Animal Husbandry

भारतात मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय केला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाई पाळल्या जातात. असे असताना मात्र यामध्ये याचे दर अनेकदा कमीजास्त होतात. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो.

Updated on 19 February, 2022 5:12 PM IST

भारतात मोठ्या प्रमाणावर दुधाचा व्यवसाय केला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गाई पाळल्या जातात. असे असताना मात्र यामध्ये याचे दर अनेकदा कमीजास्त होतात. यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. यामुळे शेळीपालनाकडे अनेकजण सध्या वळाले आहेत. तसेच आरोग्याच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या ग्राहकांचा इतर प्राण्यांच्या दुधाकडे ओढा वाढल्याचे दिसत आहे. यामुळे यामधून चांगले पैसे मिळत आहेत. यामुळे सध्या शेळीच्या व्यवसायाकडे अनेकजण वळाले आहेत. शेळी आणि उंटाच्या दुधाबाबत जागरूकता वाढत असून या प्राण्यांच्या दुधाला मागणीही चांगली आहे.

यामध्ये गेल्या सहावर्षापूर्वी सुरू झालेली अद्विक फूड्स ही कंपनी देशांतर्गत आणि परदेशी बाजारात शेळी, उंट आणि गाढवाचे दूध विकते. काही दिवसातच त्यांचा व्यापार वाढला आहे. यामुळे याचा अंदाज आपल्याला येईल. उंटाच्या दुधाला त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी चांगली मागणी आहे. अनेक मोठे लोक याच दुधाचा वापर आपल्या दैनंदिन आहारात करत आहेत. तसेच उंटाच्या दुधामुळे ऑटिझम ग्रस्त मुलांच्या वर्तनात सुधारणा होते. उंटाचे दूध हे नैसर्गिक इन्सुलिन असून मधूमेहासाठी उपयुक्त आहे. यामुळे या व्यवसायात देखील चांगले पैसे मिळत आहेत.

तसेच उंटाच्या दुधात जीवनसत्त्वांचा भरपूर साठा असतो. तसेच डेंग्यूसारख्या आजारांमध्ये उंटापेक्षा शेळीच्या दुधाला जास्त मागणी असते. काही दिवसांपूर्वी डेंग्यूच्या उद्रेकादरम्यान १८०० ते २००० रुपयांपर्यंत शेळीच्या दुधाच्या किमती वाढल्या होत्या. असे असताना अनेकांनी शेळीचे दूध म्हणून भलतेच दूध विकून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवले होते. यामुळे तीन वर्षांपूर्वी कंपनी शेळीच्या दूध विक्रीकडे वळाल्याचे राठी यांनी सांगितले.

शेळ्यांची १३.५ कोटीपर्यंत घसरलेली संख्या सध्या १४.८९ कोटी झाली आहे. १८ व्या पशुगणनेत शेळ्यांची संख्या १४.०५ कोटी एवढी होती. शेळीची संख्या काहीशी वाढली असताना मात्र उंटाची संख्या कमी झाली आहे. तसेच गाढवांची संख्या देखील कमी झाली आहे. गाढवांची संख्या लक्षणीय कमी झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे आता यावर लक्ष देणे गरजेचे आहे. २०१२ ते २०१९ दरम्यान २० व्या पशुगणनेनुसार, उंटाची संख्या २.५२ लाखांवरून घटून १.४८ लाख इतकी राहिली आहे. तसेच गाढवांची संख्या ७१ टक्क्यांनी घटून १.१२ लाख इतकी झाली आहे.

English Summary: Consumer demand goat's milk money jobs goat rearing business
Published on: 19 February 2022, 05:12 IST