साध्य हिवाळ्याचे दिवस सुरु आहेत. सतत बदलते हवामान व थंडी यामुळे बऱ्याच लोकांना डोकेदुखी,थंडी, सर्दी, ताप यांसारखे छोटे मोठे आजार होत आहेत. या आजारांसाठी बहुतेक वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा काही लोक स्वतःच्या मनानेच पॅरासिटामॉल घेतात.
यासाठी घेतात पॅरासिटामॉल
पॅरासिटामॉल हे अॅसिटामिनोफेन म्हणून ओळखले जाते. डोकेदुखी, दातदुखी, सर्दी किंवा फ्लूपासून मुक्त या गोळीचे सेवन केले जाते. या
या गोळीमुळे वेदनेपासून त्वरित आराम मिळतो म्हणून डॉक्टरांकडे न जाता प्राथमिक (Primary) उपचार म्हणून बऱ्याचदा ही गोळी घेतली जाते, परंतु जास्त ताप किंवा वेदना असतील तर पॅरासिटामॉल फायदेशीर ठरत नाही. पॅरासिटामॉलचे चुकीच्या पद्धतीने सेवन करणे देखील कधीकधी धोकादायक ठरू शकते. पॅरासिटामॉलची गोळी अल्कोहोलसोबत घेतल्याने मळमळ, उलट्या डोकेदुखी, अशक्तपणा जाणवतो.
हँगओव्हर उतरण्यासाठी तुम्ही पॅरासिटामॉल घेत असाल तर यकृतास देखील धोका निर्माण होऊ शकतो.
एवढेच सेवन करा
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतोच म्हणून पॅरासिटामॉल हे अधिक वापरू नये. याच्या अधिक सेवनाने यकृताला धोका निर्माण होऊ शकतो. प्रौढ व्यक्ती एका डोसमध्ये एक ग्रॅम पॅरासिटामॉल घेऊ शकतात आणि दररोज 4 ग्रॅम पर्यंत खाऊ शकतात. या मर्यादेच्यावर पॅरासिटामॉल घेऊ नये. कोणत्याही औषधाचे सेवन शक्यतो डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे.
या गोळीमुळे वेदनेपासून त्वरित आराम मिळतो म्हणून डॉक्टरांकडे न जाता प्राथमिक (Primary) उपचार म्हणून बऱ्याचदा ही गोळी घेतली जाते, परंतु जास्त ताप किंवा वेदना असतील तर पॅरासिटामॉल फायदेशीर ठरत नाही. पॅरासिटामॉलचे चुकीच्या पद्धतीने सेवन करणे देखील कधीकधी धोकादायक ठरू शकते. पॅरासिटामॉलची गोळी अल्कोहोलसोबत घेतल्याने मळमळ, उलट्या डोकेदुखी, अशक्तपणा जाणवतो.
Published on: 07 March 2022, 06:10 IST