Animal Husbandry

पशुपालनाचा व्यवसाय मध्ये पशुपालकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. गुरांवर होणारा वातावरणाचा परिणाम, गोठ्यातील अस्वच्छता इत्यादी अनेक कारणांमुळे गुरांना अनेक प्रकारचे आजार होतात. त्याचा फटका हा दूध उत्पादनावर होत व असतो. बऱ्याचदा बुरशी युक्त खाद्य किंवा चारा खाल्ल्याने बहुतांशी गुरांना आजार होतात. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी एखाद्याची तपासणी करून घेणे फायद्याचे असते. या लेखात आपण बुरशी टाळण्यासाठी खाद्याची तपासणी किती महत्वाचे आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.

Updated on 23 June, 2021 12:15 PM IST

 पशुपालनाचा व्यवसाय मध्ये पशुपालकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. गुरांवर होणारा वातावरणाचा परिणाम, गोठ्यातील अस्वच्छता इत्यादी अनेक कारणांमुळे गुरांना अनेक प्रकारचे आजार होतात. त्याचा फटका हा दूध उत्पादनावर होत व असतो. बऱ्याचदा बुरशी युक्त खाद्य किंवा चारा खाल्ल्याने बहुतांशी गुरांना आजार होतात. त्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून वाचण्यासाठी एखाद्याची तपासणी करून घेणे फायद्याचे असते. या लेखात आपण बुरशी टाळण्यासाठी खाद्याची तपासणी किती महत्वाचे आहे याबद्दल जाणून घेणार आहोत.

 बऱ्याचदा बुरशी युक्त  खाद्य खाल्ल्यामुळे आफ्लाटॉक्सिनच्या सततच्या आहारात येण्यामुळे  जनावरे आजाराला बळी पडतात. त्यामुळे जनावरांच्या प्रजनन क्षमतेवर वाईट परिणाम संभवतो. जनावरांच्या दूध उत्पादनात घट होते  व दुधाची गुणवत्ता घसरते. त्यामुळे खाद्यातील बुरशीचा प्रादुर्भाव ओळखण्यासाठी खाद्याची तपासणी करणे आवश्यक असते. जनावरांना बुरशी युक्त चारा खायला दिल्यामुळे बऱ्याच प्रकारच्या आजार जनावरांना होत असतात. घातक विषारी पदार्थांचे अंश दूधात येऊन असे दूध जर सेवन केले तर सेवन करणाऱ्यांना सुद्धा अशा प्रकारच्या दुष्परिणामांचा सामना करावा लागतो.

 पशुखाद्य आतील बुरशीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय करता येतील उपाय?

  • खाद्याची तपासणी – जनावरांचा हिरवा चारा, सुका चारा व पशुखाद्य देण्यापूर्वी त्याची योग्य प्रकारे तपासणी करून घ्यावी.
  • जनावरांना दररोज ताजा ओला चारा द्यावा. परंतु बऱ्याच वेळेस नैसर्गिक किंवा इतर कारणांमुळे असे करणे शक्य होत नाही. चारा साठवताना तो उभा करून ठेवावा. जेणेकरून त्यामध्ये हवा खेळती राहील. चारा मध्ये उष्णता निर्माण होऊन त्यामुळे बुरशी होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • बरेच पशुपालक मका स्वस्त असल्याने मक्याचे भरड जनावरांना खायला घालतात. परंतु मका साठविताना मका व्यवस्थित  आहे की नाही याची खात्री करून घेणे कधीही फायद्याचे असते. चांगल्या गुणवत्तेचे पेंडीचा वापर करावा. पेंडीची  साठवणूक कोरड्या जागेत करावी.
  • पशुखाद्यात ईल आफ्लाटॉक्सिंचे प्रमाण पुरवठादारांकडून पशुखाद्य खरेदी करण्यापूर्वी तपासून घ्यावे. तसेच पशुखाद्य तील आफ्लाटोक्सिंचे प्रमाण दिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असू नये याची खात्री करून घेणे आवश्यक असते.
  • काही कारखान्यांमध्ये किण्वन प्रक्रिया द्वारे बार्ली किंवा स्टार्च किण्वन प्रक्रियेतून तयार होणारे पदार्थ बऱ्याच प्रमाणात जनावरांना आहार म्हणून वापरले जातात. हा आहार देताना तो योग्य वेळेत व ताजा असताना  देणे आवश्यक असते. परंतु बऱ्याच वेळेस हा आहार जनावरांना ताजा दिला जात नाही. असा आहार दोन ते तीन दिवसांनी कधीकधी दर आठ दिवसांनी सुद्धा दिला जातो. त्यामुळे या खाद्यावर पांढऱ्या बुरशीची थर जमा होतो त्यामुळे असा आहार देणे अपायकारक असू शकत.
  • अशा आहारातून विषबाधा होऊन जनावरे दगावण्याची शक्यता आढळते
  • पशुखाद्य साठवताना त्याचा जमिनीशी संपर्क येईल असे न ठेवता खाली फळ्या किंवा प्लेट्स ठेवावेत. पशुखाद्य जमिनीला किंवा भिंतीला चिटकुन ठेवता हवा खेळती राहण्यासाठी भिंतीपासून एक फूट अंतरावर ठेवा. जेणेकरून भिंतीमधील ओलसरपणा पशुखाद्य लागल्यामुळे बुरशीची होणारी वाढ टाळली जाते.
  • बऱ्याच वेळेस काळजी घेऊन सुद्धा किंवा बुरशी दिसत नसल्यामुळे आफ्लाटॉक्सिन चा काही भाग जनावरांच्या पोटात जाण्याची शक्यता बळावते. यासाठी आपण टॉक्सिन बाईंडर चा वापर करू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे बँडर आहारातून आलेल्या आफ्लाटॉक्सिनला शेणातून बाहेर टाकण्यास मदत करतात. वरील प्रमाणे जर आपण काळजी घेतली तर बुरशीचा होणारा प्रादुर्भाव टळून जनावरांना होणारा त्रास कमी होईल.
English Summary: care of animal feed
Published on: 23 June 2021, 12:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)