपडे घालणे आणि योग्य पद्धतीने लवकरात लवकर गोचीड काढले गेले पाहिजेत. एखाद्या प्राण्याला काही इजा झाली असेल आणि त्यातून रक्तस्राव होत असेल तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. प्राण्यांचे रक्त मानवी संपर्कात तसेच इतर प्राण्यांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. मांस विक्रेत्यांनी कत्तलखान्यात येणाऱ्या पशू आणि प्राण्यांची तपासणी करून त्यांची विक्री केली पाहिजे. आजारी पशूंमध्ये हा व्हायरस होऊ शकतो.
गाण्यांमधून मानवामध्ये संक्रमित होणाऱ्या या रोगाचे वेळेवर निदान झालो नाही तर ३० टक्के रुग्ण दगावतात. पालघर जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉक्टर प्रशांत कांबळे यांनी एका परिपत्रकात म्हटले आहे की, हा ताप गुजरातच्या काही जिल्ह्यात आढळून आला आहे. त्यामुळे येत्या काळात हा आजार गुजरात सीमेलगत असलेल्या पालघरमध्ये पसरू शकतो. गुजरातमध्ये असलेल्या वलसाड जिल्ह्याला लागूनच महाराष्ट्राचा पालघर जिल्हा आहे. त्यामुळे या आजार बाकीचे सर्व आवश्यक काळजी त्याचसोबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या तापाबाबत चिंताजनक बाब म्हणजे या आजारावर ना प्राण्यांसाठी न मानवासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. म्हणून योग्य खबरदारी घेणे फार महत्वाचे आहे. पशुपालकांनी गोठ्यात आणि जनावरांची स्वच्छता नियमितपणे करणे महत्त्वाचे आहे.
माहिती स्त्रोत- स्मार्ट डेअरी- डिजिटल मॅगझीन
Published on: 04 October 2020, 10:12 IST