पावसाळा ऋतूमध्ये हवेतील आद्रता वाढल्यामुळे गोठ्यात ओलसरपणा वाढते. त्यामुळे जंतूंचा प्रादुर्भाव वाढतो. परिणामी रोगाचे प्रमाण सुध्दा वाढते. पावसाळ्यात जनावरांच्या खाद्यात बदल झाल्यामुळे पोटाचे विकार/आजार निर्माण होतात. या काळात होणारे आजार टाळण्यासाठी गोठ्याची स्वच्छ्ता व लसीकरण करुन घेणे फायद्याचे ठरते.पावसाळा ऋतूत आद्रता जास्त व ऊन कमी पडत असल्यामुळे गोठा नेहमी ओलसर राहतो. ओलसरपणामुळे रोग जंतूंची वाढ होऊन जनावरांना रोग उद्भभवतात. त्यासाठी खालील उपाय करावेत.
-
गोठ्यात खड्डे पडलेले असतील तर त्यामध्ये मुरूम टाकून बुजवावे.
-
सिमेंट च कोबा असेल तर रेती सिमेंट वापरून गड्डे बुजवावे.
-
जनावराचे मूत्र व मल याचा निचरा नीट झाला पाहिजे. म्हणजे गोठ्यात ओलसर पना कमि राहील.
-
पावसाळ्यात पावसाचे पाणी आत गोठ्यात येणार नाही यासाठी पोत्याचे पडदे बाजूला लावावे जेणेकरून पाणी आत येणार नाही . व गोठा ओलसर होणार नाही
-
गोठा स्वच्छ व कोरडा असल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहते.
-
गोठा कोरडा रहावा याकरता वाया गेलेल्या कुटारात चुना/चुण्याची पावडर मिसळून पातळ थर पसरावा. त्यामुळे आद्रता कमी होईल.
-
गोठ्यात भरपूर हवा व सूर्यप्रकाश येईल याची काळजी घ्यावी.
-
गोठा 8 ते 15 दिवसातून फिनाइल चे द्रावण वापरून स्वच्छ निर्जंतुक करावा. म्हणजे रोग जंतू वाढीस आळा बसेल.
पावसाळ्यात बाह्य व आंतरपरजिवी जंतूचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. जसे गोचीड, गोमाश्या, मच्छर, डास, चिलटे, यांच्या चावे मुळे विविध प्रकारचे आजार निर्माण होतात. जसे सर्रा, बबेसीओसिस, थायलेरियासिस, ई. त्याकरिता बाह्य परजीवी जंतूंचा प्रादुर्भाव टाळन्यासाठी पशू वैद्यकाकडून औषध विचारून गोठ्यात व जनावरावर फवारून घ्यावी. गोठा स्वच्छ ठेवावा. गोठ्याच्या आजूबाजूला पावसाचे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.तसेच गोठ्यातील मल, मूत्र विसर्जन याची विल्हेवाट लावावी.तसेच आंतर परजीवी जंतूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक औषधे पाजावी. किंवा आंतर व बाह्य परजीवी जंतूंचा नायनाट करण्यासाठी इंजेक्शनचा उपयोग केल्यास फायदा होतो.
पावसाळ्यात दुधाळ जनावरे गोठ्यात असतील तर दुध काढणे अगोदर व दुध काढल्यावर त्यांची स्तने व कास पोटॅशियम पर्मंग्नेटच्या द्रावणाने स्वच्छ निर्जंतुक करून घ्यावे. जेणे करुन गोठ्यातील अस्वच्छतेमुळे जंतू संसर्ग होउन कासदाह/ स्तनदाह हा रोग होणार नाही. कारण हा आजार झाल्यास पशुपालक आर्थिक अडचणीत सापडतो. तसेच पावसाळ्यात होणाऱ्या घटसर्प, एकटांग्या, रोगाविरुद्ध लसीकरण करून घ्यावे. शेळ्या मेंढ्यामध्ये आंत्रविषार रोगाचे E T V लस टोचून घ्यावी. शेळयामध्ये पावसाळ्यात खूप आजार होतात. जसे संडास लागणे, अपचन, पोटफुगी ई. जनावरांना नदी नाल्या काठी चरावयास सोडू नये.
कारण दूषित पाणी पिवून रोगास आमंत्रण देतो. पावसाळ्यात रस्त्याच्या कडेला व इतरत्र नुकतेच गवत उगवलेले असते. सर्वत्र हिरवळ दिसते उन्हाळ्यात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध नसतो. त्यामुळे जनावर ते गवत खाण्याचा प्रयत्न करतो.अशा वेळी गवताची उंची जास्त नसल्याने जनावराचे तोंड जमिनीला घासते व जखमा होतात.असे झाल्यास पशुपालकानी त्वरित पशु वैद्यक कडून उपचार करून घ्यावेत व आपले नुकसान टाळावे.
संपर्क:
डॉ विनोद शालिग्राम जानोतकर
विषय विशेषज्ञ पशु संवर्धन
कृषि विज्ञान केंद्र जळगाव जामोद
जिल्हा बुलडाणा
Published on: 05 July 2021, 11:33 IST