Animal Husbandry

दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील संक्रमण काळहा अतिशय नाजूक काळ असतो. जनावरांच्या एकूण संपूर्ण वेतामध्ये मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण संक्रमण काळातील व्यवस्थापन कसे आहे यावर अवलंबून असते.

Updated on 12 February, 2022 5:17 PM IST

दुभत्या जनावरांच्या आयुष्यातील संक्रमण काळहा अतिशय नाजूक काळ असतो. जनावरांच्या एकूण संपूर्ण वेतामध्ये मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण संक्रमण काळातील व्यवस्थापन कसे आहे यावर अवलंबून असते.

गाई आणि म्हशी मधील विण्याच्या तीन आठवडे अगोदर आणि तीन आठवडे नंतर असा एकूण सहा आठवड्यांचा कालावधीलासंक्रमण काळ म्हणतात. या काळात जनावरांच्या आहार व्यवस्थापनाकडे लक्ष देणे फार गरजेचे असते. या लेखामध्ये आपण संक्रमण काळातील कॅल्शियम चे महत्व आणि गरज याची माहिती घेऊ.

 जनावरांच्या संक्रमण काळातील कॅल्शियमची गरज

  • जेव्हा गाय किंवा म्हैस व्यायते तेव्हा ग्लुकोज सोबतच कॅल्शियम ची गरज वाटते.व्यायला च्या पहिल्या दिवशी तर ही गरज तीन पटींनी जास्त असते. यावेळेस चीक किंवा दुधा द्वारे कॅल्शियम शरीरा बाहेर जात असते.त्यामुळे पहिल्या आठवड्यात कॅल्शियमची कमतरता जास्त असते.
  • शरीरातील संप्रेरके हाडांमधील कॅल्शियम काढून रक्ता मधील त्याचे प्रमाण वाढवितात जेणेकरून चिक व दूधनिर्मिती ला कॅल्शियम कमी पडू नये.परंतु जेव्हा खाद्यामध्ये पोटॅशियम व सोडियम चे प्रमाण जास्त असते, तेव्हा या घटकाचे रक्तातील प्रमाण वाढून रक्ताचा सामू अल्कली स्वरूपाचा बनतो.

 जास्त पोटॅशियम मुळे मॅग्नेशिअमची उपलब्धता कमी होते. त्यामुळे शरीराची कॅल्शिअमची कमतरता ओळखण्याची क्षमता कमी होते. यामुळे संप्रेरकांचे रक्तातील प्रमाण कमी होते. शरीरातील कॅल्शियम दूध उत्पादन व इतर शारीरिक कामांसाठी उपलब्ध केला जात नाही किंवा खाद्यातील कॅल्शियम कमी शोषला जातो.

  • अशावेळी रक्तात शोषला जाणारा कॅल्शिअम या काळात तोंडावाटे देणे आवश्यक असते.
  • गाई किंवा म्हशीनाअशा वेळेस कमी पोटॅशियम व कमी सोडियम असलेला आहार द्यावा. मॅग्नेशियमचे प्रमाण मात्र वाढवावे.
  • पशु आहारामधील मीठ व सोडा यांचा वापर कमी करावा. यामुळे रक्ताचा सामू आमल स्वरूपाचा राहण्यास मदत होईल त्यामुळे संप्रेरके हाडांमधील व आतड्यामधील कॅल्शियम दुधासाठी जास्त प्रमाणात उपलब्ध करू शकतील तसेच काही खाद्य पुरके वापरून शरीरातील रक्ताचा सामू आमल स्वरूपाचा करून दुभत्या गाई म्हशींना होणाऱ्या आजारांचा धोका टाळता येऊ शकतो.
  • गाभण काळात कमी कॅल्शियम व जास्त मॅग्नेशियम अशा स्वरूपात खनिजांची उपलब्धता ठेवावी. गाभण काळात जास्त कॅल्शियम दिला गेल्यास तो शरीरात शोषला जाण्याची क्रिया मंदावते.
  • कारण दूध उत्पादन नसल्यामुळे  कॅल्शियम शरीरात शोषून घेणाऱ्या रिसेप्टर चे कार्य मंदावते. याचा फटका गाय, म्हैस व्यायल्यावर बसतो. कारण व्यायल्यावर तोंडावाटे दिलेला कॅल्शियम शरीरात कमी शोषला जातो. जनावराला मिल्कफिवर हा आजार होण्याची शक्यता वाढते.
  • संक्रमण काळातील एकूण सहा आठवड्यात दुभत्या जनावरांची रोगप्रतिकारक क्षमताही कमी झालेली असते. यामुळे कासेचा दाह व गर्भाशयाचा दाह इत्यादी रोगांना जनावर बळी पडू शकते.
English Summary: calcium important and nessecities in transit time in cow and buffalo
Published on: 12 February 2022, 05:17 IST